• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /'2029 ला मी 3 लाख 46 हजार 847 मतांनीच निवडून येईन'; ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या नेत्याने शपथेवर सांगितलं

'2029 ला मी 3 लाख 46 हजार 847 मतांनीच निवडून येईन'; ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या नेत्याने शपथेवर सांगितलं

जून महिन्यामध्ये ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांपैकी एका खासदाराने हा विश्वास व्यक्त करताना नक्की काय म्हटलंय जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 26, 2026, 14:48 IST|Updated: Nov 26, 2026, 15:00 IST
joinshare
'2029 ला मी 3 लाख 46 हजार 847 मतांनीच निवडून येईन'; ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या नेत्याने शपथेवर सांगितलं
Image Credit: आधीच्या दोन निवडणुकींचा दिला संदर्भ (फाइल फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

रिलायन्सच्या प्रोजेक्टसाठी 50,000 झाडांची कत्तल? भरपाई म्हणून कोकणात झाडं लावली; मनेस नेत्याचा गंभीर आरोप

2

रोहित पवार यांना मोठा झटका! राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केली भूमिका

3

शरद पवारांनी भाकरी फिरवली! रोहिणी खडसेंच्या जागी नव्या महिला नेतृत्वाला संधी; प्रदेशाध्यक्ष बदलल्या

4

'या' शहरात बनतंय MS Dhoni चं तिसरं घर, बांधकामाचं डिझाईन समोर, पाहा Video

5

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर; राजकीय वर्तुळात खळबळ

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

देशात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या खासदारांपैकी एक असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. धाराशिव येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाकित व्यक्त केलं आहे. आगामी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत मी मागील निवडणुकीपेक्षा अधिक मतांच्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास ओमराजेंनी व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

धाराशिवमधील छायादीप लॉन्स येथे आयोजित 'खासदार नोकरी महोत्सव 2026' या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ओमराजे निंबाळकर यांनी मागील दोन लोकसभा निवडणुकींचा संदर्भ आपल्या भाषणात दिला. "2019 मध्ये मी 1 लाख 29 हजार मतांनी निवडून आलो होतो. मी घरी बसून चॅलेंज देत नाही. मी 24 तास माणसांमध्ये राहून चॅलेंज देतोय. कोणी काहीही म्हणू द्या, 2024 मध्ये 3 लाख 29 हजार 847 मतांच्या फरकाने मी विजय मिळवला होता," असं ओमराजे निंबाळकर म्हणाले. पुढे त्यांनी, "2029 च्या निवडणुकीत मी 3 लाख 46 हजार 847 मताधिक्यानेच विजयी होईल," असंही ओमराजेंनी म्हटलं आहे. "मी तुमच्या कामाला येत असेल तर मतं द्या. मी काम करत नसेल तर मी तुमच्याकडे एकासुद्धा मताची मागणी करणार नाही हे अगदी शपथेवर सांगतोय," असं ओमराजेंनी म्हटलं आहे. 

जूनमध्ये ठाकरेंची साथ सोडली

जून 2026 मध्ये शिवसेना (उबाठा) गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केलं. या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आणि शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सहा खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकरांचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत फुटलेल्या खासदारांसह ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत व कौतुक करत पक्षात स्वागत केलं. ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडतील की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. मात्र ओमराजेंनी शिंदेंचं नेतृत्व मान्य करत पक्ष बदलला. पक्ष सोडण्याच्या निर्णयावर भाष्य करताना ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर, विशेषतः आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच मतदारसंघातील विकासकामे आणि निधीसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पक्षांतर केल्यानंतरची भूमिका मांडताना सांगितलेलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Omraje nimbalkar
Dharashiv
shiv sena