SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी मानकापेचा नववा घोटाळा उघड, कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी निधीवरच घातला दरोडा; पिता-पुत्र अटकेत

जेलमधून जमिनीवर आला काही दिवसातच दुसऱ्या घोटाळ्यात पुन्हा बेड्या पडल्या आहेत.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Sep 30, 2026, 04:20 PM IST | Updated: Oct 09, 2026, 03:14 PM IST
Join

आदर्श पतसंस्थेच्या 202 कोटींच्या घोटाळ्यात तीन वर्षे कारागृहात राहिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या आदर्श घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार अंबादास मानकापेचा आणखी एक घोटाळा समोर आलाय. मानकापेचा हा नववा घोटाळा असल्याचा आरोप आहे. कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून गाडेकर जिनिंगची तब्बल साडेसहा कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या 2 कोटी 11 लाख रुपयांत लाटल्याचा आरोप आहे. यासाठी आदर्श महिला बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या स्टाफ ग्रुप ग्रॅच्युइटी फंडातील 26 लाख 25 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय.

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील मानकापे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. डोंगरगाव येथील गाडेकर जिनिंग अँड प्रेसिंगवर कॅनरा बँकेचे 1 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज थकीत होते. त्यामुळे बँकेने मालमत्ता विक्रीची प्रक्रिया सुरू केली.

2019 मध्ये बाजारभावानुसार सुमारे 6 कोटी 56 लाख रुपये किंमत असलेल्या या मालमत्तेची केवळ 2 कोटी 11 लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारात बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मानकापे पिता-पुत्रावर करण्यात आला आहे.

मूळ मालकीण जयश्री विष्णू गाडेकर (७१) यांच्या फिर्यादीवरून अंबादास आबाजी मानकापे, त्याचा मुलगा सुनील अंबादास पाटील, आदर्श महिला बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि कॅनरा बँकेचे अधिकारी यांच्यावर सोमवारी (दि. २८) जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणूक, अपहार आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य घडामोडी आणि सद्यस्थिती

• आर्थिक घोटाळा: आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदारांच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचा व फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
• जामीन: तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जुलै 2026 मध्ये त्याला सशर्त नियमित जामीन मंजूर केला.
• सध्याच्या अडचणी: जामिनावर बाहेर आल्यानंतरही त्याच्याविरोधात कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटी (उपदान) फंडातून परस्पर अपहार केल्याप्रकरणी नवीन कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल होत असून त्याच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES