• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये मोठा घोटाळा; जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये मोठा घोटाळा; जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई

तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये घोटाळा उघडकीस आला आहे. नियमबाह्य पास वाटपप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 06, 2026, 07:59 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:19 PM IST
joinshare
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये मोठा घोटाळा; जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव :  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तिपिठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिरात लाखो भाविक दर्शनसाठी येतात. तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासमध्ये घोटाळा झाला आहे. नियमबाह्य पास वाटपप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे. 
 

तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पास वाटपावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमबाह्य पद्धतीने VIP दर्शन पास वितरित केल्याप्रकरणी तत्कालीन जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. 

सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी VIP दर्शन पासमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत गणेश मोटे यांनी नियमबाह्य पद्धतीने दर्शन पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यानंतर मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी गणेश मोटे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची गर्दी आणि VIP दर्शनाची मागणी लक्षात घेता दर्शन पास व्यवस्थापनाला मोठं महत्त्व आहे. मात्र,  याच VIP दर्शन पासच्या वाटपात नियमबाह्य प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते जयकुमार पांढरे यांनी VIP दर्शन पास वाटपातील गैरव्यवहाराबाबत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांची चौकशी करण्यात आली.
चौकशीनंतर गणेश मोटे यांनी नियमबाह्य पद्धतीने दर्शन पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्याचं कारवाईच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. याच प्रकरणात त्यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणात केवळ तत्कालीन अधिकाऱ्यावर झालेली कारवाई पुरेशी आहे का? VIP दर्शन पास वाटपाची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी होती? किती पास वितरित करण्यात आले? कोणत्या नियमांच्या आधारे पास देण्यात आले? आणि नियमबाह्य पद्धतीने पास वितरित झाले असतील, तर त्याची जबाबदारी आणखी कोणाची? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मंदिर संस्थान मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या या घोटाळ्यामुळे देवीची भक्त मात्र चांगलेच संतापले आहेत. सर्व व्हीआयपी पास बंद करा अशी भक्तांची मागणी आहे तर पुजाऱ्याने देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. तुळजाभवानी मंदिरातील VIP दर्शन पासच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार झाली. चौकशी झाली आणि चौकशीत नियमबाह्य पद्धतीने पास वितरित केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तत्कालीन जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईनंतर आता VIP दर्शन पासची संपूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्याची मागणी होत आहे. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पास व्यवस्थेत भविष्यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी मंदिर प्रशासन काय पावलं उचलतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Dharashiv
Maharashtra News