• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /भोपे Vs पाळीकर... नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच पुजाऱ्यांमध्ये राडा; तुळजाभवानी मंदिरात सुरु झालेला नेमका वाद काय?

भोपे Vs पाळीकर... नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच पुजाऱ्यांमध्ये राडा; तुळजाभवानी मंदिरात सुरु झालेला नेमका वाद काय?

भोपे Vs पाळीकर... नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच पुजाऱ्यांमध्ये राडा; तुळजाभवानी मंदिरात सुरु झालेला नेमका वाद काय?

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 01, 2026, 03:18 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:16 PM IST
joinshare
भोपे Vs पाळीकर... नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच पुजाऱ्यांमध्ये राडा; तुळजाभवानी मंदिरात सुरु झालेला नेमका वाद काय?
Image Credit: दोन गटांमध्ये ऐन नवरात्रीच्या तोंडावर वाद (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यावरून वाद पेटला आहे. भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळ आमनेसामने आले असून, दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आलेत. बायोमेट्रिक ओळखपत्राच्या माध्यमातून बोगस पुजारी तयार केले जात असल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाने केला आहे. तर दुसरीकडे भोपे पुजारीच मंदिराच्या कारभारात लुडबुड करून दलाली करत असल्याचा पलटवार पाळीकर पुजारी मंडळाने केलाय. नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच पुजाऱ्यांमधील हा वाद चिघळलाय.

भोपे पुजारी मंडळाचे आरोप काय?

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, त्यापूर्वीच मंदिरातील पुजाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्याच्या निर्णयावरून भोपे आणि पाळीकर पुजारी मंडळात जोरदार जुंपली आहे. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी पाळीकर पुजाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. बायोमेट्रिक ओळखपत्राच्या माध्यमातून बोगस पुजारी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहेत, असं भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम म्हणालेत.

पाळीकर पुजारी मंडळाचं जोरदार प्रत्युत्तर

भोपे पुजारी मंडळाच्या या आरोपांना पाळीकर पुजारी मंडळानेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भोपे पुजारी प्रशासनापेक्षा मोठे नाहीत. मंदिर संस्थानच्या कारभारात लुडबुड करून दलाली करण्याचं काम भोपे पुजारी करत असल्याचा आरोप पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केला आहे.

नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच वाद

त्यामुळे बायोमेट्रिक ओळखपत्राचा मुद्दा आता पुजारी मंडळांमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. एकीकडे बोगस पुजारी तयार करण्याचा आरोप तर दुसरीकडे मंदिरात दलाली केल्याचा पलटवार होताना दिसतोय.  नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही पुजारी मंडळांकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत असताना मंदिर संस्थानकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

वादाची पार्श्वभूमी काय

तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पुजारी व्यवस्था आहे. मुख्य पूजेचे अधिकार मराठा पाळीकर भोपे कुळाकडे सुमारे 153 मुख्य पाळीकर भोपी आणि 16 आने भोपी आहेत. याशिवाय उपाध्ये पुजारी मंडळही कार्यरत आहे. मंदिर संस्थान सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणीकृत आहे. बोगस पुजाऱ्यांची समस्या तुळजाभवानी मंदिरात यापूर्वीही वारंवार समोर आली आहे. भाविकांना आमिष दाखवून अनधिकृतपणे पूजा-सेवा करणारे आणि बनावट ओळखपत्र वापरणारे पकडले गेले आहेत. त्यामुळे मंदिर प्रशासनाने अधिकृत ओळखपत्र बंधनकारक केले आहेत आणि बायोमेट्रिक डिजिटल ओळखपत्र देण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती.

जून 2026 मध्ये रांगेबाहेर दर्शन देण्यासाठी पैसे मागणाऱ्या दोन पुजाऱ्यांना पाच वर्षे प्रवेशबंदी घालण्यात आली होती आणि पोलिसांकडे तक्रारही केली गेली. यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये पुजारी मंडळाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी विद्यमान विश्वस्त मंडळावर मालमत्ता दुर्लक्षाचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती. जीर्णोद्धार, शिखर आणि गाभाऱ्याच्या दुरुस्तीवरूनही भोपे पुजारी मंडळ आणि प्रशासन यांच्यात मतभेद झाले होते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Tourism
Maharashtra News