SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शेतकरीच नालायक आहे, मरायचंच असेल तर 10-12 पुढाऱ्यांना मारून मरा; प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य

शेतकऱ्याला मरायचंच असेल, तर 10-12 पुढाऱ्यांना मारा आणि मरा असा अजब सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 26, 2026, 09:25 AM IST | Updated: Oct 26, 2026, 09:36 AM IST
Image Credit: मरायचंच असेल तर 10-12 पुढाऱ्यांना मारून मरा; प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य
Join

राज्यातल्या दुष्काळाच्या झळांमध्ये शेतकरी होरपळून निघत आहे. अशातच निराशेतून काही शेतकरी टोकाचं पाऊलही उचलतात. अशाच शेतकऱ्यांबाबत प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं आहे. मरायचंच असेल तर 10 ते 12 पुढाऱ्यांना मारुन मरा, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. जे आत्महत्या करत आहेत, त्या कुटुंबीयांना कोणत्याही पुढाऱ्याला भेटायला जाता कामा नये. तुम्ही आत्महत्या करा असं कोणी सांगितलं आहे. आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचे किती हाल होतात. मरायचंच असेल, तर 10-12 पुढाऱ्यांना मारा आणि मरा. जर इतकाच जीव वर आला असेल तर. त्यात माझाही नंबर लागू शकतो असं ते म्हणाले आहेत.

"दुष्काळ आहे, पण शासनाने काहीच नियोजन केलं नाही. अल निनो येणार असल्याचे माहिती असताना अन्नधान्य, पाणी, चारा सह शेतकऱ्यांची निराशा सुद्धा झाली. अस्मानी संकटाला तोंड कसं देणार याचा आराखडा सुद्धा तयार नाही. अकोल्याच्या सभेत बोलल्यानंतर एका मंत्र्याला जाग आली आणि पाणी जपून वापरा म्हटलं. सर्वसामान्य माणसाला सांगतो जर का यांनी अन्नधान्य चारा पाणी पुरवलं नाही तर सरकार मधल्या मंत्री आमदार खासदार पदाधिकारी यांच्या घरासमोर लाईन लावा," असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

भीमाशंकरमध्ये हजारो झाडांची कत्तल हो असल्याप्रकरणी ते म्हणाले की, "महाराष्ट्रभर चालली आहे, नवीन नाही. देवाच्या नावानं ज्यांनी मदत मागितली त्यांच्यावरच आता चाल करायची वेळ आली. लोकांनी कायदा हातात घ्यायला शिकले पाहिजे. शिक्षक मतदार संघामध्ये पाचही उमेदवारांनी पाच-पाच हजार रुपये खर्च केले. हे 15 कोटी आले कुठून इन्कम टॅक्स यांच्या पाठी लागणार आहे का नाही ईडी लागणार आहे का नाही?".

"भाजपा आणि आरएसएस मतदान मागायला आले तर तू जेवण आणि पाणी दे असं सांगा. लोकांनी ही मानसिकता तयार झाली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

शेतकरीच नालायक आहे त्याला काय करणार. वाईट वाटतं बोलताना. शेतकऱ्यांनी तोंडात मारून घेतली पाहिजे की तुपकर आपल्यासाठी लढतो आहे. आपण त्यालाच मतदान केलं नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.   कालच्या झालेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील मास्तर म्हणण्याऐवजी त्यांना आता 5000 म्हणलं पाहिजे. त्याच्या अर्धांगिनीला पैठणी म्हटलं पाहिजे. विद्यार्थ्यांना म्हणणार आहे की तुम्ही त्याला मास्तर म्हणू नका पाच हजार म्हणा अशी टीका त्यांनी केली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES