• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक का वाढली? IIT मुंबईच्या संशोधकांचा धक्कादायक अहवाल

महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक का वाढली? IIT मुंबईच्या संशोधकांचा धक्कादायक अहवाल

महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराबाबत चिंताजनक अपडेट समोर आली आहे. लोणार सरोवराची जलपातळीत अचानक वाढ झाली आहे.

Written ByVanita KambleEdited ByVanita Kamble
Published: Oct 03, 2026, 10:13 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:17 PM IST
joinshare
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक का वाढली? IIT मुंबईच्या संशोधकांचा धक्कादायक अहवाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मयूर निकम झी 24 तास बुलढाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जलपातळी अचानक वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून सरोवराच्या तळाशी आणि पायथ्याशी गोड्या पाण्याचे नवीन झरे प्रवाहित होत आहेत.  याचाच परिणाम म्हणून सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याचं समोर आले. विशेष म्हणजे IIT मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून या बदलामागचं प्राथमिक कारण स्पष्ट झालंय.  नेमकं 

काय घडलंय लोणार सरोवरात? 

बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर उल्कापातातून निर्माण झालेलं हे अनोखं सरोवर आहे. गेल्या काही काळापासून एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. लोणार सरोवराची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीदरम्यान सरोवराच्या तळाशी आणि पायथ्याशी गोड्या पाण्याचे नवीन झरे प्रवाहित झाल्याचं दिसून आले. 

पावसाचं पाणी हे जलपातळी वाढण्यामागचं एक कारण मानलं जात होतं. मात्र, सरोवरातील पाण्याची वाढती पातळी आणि बाहेरून येणाऱ्या गोड्या पाण्याचा प्रवाह यामुळे आणखी एका महत्त्वाच्या कारणाचा शोध सुरू झाला. आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून सरोवराच्या तळाशी आणि पायथ्याशी गोड्या पाण्याचे झरे तयार झाल्याचं समोर आलंय.. या सगळ्यामुळे सरोवराची जलपातळी तब्बल चार मीटरने वाढली. 

या बदलाचा परिणाम सरोवराच्या पाण्याच्या रासायनिक गुणधर्मांवरही झाला. पाण्याचा पीएच सुमारे 11 वरून 9.5 ते 10च्या आसपास आल्याचं संशोधनातून नमूद करण्यात आलंय. म्हणजेच, सरोवराच्या पाण्यात गोड्या पाण्याचा सातत्याने होणारा प्रवाह हा महत्त्वाचा बदल ठरतोय.  या वाढत्या जलपातळीचा परिणाम सरोवराच्या काठावरही दिसून येत आहे.  सरोवराचा परीघ मोठ्या प्रमाणात विस्तारला असून, काठावर असलेली काही मंदिरे आणि झाडे पाण्याखाली गेलीयत. सरोवरामध्ये जाणाऱ्या गोड्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला नाही, तर भविष्यात जलपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. 

दरम्यान, केवळ जलपातळी नियंत्रित करणं पुरेसं ठरणार नाही.. तर सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याच्या स्रोतांचाही अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते गोडं पाणी येणारे झरे फ्रॅक्चर सिमेंटिंगने बंद करणं शक्य आहे का, यासाठी भूशास्त्रीय सर्वेक्षण गरजेचं आहे.. कारण लोणार सरोवराची ओळख आणि पर्यावरणीय समतोल कायम ठेवताना. वाढती जलपातळी नियंत्रित करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे.  

एकीकडे लोणार सरोवराच्या वाढत्या जलपातळीमुळे सरोवराच्या काठावरील परिसर प्रभावित होतोय. तर दुसरीकडे तळाशी निर्माण झालेले गोड्या पाण्याचे झरे या बदलामागचं महत्त्वाचं कारण असल्याचं संशोधनातून समोर आलंय. त्यामुळे आता या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासोबतच लोणारच्या नैसर्गिक रचनेचं संरक्षण करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Buldhana
Maharashtra Tourism