SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

झी 24 तास उत्सव बांधिलकीचा: दुष्काळामुळे मुलं घरापासून दुरावली, आजोबांना अश्रू अनावर!

बीडच्या श्रृंगारवाडीत झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीचा या कार्यक्रमात दुष्काळाबद्दल बोलताना एका आजोबांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 09, 2026, 13:49 IST | Updated: Nov 10, 2026, 14:28 IST
Image Credit: दुष्काळाबद्दल बोलताना आजोबांना अश्रू अनावर!
Join

बीडच्या श्रृंगारवाडीत झी 24 तासच्या उत्सव बांधिलकीचा या कार्यक्रमात एका आजोबांच्या अश्रूंचा बांध फुटला. दुष्काळामुळे पाणीसंकट गहिरं बनलं नसून यामुळे नातीही दुरावली आहेत. गावात काम नसल्यानं अनेक जण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची जबाबदारी वृद्ध आजी आजोबांवर आली आहे. हेच सांगताना श्रुंगारवाडीतील आजोबांना अश्रू अनावर झाले.

झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी!

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा झी 24 तासने संवेदनशील उपक्रम राबवला आहे. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा काळ. मात्र, दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात यंदा दिवाळीचा आनंद काहीसा हरवला होता. अशाच शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण फुलवण्यासाठी झी 24 तासने यंदाची दिवाळी थेट बळीराजाच्या दारी जाऊन साजरी केली.

‘उत्सव बांधिलकीचा – झी 24 तासची दिवाळी, बळीराजाच्या दारी’ या विशेष उपक्रमांतर्गत झी 24 तासची टीम बीड, सोलापूर, पाथरी आणि ऐतिहासिक सिंदखेड राजा अशा विविध भागांतील गावांमध्ये पोहोचली. केवळ शुभेच्छा देण्यासाठी नव्हे, तर शेतकरी कुटुंबांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग दिला. बीडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. हा संवाद साधला जात असताना एका आजोबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी या आजोबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भावना अनावर झाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते. तशाच भावूक अवस्थेत ते आपली व्यथा मांडत होते. त्यांची ही व्यथा सर्वांनाच भावूक करणारी आहे.

प्रवीण तरडे यांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेही बीड जिल्ह्यातील शृंगारवाडी इथं ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेताना भावूक झाले होते. त्यांनीयावेळी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या आणि वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. तसेच मूल-बाळ-पती नसलेल्या एका  वृद्ध महिलेलाही मदतीचा हात दिला आहे. 
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES