Maharashtra Breaking News Today LIVE : अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 November 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 11 November 2026 : जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात 3 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून आमदार फुटणार आहे. 20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत असून आमदार स्वगृही परततील किंवा इतर पक्षात जातील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.
11 Nov 2026 19:01 IST
हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले - किरीट सोमय्या
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात देण्यात आलेल्या म्हाडाच्या घरात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. अँटॉप हील परिसरात 110 फ्लॅट्स हे बांगलादेशी घुसकोरांनी बळकावल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
11 Nov 2026 18:55 IST
त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद
त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पुन्हा वादाचा प्रकार समोर.
भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
गर्दीच्या वेळी भाविकांना मंदिर परिसरातून बाहेर काढताना झाला होता वाद.
महिला सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
यापूर्वीही मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमधील वादाचे अनेक प्रकार समोर; पुन्हा एकदा मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
11 Nov 2026 18:46 IST
अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ
अमूल गोल्डच्या दरात प्रति लिटर ₹४ ने वाढ झाली आहे.
अमूल गोल्डचा जुना दर प्रति लिटर ₹७० होता.
आता ग्राहकांना प्रति लिटर ₹७४ द्यावे लागतील.
अमूल ताझाच्या दरात प्रति लिटर ₹२ ने वाढ झाली आहे.
अमूल गोल्डच्या दरात प्रति लिटर ५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमूल ताझा दुधाच्या दरात ३.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हे नवीन दर उद्या सकाळच्या पुरवठ्यापासून लागू होतील.
हिरवा आणि सुका चारा, पशुखाद्य आणि पॅकेजिंगच्या वाढलेल्या खर्चामुळे हे दर वाढवण्यात आले आहेत.
11 Nov 2026 18:31 IST
देशातील सर्वात मोठ्या बँकेचं लोन महागलं
सणासुदीच्या काळात, देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने, एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) सर्व सातही कालावधींसाठी ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. ज्यांचे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआरशी जोडलेले आहे, त्यांच्या खिशावर या निर्णयाचा थेट परिणाम होईल.
11 Nov 2026 18:26 IST
मॉर्निंग वॉक करतानाच बेशुद्ध पडले, माजी उपराष्ट्रपती एम्समध्ये भरती
देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत आज सकाळी अचानक बिघडली आहे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना ते बेशुद्ध पडले आणि जमिनीवरच धाडकन कोसळले. त्यामुळे त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 75 वर्षीय धनखड यांना कार्डिओ न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं असून कार्डिओलॉजी विभागाचे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
11 Nov 2026 17:52 IST
मोदी मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 77 हजार कोटी रुपयांच्या पाच महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय खत अनुदानासंदर्भात घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत आणि मेट्रो प्रवाशांपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
11 Nov 2026 17:48 IST
अहिल्यानगर जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण होणार?
हिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या सत्तावाटपाची राजकीय गणिते निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहेत. अध्यक्षपदासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव आघाडीवर असून, उपाध्यक्षपदासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
11 Nov 2026 16:41 IST
CRPF जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याचे नाव समोर
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम या ठिकाणी CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्या करण्याचे नाव समोर आले आहे. पुन्हा एकदा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भटच्या इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे. दुपारी सुमारे 2:15 वाजता नाकाबंदीच्या ड्युटीवर तैनात असलेल्या CRPF जवानांवर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला, ज्यात दोन जवान जखमी झाल्याचा माहिती समोर येत आहे
11 Nov 2026 16:34 IST
रब्बी हंगामासाठी केंद्राचा मोठा निर्णय
रब्बी हंगामासाठी केंद्राचा मोठा निर्णय
खत अनुदानासाठी ६२,३७० कोटींची तरतूद
फॉस्फेटिक आणि पोटॅशिक NBS दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत अनुदानाच्या अर्थसंकल्पीय गरजेत २४,४१७.७३ कोटी रुपयांची वाढ
DAP आणि NPKS यांसह फॉस्फेटिक व पोटॅशिक खतांवर अनुदान मिळणार
१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठी मंजूर दर लागू
शेतकऱ्यांना खते अनुदानित आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा उद्देश
11 Nov 2026 16:31 IST
कुर्ल्यामध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर राडा
कुर्ल्यामध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर राडा
गोळीबाराच्या घटनेमध्ये विनोद पवारांचा मृत्यू
न्याय मिळत नसल्याचं म्हणत पवार कुटुंबाचा राडा
कुर्ला पोलीस स्टेशनबाहेर पवार कुटुंबियांचा राडा
11 Nov 2026 16:30 IST
सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
दिवाळी निमित्त फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती
दिवाळीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवाळीनिमित्त झालेली ही भेट आनंददायी ठरली!
11 Nov 2026 16:30 IST
राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत सुनेत्रा पवार यांची सूचक प्रतिक्रिया
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. जशी वेळ येईल तशा गोष़्टी कळतील असं सूचक वक्तव्य सुनेत्रा पवारांनी केलंय. विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.
11 Nov 2026 16:25 IST
कोलकाता विमानतळावर विमान अपहरणाची धमकी
कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने खळबळजनक घटना समोर आलीय... कोलकाता-मुंबई मार्गावर उड्डाणासाठी सज्ज असलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या शौचालयात अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी आढळून आली. या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.. खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणाच्या काही वेळ आधीच संबंधित विमान विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं.. त्यानंतर सुरक्षा पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत सतर्कता वाढवण्यात आलीय..
11 Nov 2026 16:25 IST
जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला
जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे... दरम्यान या हल्ल्यात 3 जवान जखमी झाल्याची माहिती आहे... सीआरपीएफच्या गस्त घालणा-या जवानांवर दुपारी सव्वा दोन वाजता हा हल्ला करण्यात आला आहे... त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा क्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे... दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना अनंतनागच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...
11 Nov 2026 16:14 IST
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरण
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत 16 नोव्हेंबरपर्यंत वाढ
फुलसिंग, रेहान, कुणाल, सुमित आणि अंकित या पाच आरोपींच्या कोठडीत वाढ.
आरोपींची सुनेहा पंडितसोबत समोरासमोर चौकशी करायची असल्याने सरकारी पक्षाकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
आरोपी फुलसिंगने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला असून त्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच पथक हरियाणाला रवाना झालं आहेत.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.