)
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर भरदिवसा गोळीबार करून कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
प्रथमेश दीपक येणपुरे, वय १९ वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आरोपीने गोळीबार करून कोयत्याने वार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता
दरम्यान, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड तालुक्यातील कडेठाण गावात आरोपी लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यवत पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले
आरोपीच्या अंगझडतीमध्ये गावठी पिस्तुलासाठी वापरण्यात येणारी एक लोखंडी रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिसांनी केली आहे
शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गंभीर हल्ला प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यात नैताळे येथे वडाच्या झाडाजवळ दुपारच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत श्रावण सुरेश पिंपळे या तरुणाच्या कमरेला गोळी लागल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एका गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या मित्राला आपण पोलिसात हजर होऊन जा असेच सांगितल्यामुळे मित्राने अंगावर गोळी झाडली अशी माहिती जखमी श्रावण पिंपळे यांनी दिले आहे . घटनेची माहिती समजताच निफाड पोलीस व फॉरेन्सिक लॅब पथक घटनास्थळी दाखल झाले असून निफाडच्या पोलीस निरीक्षक सारिका आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुण्याची गोळीबाराची घटना ताजी असताना नाशिकमध्ये ही गोळीबार घडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
पुणे कोर्टाबाहेर घडलेला गुन्हा हा गंभीरच आहे पण यापुढे आणि असं काही होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी धेऊ, असं आश्वासन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणेकरांना दिलंय. तसंच होय, मला या घटनेबाबत सीएम सरांचा फोन आला होता, त्यांनी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्यायला सांगितले असून, त्यानुसार आम्ही तात्काळ कारवाई देखील सुरू केलीय, तसंच गुन्हेगारांच्या उदात्तिकरणाचे रिल्स बनवणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल केलेत, असंही पुणे सीपींनी सांगितले...पुणे कोर्ट परिसरातील सुरक्षा आढावा देखील आज आम्ही घेतला असून तिथला बंदोबस्त वाढवला जाणार आहे...यासोबत रस्त्यावर कोयते नाचवून दहशत माजवणाऱ्या सर्व लहान मोठ्या टोळ्या आता पुणे पोलिसांच्या रडारवर असून कोंबिग ऑपरेशन देखील सुरूय असंही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी झी 24 तासशी बोलताना दिली
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 84.94% मतदान
जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रावर दुपारी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पडली पार.
जिल्ह्यातील नऊ जागेंसाठी जवळपास 2190 सभासदांनी केलं मतदान..
भाजप पुरस्कृत पॅनलने 19 पैकी दहा जागांवर बिनविरोध उमेदवारा आणले आहेत निवडून..
अक्कलकोट कार्यकारी सोसायटीच्या मतदार संघात सर्वाधिक 100% मतदान पूर्ण..
उद्या जिल्हा बँकेची मतमोजणी होणार.
दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाण्याचं आवर्तन सुरू आहे.मात्र डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांनी विद्युत मोटारी टाकून पिकांसाठी पाणीउपसा सुरू केल्यानं कालव्यातील हे पाणी शेवटपर्यत पोहचत नसल्याचं सांगत शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचं परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी म्हटलं आहे.याबाबत खासदार जाधव यांनी तक्रार केल्यानंतर जालन्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भांबेरी पासून ते परतूर तालुक्यातील फुलवाडी पर्यत भारनियमन करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना दिले असून तसा आदेश काढण्यात आला आहे.दरम्यान या आदेशामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरील विद्युत पंप बंद पडलेत.त्यामुळे पिकांना वाचवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.त्यामुळे जालन्यातील भाजप नेत्यांसह स्वाभिमानीच्या नेत्यांनी खासदार बंडू जाधव यांच्यावर जोरदार टिका केली आहे.1 डिसेंबर पर्यत कालव्यावरील विद्यूत पंपाचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानं भाजपसह स्वाभिमानीचे नेते खासदार बंडू जाधव यांच्या विरोधात आक्रमक झालेत.
"कुणाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो"
रोहित पवारांनी मागितली सुनेत्रा पवारांची माफी
पुण्याचे सीपी भाजपचं ऐकतात-रोहित पवार
त्यामुळे सुनेत्रा पवारांची अडचण होती-रोहित पवार
दुष्काळाने पिचलेल्या शेतकरयाला दिलासा देण्यासाठी सरकारबरोबरच शिवसेना सर्वतोपरी मदत करते आहे. बळीराजाने चुकीचे पाऊल उचलू नये यासाठी शिवसेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्याचेळी वेळी पीडीत, कर्जबाजारी शेतकरयांच्या मागे फायनान्स कंपन्यांनी, सावकारांनी तगादा लावू नये नाहीतर सरकार त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ते महाडमध्ये दरडग्रस्तांच्या पुनर्वसन आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना कशी मदत केली जात आहे याचीही माहिती दिली
-IRCTC घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळल्या
-कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चित करण्याच्या दिलेल्या आदेशात हस्तक्षेपास नकार
-लालूप्रसाद यादव यांच्याविरोधातील भ्रष्टाचार, फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप कायम
-राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याविरोधातील फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोपही कायम
-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बोलावली बैठक
-देवगिरी निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार
-बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार
-मंत्री भुजबळांसह इतर नेते देवगिरीवर दाखल
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील मुक्या जनावरांसाठी रायगड जिल्ह्याने मदतीचा हात पुढे केला आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्यांतून चारा संकलित करून तो लातूर, धाराशिव आणि बीड या दुष्काळग्रस्त भागांत पाठविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चारा वाहून नेणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. पालकमंत्री बळीराजा चारा संजीवनी उपक्रमांतर्गत सुमारे ५० ट्रक चारा पाठविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरणार आहे. दिल्लीतील पूसा परिसरात भाजपचे दोन दिवसीय मंथन होणार आहे. 27 आणि 28 नोव्हेंबरला भाजपच्या 107 राष्ट्रीय पदाधिका-यांची बैठक होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी येणा-या सर्व 107 पदाधिका-यांचा पूसा परिसरातच मुक्काम असणार आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आलीये. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून रणनीती आखली जातेय.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून आता राजकीय संघर्ष पेटलाय... निवडणुकीत सहकार पॅनलने 19 पैकी 15 जागा जिंकत सत्ता मिळवली... त्यानंतर धीरज देशमुख यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली... मात्र या निवडीच्या अवघ्या 24 तासांतच संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुखांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली... नातेवाईकांच्या कंपन्यांना कर्जवाटप आणि आरबीआयच्या दंडाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आलाय... दुसरीकडे देशमुखांनीही निलंगेकर बंधूंवर कागदपत्रांत हेराफेरी केल्याचा आरोप करत CBI चार्जशीटचा दाखला दिलाय... त्यामुळे हा वाद आता चांगलाच रंगलाय..
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराविरोधात वरोर येथे गेल्या काही दिवसांपासून वाढवण विरोधी संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज संविधान दिनानिमित्त आंदोलक आक्रमक झालेत. या वेळी आंदोलकांनी ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आंदोलकांसह इतर आंदोलकांना पोलिसांनी मध्येच अडवले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
-ठाणे महापालिकेलाही धमकीचा ई-मेल
-ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याची धमकी
-सुरक्षेसाठी संपूर्ण इमारत रिकामी केली
-बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू
-मुख्यालयासह सर्व प्रभाग समित्यांनाही अलर्ट देण्यात आलाय
रायगडच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चवदार तळ्याला भेट दिली. संविधान दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले....तसेच चवदार तळे सुशोभिकरण कामाची पाहणी केली...छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीदांना अभिवादन केलं
अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या ओव्हरलोड ट्रकमुळे बार्शीटाकळी रेल्वे गेट परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.. रेल्वे गेटजवळ उभारलेल्या हाईट बॅरियर कमानीत ट्रकवरील अतिरिक्त साहित्य अडकलं... त्यानंतर ट्रकवरील 2 व्यक्तींनी चक्क ट्रकवर चढून साहित्य दाबत वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.. या प्रकारामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण कोण ठेवणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.. वाहतूक पोलीस आणि आरटीओ विभागाने अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होतेय....
दुष्काळाचा सामना करत कांद्याचे पीक जगविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता कांदा चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे...कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आता कांद्यालाच लक्ष्य केल्याची घटना चांदवड तालुक्यातील देणेवाडी येथे समोर आली आहे... शेतात काढून ठेवलेला तब्बल ३० क्विंटल लाल कांदा चोरट्यांनी चोरून नेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याचे दोन लाख रुपये च्या जवळपासचे नुकसान झाले आहे... . याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला... चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केलीये....
संविधानदिनानिमित्त राम पूर्णेकर यांनी तपास अधिकाऱ्यांना संविधानाची प्रत भेट दिलीय. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात अद्याप न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय .राम पूर्णेकर यांनी संविधान दिनाचे औचित्य साधत तपास अधिकारी शैलेश साळवी आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. या माध्यमातून त्यांनी प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. 2 डिसेंबरला मोठा खुलासा करणार, असा इशार राम पूर्णेकर यांनी दिलाय.
पुण्यातील गँगवॉर प्रकरणात आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं.. यावेळी सर्व 6 आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती... हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला.. हल्ल्यासाठी वापरलेली वाहनं जप्त करण्यात आली असून सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये हल्ल्याचं फुटेज असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. हल्ल्यात वापरलेली पिस्तूल आणि कोयते कुठून आणले याचा तपास करायचा असल्याने 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली.. मात्र आरोपींच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले.. अखेर न्यायालयाने आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय...
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मुंबईत दाखल
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची देवगिरी निवासस्थानी बैठक सुरु
पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांनी काही महत्वाच्या भेटीगाठी घेतल्याची सूत्रांची माहिती
आजच्या पार्थ पवारांच्या बैठकीत राज्यातील पक्षाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा
महायुतीत काम करत असताना कशा प्रकारे काम केलं पाहिजे पक्षाची आगामी रणनीती काय हवी याबाबत चर्चा झाल्याची माहिती.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 November 2026 : शरद पवार ब्रीच कँडी रूग्णालयात करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून शरद पवारांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रफुल पटेलांनी दिली. पुणे गोळीबाराने हादरले आहे पुणे गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. हत्या करण्यासाठी पिस्तूल आणि कोयते कुठून आणले याचा तपास होणार आहे. पुण्यात कोर्टाबाहेर गोळीबार झाल्यानंतर राजकारण पेटले आहे. पालमंत्री बदलण्याची मागणी केली जात आहे. दिवसभरातील सर्व घडामोडींचे लेटेस्ट अपडेट एकाच ठिकाणी.