सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा फोन
सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा फोन...डिलिमिटेशन विधेयकाबाबत दोघांमध्ये चर्चा...तर शरद पवारांच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती...
Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: लोकसभेत डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. यासंदर्भातील लोकसभेच्या कामकाजाची यादी जारी करण्यात आलीय. तर एकीकडे शरद पवार यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून भाजपला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि उद्धव ठाकरेंचा फोन...डिलिमिटेशन विधेयकाबाबत दोघांमध्ये चर्चा...तर शरद पवारांच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती...
भाजपाच्यावतीने सांगलीमध्ये लोकशाही बचाव पदयात्रा काढण्यात येत आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार असून यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर,आमदार सुरेश खाडे,आमदार सुधीर गाडगीळ,आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवन..
केनियन नागरिकासह दोघांना अटक..
दोघांनी हायड्रो बीड या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न..
अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याने FDAचा दणका..अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा धडाका..
द्रमुकच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट.. रात्री दिल्लीत शाहांच्या निवासस्थानी घेतली भेट..
डिलिमिटेशन विधेयकाला द्रमुकचा पाठिंबा..
तामिळनाडूत लोकसभेच्या २० जागा वाढणार..
कनिमोळींची शाहांसोबत दिल्लीत चर्चा..
सोलापुरामधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा.. दोन वसतिगृहातील 11 विद्यार्थ्यांना विषबाधा..सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू..
अफगाणिस्तानात शाळेजवळ भीषण स्फोट.. 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 97 जण जखमी.. अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील घटना..
राज ठाकरेंच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे... पक्ष संघटनेच्या आढाव घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत... आज राज ठाकरे पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, यावेळी डिलिमिटेशनवर राज ठाकरे बोलणार का?, याकडे लक्ष...
डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय.. विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आला. पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व 15 खासदार उपस्थित होते. संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व खासदारांनी आजच दिल्लीला पोहोचावे, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
डिलिमिटेशन अर्थात परिसिमन विधेयक मांडण्याआधी लोकसभेतील आसन व्यवस्थेत मोठी आदलाबदल पहायला मिळतेय... लोकसभा सचिवालयाने द्रमुकच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. द्रमुकच्या 22 खासदारांच्या जागा बदलण्यात आल्या असून ते आता काँग्रेसपासून वेगळे बसणार आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी द्रमुकची वेगळ्या आसनव्यवस्थेची विनंती मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. इंडिया आघाडीपासून स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची मागणी द्रमुकने केली होती.. या निर्णयामुळे समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल होणार आहेत... विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आता कनिमोळी यांच्या बाजूला बसणार आहेत... त्यामुळे या बदलाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...
'पवारांवर डिलिमिटेशनचं भवितव्य अवलंबून'
---
काँग्रेस नेते नाना पटोले यांचं विधान
--
काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा प्रश्न- पटोले
---
राहुल गांधींनी सकारात्मक भूमिका मांडली- नाना पटोले
राज्यातील 5 जिल्ह्यांवर फ्लॅश दुष्काळाचं सावट...जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होणार... भोपाळच्या मौलाना आझाद संस्थेचा धक्कादायक अहवाल...अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली, सोलापूरचा समावेश
डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार... प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा... RSS आणि भाजपच्या जाळ्यात अडकू नका... आंबेडकरांचं खासदारांना आवाहन...
Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: शिवसेना UBTच्या संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक
शिवसेना UBTच्या संसदीय दलाची आज दिल्लीत बैठक...डिलिमिटेशनविरोधात रणनीती ठरणार... अनिल देसाईंकडून सर्व खासदारांना व्हिप जारी...
Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशनवरुन पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरं
डिलिमिटेशनवरुन पवारांच्या राष्ट्रवादीत मतमतांतरं... बुलढाणा जिल्हाध्यक्षांचा विधेयकाला विरोध... विदर्भातील जागा कमी होण्याचा धोका असल्याचा आरोप..
Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशन म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवा प्रयोग
डिलिमिटेशन म्हणजे निवडणुका जिंकण्याचा नवा प्रयोग...सामना अग्रलेखातून हल्लाबोल... विधेयक मंजुरीसाठी अमित शाहांनी नॅशनल घोडेबाजार स्टॉक एक्सचेंज सुरु केल्याचा घणाघात..
Maharashtra Breaking News LIVE 29 November 2026: डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी
डिलिमिटेशनविरोधात काँग्रेसकडून मोर्चेबांधणी...मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी मैदानात... शरद पवार,एम के स्टॅलिन यांच्या मनधरणीचे प्रयत्न... खर्गेंचा तातडीचा मुंबई आणि चैन्नईचा दौरा...