)
शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी होणार नाही. पुढील आठवड्यात होणार सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरील आजची सर्व प्रकरण सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आले
मुंबईतील पक्षाच्या बैठकीत रोहित पवारांकडून भूमिका स्पष्ट
सर्व जिल्हाध्यक्षांनी शेतकरी मोर्च्यावर आणि दुष्काळावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी
--शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले
--रुटीन चेकअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात
--शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले
--मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी
आज आलेल्या धमकीच्या मेलवरून गंभीर दखल. तपास यंत्रणाच्या माध्यमातून महापौर कार्यालय खाली करण्याच्या सूचना. बॉम्ब शोधक पथकाकडून कार्यालयाची तपासणी सुरु
काल पुण्या-मुंबईत झालेल्या गोळीबाराच्या घटना ताज्या असतांना आज पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या महापौर कार्यलयाला धमकीचा मेल. २६ नोव्हेंबरला महापौर कार्यालयात दुपारी १.११ वाजता स्फोट घडवण्याची धमकी. ग्रेनेड हल्ल्याद्वारे मुंबईत दहशत पसरवण्याचा ई-मेलमध्ये उल्लेख. २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मुंबईत ग्रेनेड हल्ले करण्याची धमकी
आमदार आदित्य ठाकरे मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेणार आहे... मुंबईतील विकास काम आणि वरळी विधानसभेतील कामांसंदर्भात आदित्य ठाकरे आणि अश्विनी भिडे यांची बैठक होणार आहे..
राष्ट्रवादीच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या पक्षाचे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची टीम गेले तीन दिवस नागपूर आणि विदर्भात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे....प्रामुख्याने पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी प्रशांत किशोर यांची टीम ठिकठिकाणी फिरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत माहिती गोळा करत आहे....
नागपूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ ते २० स्थानिक नेत्यांसोबत प्रशांत किशोर यांच्या टीमने वेगवेगळी स्वतंत्रपणे सखोल चर्चा केल्याची माहिती आहे....
राज्यात अजूनही खंडणीखोरांचं राज्य आहे असा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. मुंबईसह राज्यात अजूनही खंडणी मगितली जाते आणि दिली जाते... मुंबईतील सर्व व्यापारी खंडणी देतात आणि जे देत नाही त्यांच्यावर गोळीबार होतो असा दावा राऊतांनी केलाय..
हवाई प्रवास 35 टक्क्यांनी महागला...7 प्रमुख क्षेत्रांमध्ये विमान प्रवास दर सर्वाधिक....विमान इंधनाच्या दरवाढीचा प्रवाशांवर भार....
जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर..थकीत अनुदानामुळे गोशाळा संकटात..तातडीनं चारा-पाणी पुरवण्याची मागणी...
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरमधील नद्यांचा समावेश..रासायनिक सांडपाणी, वाढत्या शहरीकरणाचा फटका.
दादर, माहीममध्ये महापालिकेची कारवाई...चौपाट्यांवर नियमावलीचे फलक लावणार..दोन्ही चौपाट्यांवर कर्माचारी तैनात करणार.
अमेरिकेने घेतलेल्या या टॅरिफच्या निर्णयावर भारताने ठाम प्रत्युत्तर दिलंय... भारत सरकारने सांगितले की, या प्रकरणातील चौकशीबाबतची नोटीस तपासली जात आहे... संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी अमेरिकेसोबत रचनात्मक चर्चा केली आहे... भारत चर्चेसाठी तयार आहे...तसेच भारतातील कोणत्याही क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन नसल्याचंही स्पष्ट केलंय...अमेरिकेसोबतच्या व्यापारविषयक सर्व मुद्द्यांवर चर्चा ही सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या चौकटीतच केली जावी...अशी भूमिका भारत सरकारने मांडलीय...
रत्नागिरीच्या चिपळूनमध्ये भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय... हल्ल्यात तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे... भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे चिपळूणमध्ये भीतीचे वातावरण आहे... कौटुंबीक वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, आणि यातूनच कोयत्याने हल्ला झाला...
त्र्यंबकेश्वर मंदिर अडीच महिने बंद राहण्याची शक्यता...MSIDCचा मंदिर बंदसाठी कुंभमेळा प्राधिकरणाला प्रस्ताव...गर्दीमुळे विकासकामांना अडथळा होत असल्याचा दावा...
दुष्काळ झळात होरपळणा-या महाराष्ट्रावरील पाणीसंकट अधिक तीव्र...राज्यातील धरणात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्के कमी पाणी...नद्यांपाठोपाठ विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने चिंता वाढली...
जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेचे 54 कोटी थकवले. गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप...स्वतःला सुसंस्कृत समजतात, मग आधी 54 कोटी भरा, पडळकरांनी डिवचलं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळेंनी घेतली उदय सामंतांची भेट.. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती... शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सक्रीय झाल्याच्या चर्चा
बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक, वाढीव खर्चाचा आणि प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा बैठकीत घेतला जाणार
मुंबई, ठाणे वगळता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील ३ महिने मोफत धान्य…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 26 november 2026 : पुणेपाठोपाठ मुंबईत गोळीबाराची घटना, माहीममध्ये पी. सी. जैन ज्वेलर्सच्या दुकानावर 5 ते 6 गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या सुनावणीत कोर्टाने बुधवारी सुनावणी घेऊ अस सांगितले होते. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी व जवानांना मानवंदना देण्यात आली. देशभरात आज संविधान दिन साजरा केला जाणार असून, या निमित्ताने संसदेपासून ते राज्यांपर्यंत विविध शासकीय आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासह अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून