)
डी लिमिटेशन प्रक्रियेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा
खासदार सुनील तटकरे यांनी केले सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डी लिमिटेशन करण्याचा यापूर्वीचा प्रयत्न दोन तृतीयांश बहुमत नसल्याने अयशस्वी झाला
1971 मध्ये इंदिरा गांधी यांनी डी लिमिटेशन करून लोकसभेच्या 543 जागा केल्या
त्यावेळी देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आता ती 140 कोटी झाली आहे
आता होणाऱ्या डी लिमिटेशनचे स्वागत आहे
उद्या सायंकाळी ४ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाची बैठक
बैठकीसाठी पक्षाकडून खासदारांना व्हिप जारी
चिप व्हिप अनिल देसाई यांनी जारी केला व्हीप
पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती
दक्षिण भारतातील 60% खासदारांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. DMK, BRS, YSRCP, TDP, जनसेना आणि JDSचा पाठिंबा आहे.
आंध्र प्रदेश,तामिळनाडू,तेलंगणा,केरळ,कर्नाटकातील खासदारांचा पाठिंबा आहे. दक्षिण भारतातील 129 पैकी 75 खासदारांचा विधेयकाला पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
लोकसभेत द्रमुकच्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल
डिलिमिटेशन विधेयक मांडले जाणार असल्यापूर्वी लोकसभा सचिवालयाचा निर्णय
इंडिया आघाडीपासून स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची मागणी द्रमुकने केली होती
खासदार कनिमोळी यांनी यासंदर्भात मे महिन्यात पत्र लिहिलं होतं
या बदलामुळे समाजवादी पक्ष, NCP (शरद पवार), शिवसेना (UBT) आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल
सुप्रिया सुळे कनिमोळी यांच्या बाजूला बसतील
तुम्ही NDAत सहभागी व्हायला पाहिजे, शरद पवारांना मी अनेकदा सांगिलत्याचं, प्रफुल पटेल यांनी म्हटलंय... यासंदर्भात शरद पवारांसोबत अनेकदा चर्चा झाल्याचंही प्रफुल पटेल म्हणालेत.. तसंच NDAत सहभागी होण्याच्या मार्गानं पवार येत असतील तर स्वागतच असल्याचं पटेल म्हणालेत...
मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय... विरोधकांना भारतात अराजकता निर्माण करायची आहे... विरोधकांना सरकार नाही तर व्यवस्था बदलायची आहे... विरोधकांना संविधान संपवून नवीन रेजीम आणायचं आहे, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केलीय... रोज खोटं बोलल्यानं लोकांना ते खरं वाटेल असं राहुल गांधींना वाटतं असल्याचं म्हणत फडणवीसांनी टीका केलीय..
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये 14 कोटी अपात्र लोकांनी मतदान केले. त्यामुळे 2024 ची निवडणूक बेकायदेशीर ठरते.
देशातील 80 टक्के नागरिक आणि जवळपास 100 टक्के Gen Z यांचा नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार निवडणुका चोरत असल्यावर विश्वास आहे
निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी भाजपने नवा प्लॅन तयार केला आहे. या नव्या प्लॅनची रचना आणि त्याचे परिणाम आज स्पष्ट करणार
जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली
बिहारमध्ये मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली
आसाममध्ये भाजपच्या फायद्यासाठी संपूर्ण राज्याची पुनर्रचना करण्यात आली
पश्चिम बंगालमध्ये 100 पेक्षा जास्त जागा चोरण्यात आल्या
मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना आम्ही घेरले आहे
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत आमच्याकडे पुरेशी माहिती आहे. ही माहिती लवकरच सार्वजनिक करणार
लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांऐवजी 850 जागा करण्याची भाजपची योजना आहे
महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी उद्याही होऊ शकते. मग 850 जागांची गरज काय
लोकसभेच्या 850 जागा झाल्यास भाजपला आपल्या फायद्यासाठी भारताचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्याची मोठी संधी मिळेल
या माध्यमातून भाजपविरोधी समुदायांचे प्रतिनिधित्व कमी करता येईल आणि विरोधी पक्षांच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करता येईल
लोकसभेच्या 850 जागांचा आकडा लक्षात ठेवा. हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा आकडा आहे
850 जागांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना भारतातील मतदारसंघांचा नकाशा आपल्या मर्जीनुसार बदलण्याची मोकळीक मिळणार
या बदलांमुळे देशातील लोकशाही व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येईल
परिसीमन आयोगात ज्ञानेश कुमार सदस्य असतील. मोदी आणि अमित शाह यांच्या निवडीचा सर्वोच्च न्यायालयाचा एक माजी न्यायाधीश दुसरे सदस्य असतील, तर तिसऱ्या सदस्याची निवड ज्ञानेश कुमार स्वतः करणार आहेत
परिसीमन आयोगाची रचना मोदी आणि शाह यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली असेल. आयोगाच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही
निवडणूक आयोगावर कब्जा केल्यानंतर आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ रचना बदलण्याची तयारी सुरू आहे
जातनिहाय जनगणना बाजूला ठेवण्यात आली असून 2027 ची जनगणनाही अप्रासंगिक ठरवण्यात आली आहे
2011 च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असून 2051 पर्यंत ही रचना कायम ठेवली जाणार आहे. म्हणजेच पुढील 40 वर्षे सामाजिक न्यायाचा मुद्दा बाजूला पडेल
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचे अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे
एससी आणि एसटी प्रवर्गासाठीच्या जागा पुढील 40 वर्षांसाठी गोठवल्या जातील. या समाजांची लोकसंख्या वाढली तरी त्यांच्या जागांमध्ये वाढ होणार नाही
आम्हाला सर्वपक्षीय परिसीमन आयोग हवा आहे. परिसीमन प्रक्रिया निष्पक्ष आणि सर्वपक्षीय सहमतीने व्हावी, अशी आमची भूमिका आहे
भाजपला लोकसभेच्या 850 जागा हव्या आहेत, तर आम्हाला सध्याच्या 543 जागा कायम ठेवायच्या आहेत
भाजपला 2011 च्या जनगणनेचा आधार घ्यायचा आहे, तर आम्हाला 2027 च्या जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीनुसार परिसीमन हवे आहे
भाजपला 850 जागांवर महिला आरक्षण लागू करायचे आहे, तर आम्हाला सध्याच्या 543 जागांमध्येच महिला आरक्षण लागू करून ओबीसी महिलांसाठी उपकोटा हवा आहे
ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेवर कब्जा केल्यानंतर आता संपूर्ण मतदारसंघ रचनाच बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे
भाजपला देशाचे हुकूमशाहीत रूपांतर करू देणार नाही. देशात हुकूमशाही येऊ देणार नाही
2024 ची निवडणूक बनावट होती आणि नरेंद्र मोदी हे बनावट व बेकायदेशीर पंतप्रधान आहेत
देशातील तरुण आणि Gen Z यांनी मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपला घेरले आहे. त्यांचा जुना मार्ग बंद झाल्यानंतर आता भाजप नवा मार्ग शोधत आहे
महाविकास आघाडीतील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा संताप अनावर झाला आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, ‘त्यांच्या मागे जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून तेच निघून गेले,’ अशा शब्दांत खैरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) वर जोरदार टीका केली. पवारांनी आम्हाला धोका दिला असून, त्यांच्यासोबत राहून काय मिळाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शरद पवार भाजपसोबत जातील, मात्र आम्ही तिथेच राहू, असे अनेक नेते पूर्वी सांगत होते. प्रत्यक्षात सत्ताही मिळाली नाही आणि राजकीयदृष्ट्याही नुकसान झाले, अशी खंत खैरेंनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे,’ अशी टीका केली. शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत खैरे म्हणाले, ‘वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले.’ शरद पवारांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मानतो, असे सांगतानाच त्यांच्या या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.खैरेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
सोनिया गांधींच्या मतदार यादीतील नावाचे प्रकरण
१९८० मध्ये सोनिया गांधी भारतीय नागरिक नव्हत्या -दिल्ली पोलिसांचा अहवाल
राऊज अव्हेन्यू न्यायालयात अहवाल केला दाखल
मात्र, १९८० च्या मतदार यादीत नाव असल्याची पोलिसांची माहिती
३० एप्रिल १९८३ रोजी भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे अहवालात नमूद
जिल्हाधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहितीची पडताळणी
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडूनही मागवले काही रेकॉर्ड
नागरिकत्वापूर्वी नाव नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरली? याचिकाकर्त्यांचा प्रश्न
'50 हजार वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी राष्ट्रपतींना निवदेन'
यवतमाळमधील सामाजिक कार्यकर्त्यांचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र
वृक्षतोडीला स्थगिती देण्याची पत्राद्वारे मागणी
ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रक्रिया सुरू असल्यानं नाराजी
महायुतीची भूमिका तीच आमची भूमिका
डिलिमिटेशन विधेयकावर भुजबळांचं विधान
शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना NDAत येण्यासाठी पत्र द्यावं लागणार
विधेयकाला पाठिंबा देणं आणि NDAमध्ये येणं वेगवेगळं-पटेल
डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार
प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा केला
"खासदारांनी भाजपच्या जाळ्यात अडकू नये"
डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा-प्रकाश आंबेडकर
पवारांचं जंतरमंतर आहे, असं म्हणालो होतो, अशी पोस्ट राज ठाकरेंनी सोशल मीडियावर टाकलीय. 2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती. त्यावेळेस आपण बोललो होतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास झाला. ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांवर उपचार सुरू आहेत. कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पवारांची नियमित चाचणी झाली. डॉक्टरांनी माहिती दिली. शरद पवारांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता
विशेष अधिवेशनानिमित्त शिंदेंचा दिल्ली दौरा?
डिलिमिटेशन विधेयकाला समर्थन देण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती
काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री उद्या पत्रकार परिषद घेणार
दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली जाणार
देशातील काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार
उद्या दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन
डिलिमीटेशन अर्थात मतदारसंघ पुरर्रचना विधेयकावर भूमिका मांडणार..
डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकाच्या बाजूनं शरद पवारांनी निर्णय घेतला की त्यांच्या सध्याच्या प्रकृतीचा फायदा कुणी घेतला?, असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलाय... तसंच जितेंद्र आव्हाडांनी वैचारिक तडजोड केलेली दिसते... त्यांची भूमिका पटलेली नसल्याचं म्हणत राजू शेट्टींनी टीका केलीय...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 : डिलिमिटेशन विधेयकावरुन देशात राजकारण पेटले माजले आहे. शरद पवार यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. या विधेयकावरून काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इंडियाआघाडी आणि माहविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तर, दुसरीकडे डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तर, देशातील अनेक राज्यांमध्ये देखील याचे पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट जाणून घ्या.