)
जय पवारांचा शरद पवारांना फोन...शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस...पवारांच्या प्रकृतीची फोनवरुन घेतली माहिती...पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांच्यासह अभिनेत्यांना धमकी देणा-या इंजिनिअरला अटक करण्यात आलीये.. वैभव मिश्रा असं या इंजिनिअरचं नाव असून त्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आलीये.. तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्रभावाखाली असल्याचे तपासात समोर आलंय.. आरोपी वैभव मिश्रा हा लॉरेन्स बिश्नोई गँगचे व्हिडिओ वारंवार पाहत असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीये.. त्यानं स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे भासवून अभिनेत्यांना धमकी दिली...मोबाईल नंबर ऑनलाइन मिळाल्यास ऑडिओ मेसेजद्वारे, तर काहींना इन्स्टाग्रामवरून धमकी दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.. इतकच नाही तर त्यानं मोबाईलमधील जुना डेटा आणि रेकॉर्ड डिलीट केल्याचा संशयही पोलिसांना आहे... त्याला कोर्टानं मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये.. धमक्यांमधून पैसे उकळण्याचा त्याचा उद्देश होता की लॉरेन्स बिश्नोई गँगच्या व्हिडिओंचा प्रभाव होता, याचा पोलीस तपास करत आहेत.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक 400च्या वर गेल्याच्या पार्श्वभूमीवर हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन ग्रॅप-3 निर्बंध लागू केले आहेत...मेट्रो आणि बस सेवांच्या फेऱ्या वाढवल्या जातील...जास्तीत जास्त लोकांनी खासगी गाड्यांच्या ऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन..चारचाकीबाबत नियम कठोर करण्यात आलेत..
ठाकुर्ली परिसरातून एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आलीये.. संजय सरोज यादव उर्फ संजय गोदराई उर्फ बुधराम असं या नक्षलवाद्याचं नाव आहे.. हा नक्षलवादी झारखंडच्या जंगलातील रहिवासी आहे. तो गेल्या 10 दिवसांपासून ठाकुर्लीमध्ये राहात होता अशी माहिती समोर आलीये.. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं...या नक्षलवाद्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.. तो ठाकुर्लीमध्ये काय करत होता याचा तपास पोलीस करत आहेत..
मुंबई आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ..
त्यामुळे दिवाळीत सलग पाच दिवस शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत...सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी दुपारी यासंदर्भातला शासन निर्णय प्रसिद्ध केला...
त्यात ९ नोव्हेंबर रोजी तिसरी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ७ नोव्हेंबर रोजीसाप्ताहिक सुट्टी, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन, १० नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा आणि बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबिजेनिमित्त सुट्टी आहे...सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी कार्यालये सुरू राहणार होती. मुंबईत शासकीय कर्मचारी दिवाळी सणाला गावी जातात. सोमवारी एका दिवसासाठी त्यांना आपल्या जिल्ह्यातून मुंबईला येणे अडचणीचे होते..
.
मुख्यमंत्री शेतक-यांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत...फडणवीस आज नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहेत.... मुख्यमंत्री नागपूरहून लोहारी सावंग्याकडे संध्याकाळी रवाना होतील रात्री तेथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतीविषयक समस्या, सिंचन आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणार आहेत... रात्री त्याच गावात मुक्काम देखील करणार आहे... त्यानंतर रविवारी सकाळी नरखेड तालुक्यातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक होईल... त्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे शेतीची पाहणी आणि जलसंधारण कामांचा आढावा घेतील...
CBSE बोर्डाने दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे... दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षा 16 फेब्रुवारी 2027पासून सुरू होणार आहेत... दहावीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 पर्यांत तर बारावीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2027 पर्यंत असेल... या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकूण 46.3 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत... यामध्ये इयत्ता 10वीचे सुमारे 26.5 लाख, तर इयत्ता 12वीचे 19.8 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
Maharashtra News LIVE 07 November 2026 : महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मुंबई-पुणे ब्रेकिंग न्यूज, राजकीय बातम्या, हवामान अपडेट्स आणि ताज्या बातम्या वाचा. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, राजकारण, हवामान आणि स्थानिक बातम्या live on zee 24 Taas marathi news.