)
Kolhapur Gokul Election : उद्या ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक होणार.. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय.. निवडून आलेल्या 25 सदस्यांसोबत शासनाने नियुक्त केलेले 4 ही सदस्य मतदान करणार.. शासनाने नियुक्त केलेल्या चार सदस्यांची मतदान केलेली मतं वेगळे ठेवले जाणार.. सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्रफी केली जाणार..
राज्य शासनाकडून केलेली अध्यादेश स्थगिती मागणी फेटाळली.. अध्यादेश बरोबर की चूक? हे अद्याप ठरले नाही.. पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार.. संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन.
Sangli Judge Death : विजेचा धक्का लागून वसईमधील न्यायाधीशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...अजित मोटे असं मृत न्यायधीशाचं नाव आहे...अजित मोटे हे पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते...दिवाळी सुट्टी निमित्ताने ते आपल्या मूळगावी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात आले होते... रविवारी दुपारच्या सुमारास मोटे यांच्या घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये आग लागल्याचा प्रकार घडला होता ही आग नेमकी कशाने लागली हे पाहण्यासाठी मोटे शेतामध्ये गेले... त्यावेळी शेतामध्ये जमिनीवर पडलेल्या 11 kv च्या वायरवर पाय पडला... ज्यामध्ये त्यांच्या जागीचं मृत्यू झाला आहे.. या घटनेमुळे मोटे परिवारासह देशिंग गावावर शोककळा पसरली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nagpur : वाढदिवसाच्या पार्टीत फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरातील देवनगर परिसरात घडलीय... अमन ऊर्फ बॉबी सुनील सपाटे असं मृत तरुणाचं नाव आहे.. मित्र प्रसाद राऊत याच्या वाढदिवसासाठी अमन देवनगरमध्ये गेला होता.. यावेळी फटाके फोडण्यावरून तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.. यात अमन गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पोलीस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जातोय...
Nashik : नाशिक शहरात गेल्या 24 तासात प्रदूषण पातळीचा उच्चांक ...नाशिकचा AQI 323 वर, प्रदूषण वाढलं...फटाक्यांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली...रामकुंड परिसरासह शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी...आतषबाजीनंतर परिसरात धुराचे लोट
उद्धव ठाकरे आज शरद पवारांची भेट घेणार ...प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी घेणार भेट ...मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन घेणार भेट ...दरम्यान दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते सिल्व्हर ओक निवासस्थानी आराम करत आहेत...
Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातही हवेची गुणवत्ता घसरली ...पुण्यातील हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत...शिवाजीनगरमध्ये हवेचा गुणवंता निर्देशांक 204 वर...फटाक्यांमुळे पुण्यात चौफेर धुराचे लोट ...दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसाच्या निरीक्षणामध्ये काल लक्ष्मीपूजन दिवशी सर्वाधिक वायू प्रदर्शन नोंदवले गेले आहे...
Pune : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात 81 ठिकाणी आग...आगीच्या कोणत्याही घटनेत जीवितहानी नाही...अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण...नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल लक्ष ठेवून
Mumbai : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा यंदा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घसरला आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस मोठ्या पाणीकपातीची वेळ येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने आत्तापासूनच राज्य सरकारच्या दारात धाव घेतली आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतील राखीव पाणीसाठ्यातून पाणी देण्याची मागणी मुंबई महापालिकेने केली असून, याबाबत राज्य सरकारला पत्रही पाठविण्यात आले आहे. याबाबत प्राथमिक चर्चेत राज्य सरकारनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे.
राज्यातील SIR मोहिमेचा 190 विधानसभा मतदारसंघांना मोठा फटका बसला आहे...विविध कारणांमुळे राज्यभरातील तब्बल 2 कोटी 70 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत...याचा थेट 190 विधानसभा मतदारसंघांना फटका बसणार आहे... काही ठिकाणी वगळलेल्या मतदारांची संख्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक असल्याचं दिसतंय...मुंबईतील कुलाबा मतदारसंघात तर 2024मध्ये झालेल्या प्रत्यक्ष मतदानापेक्षा अधिक नावं वगळल्याचं समजतंय....प्रारूप मतदार यादीवर हरकती किंवा दावे दाखल करण्यासाठी तसेच नव्याने अर्ज करून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे....असे असले तरी समोर आलेली आकडेवारी मोठी आहे..
Delhi Air : फटाक्यांमुळे दिल्लीची हवा बनली विषारी ...राजधानीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 366वर ...अनेक ठिकाणची हवा अंत्यत खराब श्रेणीत ...नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर ...विषारी हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला
Mumbai Pune Traffic : ऐन दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास गैरसोयीचा...कनेक्टिंग लिंकला जोडणाऱ्या 2 मार्गिका बंद...पाचपैकी 2 मार्गिका दुरुस्तीच्या कामासाठी बंद..ऐन दिवाळीत दुरुस्ती काम हाती घेतल्यानं प्रवाशांची गैरसोय..पुढील 4 ते 5 दिवस दुरुस्तीकाम सुरू राहण्याची शक्यता
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Dharashiva : धाराशिवच्या येडशी इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली होती...या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे..दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे...येडशीतील किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावरील घराला आग लागली...या आगीने काही क्षणांत रौद्ररुप धारण केलं...त्यामुळे घरातील लोकांना बाहेर पडता आलं नाही... आणि इथंच त्यांचा मृत्यू झालाय...
Cancer Medicine : कॅन्सरच्या रुग्णांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय...कॅन्सरशीसंबंधित 137 औषधांच्या किमती आजपासून लक्षणीयरित्या कमी होणार आहे...सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील नफा निश्चित केल्यामुळे दरात मोठी घट झाली आहे...या 137 औषधांचे नवीन सुधारित दर आजपासून लागू झाले आहेत...कॅन्सरच्या औषधांच्या किमतीविषयी अभ्यास करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालयाने तज्ज्ञ समिती स्थापन केली होती...या समितीच्या शिफारशींनुसार एनपीपीएने औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..
Kolhapur : गोकुळसंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारी आघाडीनं आव्हान दिलंय... मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये यासंदर्भात याचिका दाखल केलीये...यावर आज सुनावणी होणाराय... कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात म्हणजे गोकुळवर शासन नियुक्त 4 संचालक नेमून त्यांना मताचा अधिकारी देण्याचा राज्य सरकारनं घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचं म्हणणं समविचारी आघाडीचं आहे... हा अध्यादेश रद्द करण्यासाठी राजर्षी शाहू समविचारी आघाडीनं रविवारी याचिका दाखल केलीय...राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली... राज्यपालांनीही त्याचा वटहुकूम काढला आहे...मात्र, हा वटहुकूम बेकायदेशीर असून तो रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलीय...
Kolhapur : गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय...सरकारने शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद आणखी वाढलाय...निर्णयाविरोधात आज समविचारी आघाडीने कोल्हापुरात संघर्ष मोर्चाची हाक दिलीय...महायुतीकडून गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप सतेज पाटलांनी केलाय.. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय...गोकुळवर कब्जा करण्याचा सरकारचा कुठलाही इरादा नाही, केवळ वैधानिक पेच टाळण्यासाठीच आपण शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं...
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 09 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.