• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 10 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Live Now

Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 10 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 10 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 10, 2026, 07:15 IST|Updated: Nov 10, 2026, 17:48 IST
joinshare
Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 10 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Image Credit: LIVE BLOG TICKER
10 Nov 2026 17:48 IST
share

"पूर्णेकर प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करा"

Dombivli : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक न झाल्यास ठाणे जिल्हा बंद करण्याचा इशारा आयरे ग्रामस्थांनी दिलाय... डोंबिवलीतील आयरे गावात प्रदीप पूर्णेकर यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.. गावातील हनुमान मंदिरासमोर पूर्णेकर यांची रांगोळी साकारत ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र या श्रद्धांजलीसोबतच हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणीही करण्यात आली. भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केलीय... न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय...

10 Nov 2026 17:46 IST

गोकुळ दूध संघावर अखेर महायुतीची सत्ता

Gokul : सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघावर अखेर महायुतीने सत्ता मिळवलीय... अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांनी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा 16 विरुद्ध 13 मतांनी पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.. या निवडणुकीत एकूण 29 मतं पडली. पहिल्या टप्प्यात निवडून आलेल्या संचालकांच्या मतमोजणीत चुयेकर यांना 13, तर राजेश पाटील यांना 12 मते मिळाली होती. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात शासननियुक्त संचालकांच्या मतमोजणीत राजेश पाटील यांना 4, तर चुयेकर यांना 1 मत मिळालं. अखेर 16 मतांसह राजेश पाटील यांनी अध्यक्षपदावर विजय मिळवला. या निकालाने सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का बसलाय...

10 Nov 2026 16:59 IST

लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील घणसोली परिसरात लाकडी फर्निचरच्या गोदाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका मोकळ्या भूखंडावर असलेल्या या फर्निचर गोदाऊनला अचानक आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केलं.. या आगीत संपूर्ण गोदाऊन जळून खाक झाले असून परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरलेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीए...

10 Nov 2026 14:20 IST

NCP विलीनीकरणाबाबत शरद पवार, सुनेत्रा पवार ठरवतील- देवेंद्र फडणवीस

'विलिनीकरणाबाबत शरद पवार, सुनेत्रा पवार ठरवतील'...फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया...'दादा-सुनेत्रा पवारांच्या कामात फरक आहेच'...'विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच सांगू शकतात'

10 Nov 2026 13:54 IST

अर्थखातं आम्हाला मिळालंच पाहिजे-सुनील तटकरे

 'अर्थखातं आम्हाला मिळालंच पाहिजे'...राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंचं वक्तव्य... 'अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला'...अर्थखातं राष्ट्रवादीला मिळावं, तटकरेंची मागणी

10 Nov 2026 13:24 IST

NCP विलीनीकरण न होता तिसरा गट निर्माण होईल- संजय शिरसाट

'विलिनीकरण न होता तिसरा गट निर्माण होईल'...राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शिरसाटांचा दावा..दोन्ही गट मिळून तिसरा गट होऊ शकतो- शिरसाट...शिरसाटांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

10 Nov 2026 12:55 IST

मुंबईच्या भांडुपमधील ड्रीम्स मॉलला आग

मुंबईच्या भांडुपमधील ड्रीम्स मॉलला आग ...मॉलच्या तळमजल्याला आग...शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज ...सुदैवाने जीवितहानीचं कुठलंही वृत्त नाही

10 Nov 2026 12:30 IST

आयआरसीटीसीची ऑनलाईन बुकिंग सेवा ठप्प

आयआरसीटीसीची ऑनलाईन बुकींग सेवा ठप्प..गेल्या काही तासांपासून रिझर्वेशन बुकींग ठप्प...सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्य़ाची माहिती...रेल अॅपवरुन कुठलेही अकाऊंट लॉग इन होत नाही
 

10 Nov 2026 11:52 IST

गोकुळ अध्यक्ष निवडणुकीवेळीच महायुतीची सभा

Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवडणुकीवेळीच महायुतीची सभा ..कोल्हापुरातील गोकुळ चौकात जाहीर सभा ...हसन मुश्रीफांसह महायुतीचे नेते उपस्थित राहणार ...एकीकडे गोकुळ अध्यक्ष पद निवड प्रक्रिया. तर दुसरीकडे महायुतीची गोकुळ चौकात सभा

10 Nov 2026 11:20 IST

गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुतीकडून 3 नावांची चर्चा

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ अध्यक्ष पदासाठी महायुतीमध्ये एकूण तीन नावांची चर्चा आहे. पहिलं नाव चंदगडचे माजी आमदार गोकुळचे ज्येष्ठ संचालक राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे... दुसरे नाव शिवसेना शिंदे गटाचा नेता गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे...तर आता त्यात आणखी एका नावाची भर पडलीय... राष्ट्रवादीकडून रणजीत पाटीलही अध्यक्षपद शर्यतीत आहेत..

10 Nov 2026 10:53 IST

प्रताप सरनाईकांनी संजय राऊतांची घेतली भेट

प्रताप सरनाईकांनी संजय राऊतांची घेतली भेट...मंत्री सरनाईक पोहोचले राऊतांच्या भांडुपच्या घरी...आमदार सुनील राऊतांकडून सरनाईकांचं स्वागत...सरनाईकांकडून संजय राऊतांना दिवाळी शुभेच्छा

10 Nov 2026 10:51 IST

अहिल्यानगरमधील ऊस उत्पादकांचं आंदोलन मागे

अहिल्यानगरमधील ऊस उत्पादकांचं आंदोलन मागे...साखर आयुक्त प्रतिनिधींनी घेतली आंदोलकांची भेट...उद्या बैठक घडवून आणण्याचं लेखी आश्वासन...उद्या शेतकरी संघटना-कारखाना चेअरमन यांची बैठक
 

10 Nov 2026 09:17 IST

30 शहरांमधील हवा अतिखराब श्रेणीत

दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले... या आतषबाजीने काही क्षणांचा आनंद मिळाला असला तरी प्रदूषणाचा बॉम्ब फुटलाय... या प्रदूषणाने देशवासियांचा श्वास कोंडलाय...देशातील 30 शहरांमधील हवा अतिखराब श्रेणीत पोहोचली असून सर्वत्र धुरकट असं वातावरण आहे...राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात धुरक्याचे संकट आहे...दिल्लीत तर 5 वर्षांतील सर्वाधिक प्रदूषित दिवाळी ठरली आहे...जगातील सर्वात 100 प्रदूषित शहरांत 93 शहरं भारतातील आहेत... 
 

10 Nov 2026 08:33 IST

मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली

Mumbai Air : दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलीयं.... मात्र, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 'समीर' अॅपवरील नोंदींमध्ये मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक बहुतांश वेळा 'मध्यम' श्रेणीतच राहिला.... मुंबई महापालिकेने रॉकेट फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही अनेक भागांत आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटताना दिसले.... आज, दिवाळी पाडव्याच्या दिवशी हे प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.... लक्ष्मीपूजनाच्या रात्रीनंतर मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाढलायं.... बीकेसी, चेंबूर, देवनार, घाटकोपर, खेरवाडी, मालाड पश्चिम आणि नेव्ही नगर येथील केंद्रांवर हवेची गुणवत्ता 'वाईट' श्रेणीत नोंदली गेली.... तरीही शहराचा सरासरी निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत राहिलायं....
 

10 Nov 2026 07:34 IST

NCP विलीनीकरणास BJPच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा?

NCP विलीनीकरणास BJPच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा?...दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक विधानं...नेतृत्व, अर्थ खात्याबाबत चर्चेचं गु-हाळ सुरु? ...NDAसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादी SPत दोन गट?...कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार? हा सर्वात मोठा प्रश्न

10 Nov 2026 07:17 IST

गोकुळ अध्यक्षपदाची आज निवडणूक

गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज फैसला होणार आहे...अध्यक्ष निवडीसाठी सभा होऊन मतदान आणि मतमोजणीही आजच पार पडेल...दरम्यान सरकारने चार संचालक नियुक्त केल्यामुळे इथं महायुतीचं पारडे जड झाले असून आमदार सतेज पाटील बॅक फूटवर गेले आहेत...औरंगाबाद खंडपीठाने अध्यादेश स्थगितीची मागणी फेटाळली आहे...तसेच ठरल्याप्रमाणेच निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत...या सर्व प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येईल...तसेच निवडणुकीचा निकाल कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन असणार आहे...दरम्यान या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या संख्येनं येणार असल्याने तणावपूर्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे...

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढे यांचे एका शब्दात उत्तर

2

हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video

3

15 वर्षांपूर्वी दुसरं लग्न; मुलगा, सून, मुलगी यांनी...; नाशिकमधील RTO अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! पत्नी म्हणाली,'ती शेवटची तारीख...'

4

टॅटू काढण्याचा विचार करताय? पडू शकते महागात, आधी जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

5

22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेट सोन्याची विक्री; महाराष्ट्रात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या सराफा बाजारात खळबळ, चिनी ‘गोल्ड पावडर'चा वापर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News LIVE : 10 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.