)
Kurla Firing : मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. हलाव पुलाजवळ 2 गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबारात विनोद पवार यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर पवार कुटुंबीयांनी न्याय मिळत नसल्याचा आरोप करत कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.. कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Terrorists Attack on Soldiers : जम्मू काश्मीरच्या कुलगामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे... दरम्यान या हल्ल्यात 3 जवान जखमी
झाल्याची माहिती आहे... सीआरपीएफच्या गस्त घालणा-या जवानांवर दुपारी सव्वा दोन वाजता हा हल्ला करण्यात आला आहे... त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे... दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना अनंतनागच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Mumbai : मुंबईतील कुर्ला भागात गोळीबाराची घटना...दोन गटातील वादातून गोळीबार..कुर्ला पश्चिम भागातील हलाव पुलाजवळ गोळीबार...गोळीबारात विनोद पवार नावाची व्यक्ती जखमी
आता बातमी सर्वांची चिंता वाढवणारी.. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीये. कोरोनाचा 'पीजे. 2. 1' हा नवा व्हेरिएंट सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत असून, त्यामुळे पुन्हा एकदा नव्या महामारीची भीती निर्माण झाली आहे. या नव्या व्हेरिएंटची सुरुवात यंदाच्या मे महिन्यात कॅनडातील ऑन्टारियो येथे झाली. या व्हेरिएंटची कोणतीही वेगळी किंवा अत्यंत गंभीर अशी स्वतंत्र लक्षणे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. नेहमीच्या सर्दी, खोकला, हलका किंवा तीव्र ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, सततची थकवा जाणवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखीच याची लक्षणे आहेत. हा व्हेरिएंट मानवी पेशींवर हल्ला करतोय असा दावा संशोधकांनी केलाय..
Ganesh Naik : मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला आग...गणेश नाईक यांच्या शासकीय बंगल्याला आग...गणेश नाईकांच्या 'पावनगड' बंगल्याला आग...अग्निशमनदल घटनास्थळी दाखल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत झी २४तासवर मोठी बातमी...'जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील'...विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य...एका वाक्यातील उत्तराने विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा बळ
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर...पुण्यात तीन कार्यक्रमांना उपस्थिती लावणार... रन फॉर युनिटी मॅरेथॉन कार्यक्रमाला हजेरी लावणार... दौ-या दरम्यान राजकीय बैठकांचीही शक्यता
Sanjay Raut on NCP : राष्ट्रवादीतून आमदार फुटणार, संजय राऊतांचा दावा...'20 ते 22 आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत'...आमदार स्वगृही परततील किंवा इतर पक्षात जातील....राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत संजय राऊतांचा दावा
भाऊबीजेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित दादांच्या आठवणीत एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी जुन्या दिवाळीच्या आनंदी क्षणांचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 'दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज असं सुळेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय..
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक...सकाळी 11 वाजता होणार बैठक...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...बैठकीतील निर्णयाकडे लक्ष
शासकीय सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिसची मुभा...राज्य सरकारच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती...सुप्रीम कोर्टाचे आदेश येईपर्यंत कारवाई थांबवली...शासकीय सेवेतील डॉक्टरांना तूर्तास दिलासा
2026 सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता...ऑक्टोबरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद...तापमानाचा पारा 1.5 अंशाचा टप्पा ओलांडणार?...सुपर अल निनोचा परिणाम
देशातील प्रमुख महानगरांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न आणखी गंभीर झालाय... देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आलीय... मुंबईतील AQI 132 ते 171च्या दरम्यान नोंदवण्यात आलाय... वांद्रे, घाटकोपर आणि चेंबूर यांसारख्या भागांमध्ये AQI 200-260 अंकांपर्यंत पोहोचली आहे... फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झालीय... लखनौ, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्येही हवेची गुणवत्ता 'खराब' ते 'अतिशय खराब' क्षेणीत गेलीय... यामुळे श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ झालीय...
जळगावात फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल 16 घटना...6 ठिकाणी कचऱ्याला आग, 8 ठिकाणी गवताला आग...अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठ्या दुर्घटना टळल्या...फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ ...अग्निशमन दलाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आज बारामतीत पत्रकार परिषद....राष्ट्रवादी विलीनीकरणावर काय बोलणार याकडे लक्ष...11 वाजता सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेणार
राजकारणाच्या सारीपाटावर नव्या घडामोडींची चाहूल लागली की राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण येतं... सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील घडामोडींमुळे असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आज या भेटीसाठी वेळ मागण्यात आल्याचं समजतंय... यापूर्वी पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.. सध्या शरद पवार मुंबईत असून पुढील काही दिवस सिल्व्हर ओकवरच विश्रांती घेणार आहेत.. या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय...
Maharashtra Breaking News LIVE : 11 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.