)
मुंबई बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार ...महायुतीच्या बैठकीत एकत्र लढण्याबाबत निर्णय ...डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता...सचिन अहिर यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती...भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार जागावाटप होईल...
PRABHADEVI : प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणविरोधी कारवाई स्थगित करण्यात आलीय.. प्रभादेवी पश्चिम इथल्या रेल्वेच्या जागेवरील संत रोहिदास चाळीतील 101 अतिक्रमित बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पथक पोहोचलं होतं... तोडकाम करणाऱ्या या पथकाने स्वत:सोबत पाडकामासाठी जेसीबी आणले होते. मात्र, स्थानिकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यांच्यासोबत शिवसेना UBTचे अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकरही रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांनी फोनाफोनी करुन ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. येथील रहिवाशांचे पुनर्वसन करुनच येथील बांधकाम पाडावे, अशी मागणी होती. परंतु, तोडकामासाठी आलेले रेल्वेचे पथक आणि पोलीस ऐकायला तयार नव्हते. अखेर अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर यांची मध्यस्थी आणि शिंदेंनी रेल्वेमंत्र्यांना केलेल्या फोनाफोनीमुळे या कारवाईला स्थगिती देण्यात आलीय.
PRIME MINISTER NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आलेला आहे... पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये निर्माण करण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचं उद्घाटन होणार होतं...मात्र हा दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असून 12 डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते या प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे....तशी माहिती स्वत: शरद पवारांनी दिलीय...
MUMBAI : मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास वेगवान आणि अखंड करण्यासाठी वरळी-वांद्रे सी-लिंकपासून बीकेसीपर्यंत, तसंच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल दोन आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी पाताल लोक अर्थात एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली... तसंच मुंबई ते वाढवण थेट जोडणी प्रस्थापित करण्यासाठी भाईंदर-उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्यात आला. एमएमआरडीएच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग ३१ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पामुळं वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, बीकेसी, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचं नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल टूला थेट जोडणी मिळणार आहे.
INDU MILL SMARAK : आखाती युद्धाचा फटका मुंबईतील इंदू मिल स्मारक कामाला बसलाय.. आखाती युद्धामुळे तांबं आणि एलपीजीच्या किंमती वाढल्या. त्यामुळे ब्राँझची किंमत वाढलीय.. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पुतळ्याचं काम रखडलंय. पुन्हा एकदा अंदाजे साडेतीनशे कोटी रूपयांचा वाढीव प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आलाय. मात्र सरकारनं गेल्या सहा महिन्यांपासून निर्णय न घेतल्यामुळे कामाला खीळ बसलीय. सुरवातीला 763 कोटीला दिलेल्या कामाची किंमत आता थेट बाराशे कोटींच्या पुढे जाणार आहे. यावर्षी हे स्मारक पूर्ण होण्याची शक्यता धूसर झालीय. स्मारकाचं काम पूर्ण होण्यास आणखी दोन वर्ष लागतील अशी शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. स्मारकातील लायब्ररी, सभागृह, संग्रहाल यांचं काम जवळपास 95 टक्के पूर्ण झालंय.
STATE TEMPRATURE : राज्यात थंडीचा जोर आणखी वाढला असून धुळ्यात पारा 6.3 अंशापर्यंत खाली गेलाय. यंदाच्या मोसमातलं राज्यातले हे सर्वात कमी तापमान ठारलंय... तर नाशिकच्या निफाडमध्येही पारा 6.5 अंशावर गेलाय... त्यामुळे थंडहवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर पेक्षा धुळे आणि निफाड अधिक थंड असल्याचं समोर आलं.. वाशीममध्येही पारा 16 अंशावर गेलाय.. रात्री आणि सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी कडक ऊन असं वातावरण सध्या राज्यातील बहुतांश भागात पाहायला मिळतंय.. एल नोच्या प्रभावामुळे थंडीचे आगमन उशिराने झाले असून पुढच्या काही दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये..
SHAHAPUR : शहापूर तालुक्यातील आसनगावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये.. एका 30 वर्षीय नराधमानं 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केलाय.. गणेश कुंदे असं या आरोपीचं नाव आहे.. पीडित मुलगी आरोपीच्या शेजारी राहात होती.. त्यामुळे ओखळीचा गैरफायदा घेत आरोपीनं या चिमुकलीला खाऊचं आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला.. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानं तीनं आईला सांगीतलं... तिची विचारपूस केली असता तीनं घडलेला प्रकार सांगीतला.. त्यानंतर पीडित मुलिच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली.. दरम्यान पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक केली... आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर पॉक्सो काद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी सामाजिक संघटना तसंच ग्रामस्थांनी केलीये..
BHANDARA : भंडा-याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरी गावाला एका खाण कंपनीने आरोग्यसेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, ज्या उद्देशाने ही रुग्णवाहिका देण्यात आली, तो उद्देशच बाजूला पडल्याचे चित्र दिसत आहे.... कारण, या रुग्णवाहिकेचा वापर गावातील गरजू रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी होण्याऐवजी खाणीत काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामगारांना मेडिकलसाठी ने-आण करण्याकरिता केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.... त्यामुळे ग्रामपंचायतीला मिळालेली ही रुग्णवाहिका नेमकी गावातील रुग्णांसाठी आहे की कंत्राटदारांच्या कामगारांच्या सोयीसाठी? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे... या प्रकारामुळे रुग्णवाहिकेच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे...
NASHIK : नाशिकच्या सातपूर परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून आणखी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील श्रीराम चौकात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ३३ वर्षीय संग्राम मिलिंद साळी यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, संग्राम साळी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून सातपूर पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे श्रीराम चौकात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून वारंवार अपघात घडत आहेत. महिन्याभरात सातपूर परिसरात पाच जणांचा बळी गेल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
BS6 VEHICLE : केंद्र सरकारने वाहनांच्या पीयूसी वैधतेत मोठे बदल केले आहेत... नव्या नियमांनुसार, नवीन बीएस-६ श्रेणीतील खासगी आणि व्यावसायिक वाहनांना पीयूसी नूतनीकरणासाठी दीर्घ मुदत मिळणार आहे...सहा वर्षापर्यंतच्या जुन्या खासगी वाहनांना आता तीन वर्षातून एकदाच पीयूसी काढावे लागणार आहे....मात्र, जुन्या श्रेणीतील वाहनांसाठी कमी वैधतेची अट कायम ठेवण्यात आली आहे....
EPFO : EPFOने नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे... नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण PFची रक्कम काढण्यासाठीची प्रतीक्षा 12 महिन्यांवरून पुन्हा 2 महिन्यांपर्यंत कमी करण्यास EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे... यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये ही प्रतीक्षा मर्यादा 2 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली होती.. आता पुन्हा जुना नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... याशिवाय, PF खात्यात अनिवार्यपणे शिल्लक ठेवण्याची मर्यादा 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे... त्यामुळे सदस्यांना त्यांच्या पात्र PF रकमेपैकी 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे...
AMRAVATI : डॉक्टर वैशाली भोसले यांच्यावर बाळ विक्रीचे गंभीर आरोप असताना आता त्यांच्याविषयी आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात घडवून आणली आहे. डॉ. वैशाली भोजने यांनी एका दाम्पत्याला विकलेल्या बाळाची खोटी प्रसूती दाखवून अमरावती महापालिकेतून जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात डॉक्टरांसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे. २०१४ मध्ये जन्मलेले हे बाळ आता १२ वर्षांचे झाले आहे. तब्बल बारा वर्षांनंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाल्याने वैद्यकीय क्षेत्रासह महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, जन्म प्रमाणपत्र देताना नियमांची पायमल्ली झाली का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
KARTIKI WARI : कार्तिकी एकादशी महायात्रेसाठी पंढरपूर गजबजलंय... देशभरातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत.. मंदिर परिसर, चंद्रभागा घाट परिसर, चौफळा, प्रदक्षिणा मार्ग, भक्तीमार्ग भाविकांनी गजबजून गेलाय... भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही भाविकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे... पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.
NASHIK : मोबाईल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केलाय.. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडलीये. पूजा यादव असं मृत महिलेचं नाव आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती आकाश जाधव हा वारंवार तिच्याशी वाद घालत आणि मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वीही पतीच्या त्रासाला कंटाळून पूजाने त्याला घरात कोंडून ठेवलं होतं... या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी आरोपी पती आकाश जाधव याला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ST SMART CARD : महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे... त्यामुळे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे..अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली....शासनाच्या निर्देशानुसार प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे...१ ऑक्टोबर २०२६ पासून हे कार्ड महिला व ज्येष्ठ नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते... आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डाची नोंदणी व वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले ..आहे. ही बाब लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंती व सुचनांचा सकारात्मक विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
CYCLONE : बंगालच्या उपसागरात मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळाला ‘अकवान' असं नाव देण्यात आलं आहे... हे चक्रीवादळ आज दुपारी आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यादरम्यान धडकणार आहे... या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे...पुढील काही तासांमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे... या राज्यांसह पूर्वोत्तर राज्य असलेल्या आसाम, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे...हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे... मध्य महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, ज्या -ज्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तेथील नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये, असं हवामान विभागाने म्हटलं आहे...
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 20 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.