)
छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्यूलर राजे होते... काही लेखकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी गोब्राह्मण प्रतिपालक ही पदवी त्यांना लावली, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय... छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते... एका धर्माचे वा एका जातीचे नव्हते, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय...
मला कधीच राजकारणात यायचं नव्हतं... मला लोकनेत्री अर्थात एक सक्षम लीडर बनायचं होतं, असं मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केलंय... पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरात असलेल्या महाविद्यालयात आयोजित लोकनेत्री या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली... यावेळी त्यांनी संवाद साधताना उपस्थित विद्यार्थिनी आणि महिलांना लोकप्रतिनिधी आणि लोकनेत्री या दोन संज्ञांमधील फरक उलगडून सांगितला...
Nashik : नाशिकमध्ये मिसळ हॉटेल्सवर FDAची छापेमारी...नामांकित 5 हॉटेल्समध्ये FDAने छापेमारी-सूत्र...स्वच्छता नियमांचं पालन होत नसल्याचं समोर...पुढील सूचना येईपर्यंत हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sanjay Raut : खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावण्यात आलाय असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय... दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी होता आता तो 150 कोटींवर गेलाय असं राऊत म्हणालेत.. राऊतांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीये..
Akola : अकोल्यात GMCमधील दोन प्रक्षिणार्थी डॉक्टरांवर हल्ला झाला. आपत्कालीन विभागात स्ट्रेचरवरून आणलेल्या एका रुग्णाने दोन प्रक्षिणार्थी डॉक्टरांवर हल्ला केला. या हल्ल्यात महिला डॉक्टर जखमी झाली. या हल्ल्याचा सेंट्रल मार्डकडून तीव्र निषेध करण्यात आला. सुरक्षेच्यासाठी मागणीसाठी मार्डकडून काम बंद आंदोलन करण्यात आलं. याप्रकरणी सरकारने कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीये.
Prakash Ambedkar : 'दुष्काळाचा महायुती,सर्व मित्रपक्षांनी खेळखंडोबा केला'...प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल ...'शेतक-यांना 5 हजार रुपये देऊन थट्टा केली'...बाजारपेठेच्या माध्यमातून मदत करावी-प्रकाश आंबेडकर
बातमीचा व्हिडीओ पाहा-
पोलीस आयुक्त देवेन भारतींनी मविआला टोला लगावलय.. 2019मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मविआच्या कालात अनेक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले आणि ते बंद पडले, असा आरोप देवेन भारतींनी केलाय.. मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे बंद झालेल्या प्रोजेक्टला पुन्हा गती मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय...
Washim : वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, आता त्याचा फटका फळबागांनाही बसू लागला आहे...नद्या-नाले कोरडे पडले, विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी घटली आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे...अशातच मालेगाव तालुक्यातील झोडगा येथील शेतकरी दिलीप मुठाळ यांची चार एकर संत्रा बाग पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे.... यंदा पाण्याअभावी जवळपास १०० संत्र्याची झाडे पूर्णतः वाळून गेले आहेत..... खरीप पिकांप्रमाणेच दुष्काळग्रस्त फळबागांचेही पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केलीये....
SANJAY RAUT : खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आणि डीलिमिटेशन बिलाला त्यांनी पाठिंबा देण्यासाठी 150 कोटींचा भाव लावण्यात आलाय असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय... दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी होता आता तो 150 कोटींवर गेलाय असं राऊत म्हणालेत.. राऊतांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीये..
AKOLA : अकोला पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्ग आरोपी विक्की शिंदेला अटक केलीय... एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे... अकोल्यातील मोठी उमरी परिसरातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला... गुप्तधनाच्या शोधासाठी नरबळी दिल्याचा खळबळजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे... याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत विक्की शिंदेला अटक केलीय...
WASHIM : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजी पाहायला मिळत असून काल तुरीच्या कमाल दराने तब्बल १० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला.... तुरीला प्रतिक्विंटल किमान ९ हजार २०० रुपये, तर कमाल १० हजार ११ रुपये दर मिळाला....काल बाजार समितीत ८५० क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली. चालू हंगामात तुरीला दुष्काळाचा फटका बसला असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटनेची शक्यता आहे त्यामुळे पुढील काळातही तुरीच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे...
AMIT SATAM : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई बुक फेस्टिव्हलचं निमंत्रण दिलंय... अमित साटम यांनी ट्विट करून हे निमंत्रण दिलं आहे. . काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि ठाकरे बंधूं एका मंचावर आले होते. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर टीका करणं टाळलं जात आहे, त्यातच आता अमित साटम यांनी हे निमंत्रण दिल्याने राजकीय वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आलं.. दरम्यान ठाकरे बंधू निमंत्रण स्वीकारणार का याकडे सा-यांचं लक्ष लागलंय..
BHANDARA : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आधीच आर्थिक संकट उभे असताना, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फायनान्स कंपनीने थेट शेतकऱ्याच्या घराला कुलूप लावून घरातील सामान बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे.... त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेत्यांनी या कारवाईविरोधात आवाज उठवला. घटनास्थळी धाव घेत फायनान्स कंपनीच्या कारवाईला विरोध केला आणि शेतकऱ्याला त्याचे घर परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला... स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर शेतकऱ्याचे घर फायनान्स कंपनीच्या ताब्यातून मुक्त करून पुन्हा शेतकऱ्याच्या हवाली करण्यात आले. या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारचे आवाहन असतानाही फायनान्स कंपन्यांकडून अशा प्रकारची कारवाई का केली जात आहे... फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे...
CHIPLUN : चिपळूण शहर आणि लोटे एमआयडीसीची जीवनवाहिनी असलेली वाशिष्टी नदी ऐन नोव्हेंबर महिन्यातच कोरडी पडली आहे...एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाची सरासरी अत्यंत कमी राहिल्याने नदीचं पात्र आटलंय... नोव्हेंबरमध्येच ही अवस्था असल्याने आगामी उन्हाळ्यात चिपळूणची परिस्थिती अधिकच नाजूक होण्याची भीती आहे...
PUNE : पुण्यातील कोथरूडमध्ये चांगल्या स्थितीत असलेल्या सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे... आशिष गार्डन रस्ता आणि वनाज कंपनीसमोरील रस्त्यावर हे काम करण्यात आलं.... नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला असून, हा जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याची टीका केली ... संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे....
BHANDARA & GONDIA RAIN : अकवान चक्रीवादळाचे पडसाद आता महाराष्ट्रातही जाणवू लागलेत.. अकवान वादळामुळे पूर्व विदर्भातील अनेक भागात पावसानं हजेरी लावलीये. भंडारा, गोंदियातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्यात.. 24 नोव्हेंबरपर्यंत या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. या पावसाचा फटका कापलेल्या भाताच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे.. मात्र या पावसामुळे रब्बी पिकांना फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
MAHARASHTRA DUSHKAL : रब्बी हंगामातील पेरणीच्या आकडेवारीची तुलना करता १९७२ च्या दुष्काळापेक्षाही यंदाचा दुष्काळ भीषण ठरला आहे... यंदा जेमतेम 20 ते 25 लाख हेक्टरपर्यंत पेरणीचा अंदाज आहे... राज्याच्या रब्बी हंगामाच्या इतिहासातील ही सर्वात कमी पेरणी ठरण्याची भीती आहे... मोसमी पावसावर एल निनोचा थेट परिणाम झाल्यामुळे राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे... पडलेला पाऊसही जुलै महिन्यातील पंधरा दिवसांतच पडला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला. राज्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची शाश्वती नसल्यामुळे रब्बी पेरण्या अत्यंत संथ गतीने सुरू आहेत...
SUNIL TATKARE : भीमाशंकरच्या कुशीत होऊ घातलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पाचा राज्य सरकारने फेरविचार करावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे. या प्रकल्पासाठी सरकारने विविध परवानग्या मिळवल्या आहेत. परंतु सह्याद्रीचा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड आणि जनभावना लक्षात घेऊन सरकार याचा फेरविचार करेल अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली आहे
PANDHARPUR WARKARI : दुष्काळामुळे ग्रामीण जणजीवनाचे गणीत विस्कळीत झाल्याचे चित्र आहे... याचा परिणाम कार्तिकीवारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येवर पहायला मिळतोय... दर वर्षी अंदाजे 12 ते 15 लाख भाविक पंढरपुरात येत असतात मात्र यंदा सुमारे 3 लाख भाविक दर्शनासाठी आल्याची माहिती आहे... वारकरी संप्रदायात कार्तिकी एकादशीला महत्त्वाचे स्थान असून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात, मात्र दुष्काळाच्या संकाटामुळे भाविकांच्या संख्येत घट झालीय...
AKWAN CYCLONE : 'अकवान' चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलंय.. या वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ओडिशामध्ये सुमारे 4 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, त्यांच्यासाठी ९ हजार ३४१ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच, ४२३ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. वादळामुळे 'ईस्टर्न रेल्वे'ने ४१ एक्सप्रेस गाड्या, तर 'साउथ ईस्टर्न रेल्वे'ने २८ एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. याव्यतिरिक्त, २९ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.हे वादळ १० राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीव्यतिरिक्त, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्येही हवामानात बदल होऊन पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 21 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.