)
MUMBAI, THANE COLD : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीत वाढ झाली असून मुंबई, ठाण्यातही गारठा वाढला आहे... मुंबईत 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालीय... तर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात पारा 12 अंशापर्यंत खाली आलाय... मुंबईकरांना आठवड्याभरापासून पहाटे सुखद गारवा जाणवत आहे... उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्याने राज्यभरात तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे... पुढील काही दिवस तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे...
RAMRAO WADKUTE : हिंगोलीच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. छातीत त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. आठ महिन्यापूर्वीच भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र उपचारादरम्यानची त्यांची झुंज संपली असून रामराव वडकुते यांचं दुर्दैवी निधन झालं असून हिंगोलीसह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
MUMBAI : मुंबईतील ताडदेव मधील हिरा मंजिल इमारतीला रात्री आग लागली.. एका वृद्ध महिला राहत असलेल्या घरामध्ये आग लागली त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली... हिरा मंदिर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती ही आग लागली...त्यानंतर आग तिस-या आणि चौथ्या मजल्यापर्यंत गेली..या आगीमध्ये आठ जणांचे रेस्क्यू करण्यात आली असून यामध्ये दोन वृद्ध दोन महिला दोन पुरुष व दोन लहान बालकांचा समावेश होता.
MANIPUR : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 18 जणांचा बळी गेला आहे. तर हजारहून अधिक जणांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.. गेल्या दोन ते तीन दिवसांत ही घटना समोर आलीये. दारू प्याल्यानंतर लोकांची प्रकृती बिघडली. ही दारु कुठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत. गंभीर बाब म्हणजे या वर्षात विषारी दारू प्यायल्याने मध्य प्रदेश, गुजरातसह 6 राज्यांमध्ये 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 22 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.