SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : 24 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 24 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Nov 24, 2026, 07:28 IST | Updated: Nov 24, 2026, 08:18 IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News LIVE : 24 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.
 

24 Nov 2026 08:16 IST

मिरा-भाईंदर महापालिकेत मांसाहारबंदीचा वाद

मिरा भाईंदर महापालिकेत मांसाहार बंदीचा वाद पेटण्याची शक्यता आहे.. महापालिकेचत्या महासभेतील जेवणातून मांसाहारी पदार्थ हद्दपार करण्यात आलेत. गेल्या सहा महिन्यांपासून केवळ शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय.. आगरी कोळी समाजाच्या शहरात मांसाहारावर बंदी का? असा सवाल शिवसेनेसह काँग्रेस नगरसेवकांनी विचारलाय.. जैन समाजाच्या एकगठ्ठा मतांमुळे सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.. महासभेतील जेवणाच्या मेन्यूवर सत्ताधारी भाजपमधूनही काही जणांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... गेल्या 25 वर्षांपासून महापालिकेच्या महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची व्यस्था केली जाते.. मात्र अचानक केवळ शाकाहारी जेवणाचा निर्णय घेतल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.. 

 

24 Nov 2026 07:31 IST

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक...अजनीजवळ दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना...दगडफेकीत ट्रेनच्या काचा फुटल्या, प्रवासी सुखरुप...सेकंड एसी कोचच्या खिडकीची काच फुटली...आरपीएफकडून तपास सुरु, गुन्हा दाखल

24 Nov 2026 07:29 IST

व्हॉट्सअॅप वेब वापरताय, सावधान!

whatsapp : सरकारने व्हॉट्सअॅप वेब वापराबाबत इशारा जारी केला आहे... गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम युनिटने सांगितले आहे की, तुम्ही संगणकावर व्हॉट्सअॅप सुरू ठेवले, तर त्यातून डेटा लीक होऊ शकतो...सायबर क्राइम युनिटने त्याबाबत एक परिपत्रक जारी करुन संवेदनशील कामासाठी व्हॉटसअॅप वेब न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES