Maharashtra Breaking News LIVE : 28 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 28 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE : 28 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.
28 Nov 2026 23:13 IST
राहुल गांधी रोज खोटं बोलत असतात- फडणवीस
CM Fadanvis on Rahul Gandhi : विरोधकांना देशाचं सरकार नव्हे तर व्यवस्था बदलायची आहे...विरोधकांना अराजकता निर्माण करायचीय...मुख्यमंत्री फडणवीसां विरोधकांवर हल्लाबोल... विरोधकांना संविधान संपवून नवं रेजीम आणायचंय... रोज खोटं बोलल्यानं लोकांना ते खरं वाटेल असं राहुल गांधींना वाटतं... मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Nov 2026 22:04 IST
वडेट्टीवारांनी पवारांवर बोलणं अयोग्य- गिरीश महाजन
Girish Mahajan on Wadettiwar & Raut : दरम्यान वडेट्टीवारांनी शरद पवारांवर बोलणं अयोग्य असून त्यांच्या जिभेला काही हाड नसल्याची टीका मंत्री गिरीश महाजनांनी केलीय... तर पवारांवर बोलणाऱ्या राऊतांवरही महाजनांनी हल्लाबोल केलाय... राऊतांनी एखादी झेपडी निवडून आणून दाखवावी... राऊतांची विधानं ही स्वत:चा पक्ष संपवण्यासारखी असल्याची टीकाही महाजनांनी केलीय.
28 Nov 2026 21:26 IST
डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार- प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Prakash Ambedkar on Delimitation : डिलिमिटेशनमुळे देश विभागला जाणार...प्रकाश आंबेडकरांचा डिलिमिटेशनबाबत मोठा दावा... खासदारांनी भाजपच्या जाळ्यात अडकू नये... डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करा...प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य.
28 Nov 2026 19:10 IST
डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा
President on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा... राष्ट्रपतींकडून विधेयक लोकसभेकडे मांडण्याची शिफारस... भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 117 (3) अंतर्गत राष्ट्रपतींची शिफारस.
28 Nov 2026 17:33 IST
शरद पवारांवर टीका करण्याएवढी वडेट्टीवारांची उंची नाही- शशिकांत शिंदे
Shashikant Shinde on Wadettiwar : डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केली.. याच टीकेवरुन शरद पवारांच्या पक्षाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येतंय.. शरद पवारांवर टीका करण्याएवढी वडेट्टीवारांची उंची नाही...वडेट्टीवारांनी पवारांवर केलेल्या टीकेवरून शशिकांत शिंदेंचा पलटवार...शरद पवारांवर टीका केल्यास त्याच पद्धतीने उत्तर देणार, शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
28 Nov 2026 14:25 IST
डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक- खरगे
Mallikarjun Kharge : डिलिमिटेशनविरोधात इंडिया आघाडीची दिल्लीत खलबतं झाली....काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेंच्या निवासस्थानी इंडियाच्या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली...या बैठकीत विधेयकातील अनेक तरतुदींना आक्षेप घेण्यात आला असून लोकसभेत विधेयकाला विरोध करण्याचं निश्चित करण्यात आलंय...इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गेंनी भूमिका स्पष्ट केली असून हे विधेयक लोकशाहीसाठी घातक असल्याचं म्हटलंय....
28 Nov 2026 13:45 IST
राहुल गांधींची आज पत्रकार परिषद
राहुल गांधींची आज पत्रकार परिषद...संध्याकाळी 5 वाजता गांधींची पत्रकार परिषद...राहुल गांधी डिलिमिटेशन विधेयकावर बोलण्याची शक्यता
28 Nov 2026 12:44 IST
मायावतींचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा
मायावतींचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा...33% महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 12:20 IST
रोहित पवार राष्ट्रवादी (SP)ची साथ सोडणार?
Rohit Pawar : रोहित पवार राष्ट्रवादी SPची साथ सोडणार?...'दादांनी वेगळा निर्णय घेतला तेव्हा विचारांच्या बाजूने लढलो'...'आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल'...डिलिमिटेशन घडामोडींवरून रोहित पवारांचं सूचक ट्विट
28 Nov 2026 11:50 IST
वडेट्टीवारांनी माफी मागितल्याशिवाय बैठकीला जाण्यात अर्थ नाही- अमोल कोल्हे
Amol Kolhe on Vijay Wadettivar : 'वडेट्टीवारांचं विधान पायावर कु-हाड मारुन घेण्यासारखं'...राष्ट्रवादी SP खासदार अमोल कोल्हेंचा पलटवार...'वडेट्टीवारांकडून मिठाचा खडा टाकण्याचं काम, त्यांनी माफी मागावी'...डिलिमिटेशनबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही- अमोल कोल्हे...वडेट्टीवारांनी बेजबाबदार विधानं टाळायला हवीत'...'सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहणार होत्या'...'वडेट्टीवारांनी माफी मागितल्याशिवाय बैठकीला जाण्यात अर्थ नाही- अमोल कोल्हे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 11:12 IST
'शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचा', डिलिमिटेशनवरून विजय वडेट्टीवारांची टीका
Vijay Wadettivar on Sharad Pawar : डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केलीय...शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे...त्यांना कुठलाही विचार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...सोबतच सत्तेशिवाय त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार नसतो...सत्तेशिवाय ते राहू शकत नाही असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 10:42 IST
इंडिया आघाडीच्या बैठकीत आप सहभागी होणार नाही
इंडिया आघाडीच्या बैठकीत आप सहभागी होणार नाही ...आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची माहिती...काँग्रेसनं दिलं होतं 'आप'ला बैठकीसाठी निमंत्रण ..आघाडीबाहेरील पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न फोल ...डिलिमिटेशनविरोधात सर्वांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न ..दिल्लीत आज इंडिया आघाडीची तातडीची बैठक
28 Nov 2026 10:15 IST
मुंबईत आज धारावी बचाव आंदोलन, उद्धव ठाकरे आंदोलनाचं नेतृत्व करणार
Mumbai : मुंबईत आज धारावी बचाव आंदोलन ...विविध मागण्यांसाठी धारावीकरांचा मोर्चा...उद्धव ठाकरे आंदोलनाचं नेतृत्व करणार...मविआ नेते मोर्चात सहभागी होणार ...कुंभारवाडा ते धारावी एक्सपिरियन्स सेंटरपर्यंत निघणार मोर्चा
NCP (SP) : डिलिमिटेशनबाबत राष्ट्रवादी SPची सोमवारी बैठक- सूत्र ...पाठिंब्याचा सस्पेन्स सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता ...बैठकीत डिलिमिटेशनच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा होणार- सूत्र...अधिवेशनाआधी राष्ट्रवादी SP खासदारांची बैठक- सूत्र
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 09:06 IST
डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट?
NCP (SP) : डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट?...राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाकडून एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही सुत्रांची माहिती...काल सुप्रिया सुळे यांनी बैठकीला येणार नसल्याचे जाहीर केले होते..यानंतर खासदार निलेश लंके बैठकीला उपस्थित राहणार अशी माहिती आली...मात्र निलेश लंके आज गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी तोरणा किल्ल्यावर जाणार असल्याने दिल्लीच्या बैठकीला येणार नसल्याचे समजते...खासदार भास्कर भगरे हे बैठकीसाठी उपस्थित राहतील अशी माहिती समोर आली होती मात्र, ते देखील आज महाराष्ट्रातच असल्याची माहिती आहे...त्यामुळं पक्षाचा दिल्लीतील एखादा प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहिल अशी सुत्रांची माहिती...मात्र एकही खासदार बैठकीला नसतील असे सूत्रांनी सांगितले
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 08:28 IST
कोकणवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका
कोकणवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका....नव्या वर्षात चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला...रखडलेल्या चिपळूण उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात...31 डिसेंबरपूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचं नियोजन
28 Nov 2026 08:11 IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Western Railway Traffic Disrupted : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत...बोरिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड लाईनमध्ये बिघाड...प. रेल्वेची लोकल वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने...प. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवाशांचे हाल
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 07:34 IST
दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक
India Aghadi Meeting in Delhi Today : इंडिया आघाडीची आज दिल्लीत तातडीची बैठक ...डिलिमिटेशनविरोधात रणनीती ठरवली जाणार ...मित्रपक्षांसह आघाडीबाहेरील पक्षांना सोबत घेण्याची धडपड ...राष्ट्रवादी SP, द्रमुकबाबत काँग्रेस आशावादी ...आप, बिजू जनता दलालाही बैठकीचं आमंत्रण ...मल्लिकार्जुन खर्गेंच्या निवासस्थानी आज सकाळी 11.30 वाजता होणार बैठक
बातमीचा व्हिडीओ पाहा-
28 Nov 2026 07:32 IST
डिलिमिटेशनसाठी स्वतंत्र आयोगात 3 सदस्य असणार, ज्ञानेश कुमारांची वर्णी लागण्याची शक्यता
Delimitation : मतदारसंघ पुनर्चना आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असणार?...विधेयकातील कलम 3 नुसार केंद्र सरकार स्वतंत्र पुनर्रचना आयोग स्थापन करणार...आयोगात तीन सदस्य असणार...सुप्रीम कोर्टाचे विद्यमान किंवा माजी न्यायमूर्ती आयोगाचे अध्यक्ष...अध्यक्षांसोबत आयोगात दोन सदस्य असणार...मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या आयुक्तांची नियुक्ती ...मतचोरीच्या मुद्द्यावरून ज्ञानेश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर असताना देशाचा राजकीय नकाशा बदलण्याची जबाबदारी असणाऱ्या आयोगात देखील त्यांची वर्णी लागणार का? याकडे लक्ष लागले आहे
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.