)
गणोशोत्सव, नवरात्र सण साजरे करताना ज्यापध्दतीने नियोजन केले जाते त्याचप्रमाणे पनवेल मनपा प्रशासनाच्या वतीने छठपूजा साजरी करताना नियोजन केले जात आहे. पनवेल मनपाचे महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालिका प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधा छठपूजा स्थळी करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आलेय. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 22 ठिकाणी आज आणि उद्या छठपूजा उत्सव साजरा करण्यात आला . या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन व व्यवस्थेचा आढावा घेत प्रशासनाला चोख उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते
कौटुंबिक वादातून एका आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडू घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातल्या देशिंग मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.प्रीती मनोहर राठोड (वय २५) आणि मुलगा श्रीहंन मनोहर राठोड (वय २) अशी मृतांची त्यांची नावे आहेत.दोघेही मूळचे विजापूर येथील रहिवासी असून ऊसतोडीसाठी देशिंग येथील देसाई वस्ती येथे प्रीती आपल्या पतीसह मुक्कामास होती. शनिवारी दुपारनंतर किरकोळ वादानंतर, आपल्या दोन वर्षाच्या मुलासह प्रीती राठोड ही बेपत्ता झाली होती,त्यानंतर शोध सुरू केला असता,जवळच असणाऱ्या एका शेतातल्या विहिरीमध्ये मृत प्रीतीचे चप्पल आढळून आले,त्यानंतर विहिरीमध्ये शोध घेतला असता माय-लेकाचा मृतदेह आढळून आला आहे.
मुख्यमंत्री छठ पूजेला जुहू चौपाटीला पोहचले
- बीड ग्रामीण पोलिसांकडून तपासाला वेग, घटनास्थळाचा आज केला जाणार पंचनामा.
- चार आरोपी निष्पन्न, दोघांना नोटीसा बजावल्या तर दोन आरोपींचा शोध सुरू.
- बीड शहरालगतच्या चऱ्हाटा फाटा परिसरातील एका 35 वर्षीय महिलेच्या घरी शुक्रवारी दुपारी चार आरोपी दोन चारचाकी गाड्या घेऊन दाखल झाले आणि अज्ञात कारणासाठी अपहरण करून गाडीत डांबून नेले.
- पिडीतेच्या लहान मुलासह मुलीला देखील मारहाण करत जीवे मारण्याची दिली होती धमकी.
- शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरातुन आरोपींच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यात आलेली आहे.
पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मोहोळ कुटुंबीयांनी अमित शाह यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करुन स्वागत केले. अमित शाह यांनी मोहोळ यांच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करत त्यांच्याशी संवाद साधला...
मुंबईतील व्यावसायिकाकडे डी कंपनीच्या नावाने ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप..
पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची व्यावसायिक मोहम्मद फारुख शेख यांची मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांच्याकडे लेखी तक्रार.
बांधकाम व्यावसायिक रिजवी यांची पत्नी रुबीना रिजवी आणि गुंड रियाज भाटीविरोधात तक्रार.
वकिलांची फी आणि रिजवी यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणातील NOC वरून वाद झाल्याचा तक्रारदाराचा दावा.
२७ सप्टेंबरला रियाज भाटी याने स्वतःला D-कंपनीचा सदस्य सांगत ५ कोटींची खंडणी मागत धमकावल्याचा आरोप.
रियाज भाटी याआधीही अश्या अनेक प्रकरणात आरोपी असून सध्या तो जामिनावर आहे.
व्यावसायिकाच्या हॉटेलमध्ये जाऊन कथितपणे धमकी देतानाचा रियाज भाटीचा व्हिडिओ आला समोर.
दिवाळी सुट्टीत कोकणात पर्यटनाचा आनंद लुटून परतीचा प्रवास करणारे मुंबईकर आणि पर्यटक मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकले. माणगाव बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगावमध्ये होत आहे वाहतुक कोंडी.
प्रसिद्ध बद्रीनाथ धाममध्ये रविवारी निसर्गाचे एक विलोभनीय हिवाळी दृश्य पाहायला मिळाले. हिवाळ्यातील कडक महिन्यांसाठी मंदिर बंद होण्याच्या अवघ्या २४ तास आधी या पवित्र हिमालयीन तीर्थक्षेत्रावर ताजी बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम आणि लगतच्या उंच भागात हवामानात मोठा बदल झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल
पुणे विमानतळावर विशेष विमानाने उतरले आहेत
मुंढव्यात असणाऱ्या भारत फोर्ज या कंपनीचा 60 वा वर्धापन दिन समारंभासाठी दाखल होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले भारत टॅक्सी चे उदघाट्न
समवेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कंपनी च्या भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूज
१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास CSMT रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याची माहिती GRP नियंत्रण कक्षाला मिळाली.
धमकीची माहिती मिळताच RPF, GRP, मुंबई पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांकडून CSMT स्थानकात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली.
RPF च्या श्वानपथकाकडून उपनगरीय आणि मेल-एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म, FOB, पार्सल विभागासह संपूर्ण स्थानकाची तपासणी.
स्थानक परिसरासह रेल्वे गाड्यांमध्येही कसून तपासणी करण्यात आली.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 15 Nov 2026: राज्यामध्ये अनेक घडामोडी सुरु आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले भारत टॅक्सीचे उदघाट्न. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबईमधील धक्कादायक माहिती म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास CSMT रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आल्याची माहिती GRP नियंत्रण कक्षाला मिळाली. अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. ब्लाॅगमधील अपडेट्स वाचण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा.