• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /LIVE UPDATES: लोकांना होणाऱ्या त्रासाचे रुपांतर उमेदवारांच्या विजयातून दिसेल- विश्वजीत कदम
Live Now

LIVE UPDATES: लोकांना होणाऱ्या त्रासाचे रुपांतर उमेदवारांच्या विजयातून दिसेल- विश्वजीत कदम

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 October 2026 : Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 October 2026 : सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोशल मिडियावर अश्लील टिप्पणी करणं सांगलीतल्या डॉक्टरला भोवलंय. 33 कोटी खर्चून उभारलेल्या मुंबईतील कांदळवनाला उद्घाटनाचा मुहूर्त मिळेना.गोराईतील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कांदळवन उद्यान नागरिकांसाठी बंद आहे. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.

Reported ByPravin Dabholkar
Published: Oct 23, 2026, 04:27 PM IST|Updated: Oct 23, 2026, 05:57 PM IST
joinshare
LIVE UPDATES: लोकांना होणाऱ्या त्रासाचे रुपांतर उमेदवारांच्या विजयातून दिसेल- विश्वजीत कदम
Image Credit: लाईव्ह अपडेट्स
23 Oct 2026 17:57 IST (IST)
share

दिवाळी बोनस 35 हजार रुपये द्या, शिक्षकांची महापौरांकडे मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम यंदा वाढवून 35 हजार रुपये करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक नेते प्रा. डॉ. विशाल कडणे यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे.मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान दिले जाते. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना 31 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. मात्र, सध्या वाढत असलेली महागाई आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती लक्षात घेता यंदा या अनुदानात वाढ करून ते 35 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

23 Oct 2026 17:48 IST (IST)

पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावेळी पैसे वाटपाचा आरोप,व्हिडिओ चर्चेत

 

पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येत आहे. बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा श्वेता नाळे यांचे पती योगेश नाळे हे कथित पैसे वाटपाच्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.महायुतीच्या बूथवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी निवडणूक प्रशासनाकडून चौकशी झाली आहे का, तसेच संबंधितांकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

23 Oct 2026 17:45 IST (IST)

बारामतीत महायुतीकडून उघडपणे पैशांचा बाजार मांडून 'व्होट चोरी'- वडेट्टीवार

 

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत बारामतीत महायुतीकडून उघडपणे पैशांचा बाजार मांडून 'व्होट चोरी' सुरू आहे! पराभवाच्या भीतीने थेट मतेच खरेदी करण्याचा हा भ्रष्ट प्रकार लाजीरवाणा असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 'चहा-नाश्त्याच्या खर्चाच्या नावावर महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीला मूर्ख बनवता येणार आहे. पैशांचा पूर वाहून लोकशाही लुटण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी महायुतीचा दारुण पराभव निश्चित आहे. महाराष्ट्राचे जागरूक मतदार या 'व्होट चोरांना' त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत!निवडणूक आयोगाने केवळ बघ्याची भूमिका घेऊन या मत चोरीला मूक संमती देऊ नये, या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन व्हिडिओमधील संबंधित पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

23 Oct 2026 17:33 IST (IST)

लोकांना होणाऱ्या त्रासाचे रुपांतर उमेदवारांच्या विजयातून दिसेल- विश्वजीत कदम


महाराष्ट्रातला तरुण अस्वस्थ आहे, महागाई वाढली,कायदा सुव्यवस्था बिघडली आहे,समाजातील लोकांना जो त्रास होतोय,त्याचं रूपांतर पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयातून दिसेल,असा विश्वास आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे,सांगलीच्या तासगाव मध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

23 Oct 2026 17:30 IST (IST)

सुनेत्रा पवारांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस

सुनेत्रा पवारांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाची चौकशीसाठी नोटीस आहे. मागील १५ दिवसांपासून पोलिसांच्या तपासाचा वेग वाढला असून या केसशी संबंधित अधिकारी, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय यांना चौकशीसाठी नोटिस गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

23 Oct 2026 16:36 IST (IST)

26 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे नवी मुंबईत

 

26 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे नवी मुंबईत मनसे वाहतूक सेनेचा सिडकोत मेळावा आणि एक्झिबिशनला असणार आहेत. मेळाव्यासोबत वाहतुकीच्या मोठ्या कंपन्यांच्या एक्झिबिशन देखील भेट देणार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 October 2026 :  दुष्काळ परिस्थितीत पाणी टंचाईचे मोठे संकट समोर असताना पाणी वाचवण्याची जबाबदारी असणा-या महापालिकेच्या मुख्यालयातच गट नेत्याची गाडी धुण्यासाठी पाण्याचा अपव्यय केला जात असल्याचा प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या 5 मतदारसंघात मतदान संपलंय. 5 जागांसाठी एकूण 182 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. महायुती आणि मविआत मुख्य लढत असली तरी दोन्ही बाजूंची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. खासदार सुप्रिया सुळेंकडून भाजप उमेदवार कौस्तुभ गावडेंचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. पक्षाचं चिन्ह असलेलं उपरणं घालून गावडे मतदान केंद्रावर कसे असा सवाल सुळेंनी विचारलाय.