)
नाशिकमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आता एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नाशिक पोलिसांच्या SIT ने ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाची आणखी एक संधी
SIR प्रक्रियेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) म्हणून नोंद झालेल्या मतदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा
मसुदा मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या मतदारांना अंतिम यादीत नाव नोंदवण्याची आणखी एक संधी
अशा मतदारांची बूथनिहाय यादी मतदान केंद्रे आणि संबंधित सरकारी कार्यालयांत पुन्हा प्रसिद्ध केली जाणार
उद्या सकाळी ११ वाजता शरद पवार यांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार
उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट सिल्वर ओक निवासस्थानी घेणार भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खासदार सुप्रिया सुळेंना फोन
ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीविषयी घेतली माहिती
शरद पवारांवर ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांची भेट घेणार.
थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या भेटीसाठी ब्रिच कॅण्डी रुग्णालय येथे जाणार..
शरद पवार यांच्यावर ब्रिच कॅन्डी रुग्णालय येथे सुरू आहेत उपचार.
सरन्यायाधीशांवरील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी केरळ काँग्रेसच्या अडचणी वाढल्या, सुप्रीम कोर्टाकडून केरळ प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अवमानना कारवाई का करू नये, सुप्रीम कोर्टाचा सवाल, संविधान सर्वोच्च आहे. कोणतीही व्यक्ती किंवा राजकीय पक्ष संविधानापेक्षा मोठा नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
Maharashtra Breaking News Today LIVE: राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खासदार सुप्रिया सुळेंना फोन, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या प्रकृतीविषयी घेतली माहिती. शरद पवारांवर ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरु. सरन्यायाधीशांवरील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी केरळ काँग्रेसच्या अडचणी वाढल्या. सुप्रीम कोर्टाकडून केरळ प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अवमानना कारवाई का करू नये, सुप्रीम कोर्टाचा सवाल, संविधान सर्वोच्च आहे. कोणतीही व्यक्ती किंवा राजकीय पक्ष संविधानापेक्षा मोठा नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. राज्यातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी ब्लॅाग रिफ्रेश करा