• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE : सतीश वाघोलेंची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE : सतीश वाघोलेंची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 October 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 16, 2026, 05:00 PM IST|Updated: Oct 16, 2026, 05:56 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE : सतीश वाघोलेंची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Image Credit: Maharashtra Breaking
16 Oct 2026 17:56 IST (IST)
share

Breaking News Today LIVE Updates : हा भारत देश आहे, पाकिस्तान, नेपाळ देश नाही-फडणवीस

 


-फडणवीसांची आंदोलनावर टीका
-देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न-एकनाथ शिंदे
-विरोधकांच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची टीका
-सीजेपी आंदोलनाच्या मागे परकीय शक्तींचा हात-शिंदे
-विरोधकांकडून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न-शिंदे

16 Oct 2026 17:55 IST (IST)

Breaking News Today LIVE Updates : सतीश वाघोलेंची MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती

 

सतीश वाघोले हे MPSCचे सदस्य होते, मात्र भीमनवार सक्तीच्या रजेवर गेल्यानं वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
 

16 Oct 2026 17:08 IST (IST)

Breaking News Today LIVE Updates : महायुतीत एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न

 

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत महायुतीत एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरु झालाय. अमरावतीमुळे पुणे शिक्षक आणि संभाजीनगर पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी झालीय. अमरावती शिक्षक निवडणुकीत भाजपचे बंडखोर रिंगणात उतरल्यानं शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांचं टेन्शन वाढलंय. त्यामुळेच पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेनं अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिलाय.. तर अमरावतीत राष्ट्रवादीनं शिवसेनेला मदत केली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना राष्ट्रवादी मदत करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.. 

16 Oct 2026 17:07 IST (IST)

Breaking News Today LIVE Updates : पुणे पदवीधर शिक्षक निवडणुकीत शिवसेनेनं सचिन सानप यांना पाठिंबा

 

पुणे पदवीधर शिक्षक निवडणुकीत शिवसेनेनं सचिन सानप यांना पाठिंबा दर्शवलाय. सचिन सानप यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलीय. शिवसेना भाजपलाच मदत करणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. मात्र शिंदेंनी सानप यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानं महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष टिपेला गेलाय. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांच्या उमदेवारीसाठी शिंदे आग्रही होते. मात्र भाजपनं कौस्तुभ गावडेंना उमेदवारी जाहीर केल्यानं चिवटे यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजीमुळे शिंदेंनी फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकांकडे पाठ फिरवली. सलग दोन दिवस बैठकांना दांडी मारल्यानं शिंदेंच्या नाराजीची चर्चा होती.

16 Oct 2026 17:06 IST (IST)

Breaking News Today LIVE Updates : ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीसाठी अभिजीत दीपके रवाना

दिल्लीत लहरा दो तिरंगा रॅलीचे कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क परिसरात आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दीपके निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Maharashtra News

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 October 2026 : निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात सीजेपी आक्रमक झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी लहरा दो तिरंगा आंदोलन करण्यात येत आहेत. दुसरीकडे पुणे पदवीधर शिक्षक निवडणुकीत शिवसेनेनं सचिन सानप यांना पाठिंबा दर्शवलाय. तसंच  राज्यातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी सरकारने सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात किमान १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.