Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुढे ढकलला
Maharashtra News Live Updates 22 October 2026 : आज मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. तर अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विविध अपडेट्स समोर येत आहेत. तेव्हा यासह देश विदेश सह राज्य आणि शहरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊ शकता.
Maharashtra News Live Updates 22 October 2026 : आज मुंबईतील 3 पूलांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यात सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील दिल्ली पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलीसांनी आरोपीना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलेल आहे, आज मुंबाईतील किला कोर्टात आरोपींना हजर करणार आहेत. तसेच अभिनेता रणबीर सिंह आणि रणबीर कपूर यांच्या देखील घराची आणि ऑफिसची रेकी आरोपींनी केल्याचे समोर आले आहे. यासह देश विदेश सह राज्य आणि शहरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा या लाईव्ह ब्लॉगमधून घेऊ शकता.
संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात प्रशासन सज्ज झाल आहे पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्टीला मतदान साहित्याच वाटप करण्यात येत आहे संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघात आठ जिल्ह्यांचा समावेश असून या निवडणुकीसाठी एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत हिंगोली जिल्ह्यात 36 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून 10 हजार 350 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत उद्या सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे साठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झाला असून हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता संपूर्ण निवडणुकी प्रक्रियेचा आढावा घेतला आहे सकाळपासून मतदान साहित्यांचा वाटप केल जात असून आपापले साहित्य घेऊन मतदान कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
22 Oct 2026, 1:13 PM
वाशिममध्ये बनावट दारूचा साठा जप्त; तिघांना अटक
वाशिम जिल्ह्यातील टो गावाच्या शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केलाय.या कारवाईत रॉयल स्टॅग, इम्पीरियल ब्ल्यू आणि भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्यांसह एकूण २ लाख ८२ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वैभव काकडे, अमोल काकडे आणि रवी काकडे या तिघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
22 Oct 2026, 11:01 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुढे ढकलला
तीन नोव्हेंबर रोजी पंतप्रधान बारामतीत येणार होते. मात्र आता 16 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून पवार कुटुंबाला यासंबंधीची माहिती कळवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा आता 16 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
22 Oct 2026, 9:18 AM
पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी पाच गावांतील आठवडे बाजार बंद
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. यामुळे पारगाव तर्फे असवसरी बुद्रुक, घोडेगाव, बावडा, राजगुरुनगर आणि लोणी भापकर या पाच गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. तर पात्र खासगी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी चार तासांची पगारी सवलत देणे बंधनकारक आहे.
22 Oct 2026, 8:48 AM
'इंडिया' आघाडीची आज संध्याकाळी ऑनलाइन बैठक होणार आहे.
बैठकीत आगामी १ नोव्हेंबर ला दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या भव्य सभेच्या तयारीचा आढावा घेतला जाईल. 'इंडिया' आघाडी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर एक रॅली आयोजित करणार आहे, जी 'मत चोरी'च्या मुद्द्यावर केंद्रित असेल. या ऑनलाइन बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
22 Oct 2026, 8:44 AM
आठवडाभरात मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर
गेल्या आठवड्यात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई पाचव्या स्थानी होती. मात्र या आठवड्यात मुंबईच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये तिसरे स्थान मुंबईचे आहे. अमेरिकेतील जागतिक हवा गुणवत्ता मूल्यांकन संस्था IQAir कडून प्रदूषित शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. जगातील 122 शहरांच्या यादीत मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. येथील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 166 वर असून शहरातील बहुतांश निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता आणखी खालावल्याची नोंद आहे. मान्सूनने माघार घेतल्यानंतर मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाल्याने शहरभर धूर आणि धुरक्याचे साम्राज्य; दृश्यमानतेवरही परिणाम झालाय. वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
22 Oct 2026, 8:40 AM
टायगर प्रकरणातील ४ आरोपींना आज कोर्टात हजर करणार
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणातील दिल्ली पोलिसांकडून चौघांना अटक करण्यात आली आहे, दिल्ली पोलीसांनी आरोपीना मुंबई पोलीसांच्या ताब्यात दिलेल आहे, आज सकाळी ११ : ३० च्या सुमारास मुंबाईतील किला कोर्टात आरोपींना हजर करणार आहेत.
22 Oct 2026, 8:39 AM
मनोज जरांगे पाटील यांची आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन पुरावे जाहीर करणार आहेत.या पत्रकार परिषदेत जरांगे एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करणार आहेत.
22 Oct 2026, 8:37 AM
आज मुंबईतल्या तीन बहुप्रतिक्षित पुलाच् उद्घाटन
आज मुंबईतील 3 पूलांचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यात सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन होणार असून दुपारी १ वाजता विद्याविहार पुलावरून तिन्ही पुलांचं लोकार्पण होणार आहे. यामुळे सायन–धारावी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून विद्याविहार पुलामुळे पूर्व–पश्चिम जोडणी अधिक सुलभ होणार,GMLR च्या पहिल्या टप्प्यामुळे गोरेगाव–मुलुंड प्रवासाला गती मिळण्यास मदत होईल.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.