• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE : उद्या सांगली, कोल्हापूर बंदची हाक
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE : उद्या सांगली, कोल्हापूर बंदची हाक

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 November 2026 : राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 10:16 AM IST|Updated: Nov 05, 2026, 12:42 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE : उद्या सांगली, कोल्हापूर बंदची हाक
Image Credit: Live Updates 5 nov
05 Nov 2026 12:30 IST (IST)
share

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा, सतेज पाटील यांची मोठी घोषणा

सकाळी १० वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा

05 Nov 2026 12:29 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

लोकांना आता रस्त्यावर उतरावे लागेल -  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:28 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

पहिले वोटचोरी आता सत्ताचोरी -  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:25 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

गोकुळ अमूलच्या ताब्यात देण्याचा डाव -  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:25 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

आमची रणनिती तयार आहे, ती मी काय आत सांगू शकत नाही-  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:23 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

तत्परतेनं सरकारचा निर्णय, मग अध्यादेश का नाही? -  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:22 IST (IST)

सतेज पाटील यांची पत्रकार परिषद

आमची कायदेशीर लढाई सुरू होणार आहे -  सतेज पाटील 

05 Nov 2026 12:21 IST (IST)

सतेज पाटील यांची मुश्रीफांवर टीका

१३ चं बहुमत आम्हाला, तुम्ही विरोधात का बसत नाही? सतेज पाटील यांचा हसन मुश्रीफांना प्रश्न

05 Nov 2026 12:20 IST (IST)

ज्यांना जनतेनं नाकारालं ते तज्ज्ञ कसे - सतेज पाटील

ज्यांना जनतेनं नाकारालं ते तज्ज्ञ कसे - सतेज पाटील

05 Nov 2026 12:19 IST (IST)

डेडलॉक नसून लोकशाही डेड करायचा प्रयत्न - सतेज पाटील

डेडलॉक नसून लोकशाही डेड करायचा प्रयत्न - सतेज पाटील

05 Nov 2026 12:17 IST (IST)

दोस्त दोस्त ना रहा - हसन मुश्रीफ


सतेज पाटील यांचा सोशल मीडिया खूप स्ट्राँग आहे. त्यांनी माझ्या मुलाच्या विरोधात जातीवादाचा प्रचार केला. हे योग्य नाही. काँग्रेस एकीकडे धर्मनिरपेक्षता विचार सांगते तर दुसरीकडे बंटी पाटील यांनी मात्र जातीयवादी प्रचार केला. दोस्त दोस्त ना रहा

05 Nov 2026 12:05 IST (IST)

नवी दिल्लीत तीन मजली इमारत अचानक कोसळून 2 जणांचा मृत्यू

दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात बांधकाम सुरू असलेली एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. ही घटना सकाळी १०:१५ च्या सुमारास चावडी बाजार मेट्रो स्टेशनसमोरील सत्तरा येथील शीश महल गल्लीत घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. 

 

#WATCH दिल्ली के चावड़ी बाजार में एक 3 मंजिला निर्माणाधीन इमारत का एक हिस्सा ढह गया। वीडियो घटनास्थल की है। दिल्ली पुलिस के अनुसार, इस घटना में 2 लोगों की मौत हो गई है और एक व्यक्ति घायल हुआ है। https://t.co/zKCuyyO5Yk

— ANI_HindiNews (@AHindinews) November 5, 2026

 

05 Nov 2026 11:17 IST (IST)

गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा

गोकुळमध्ये महायुतीचा दारुण पराभव होऊनही फडणवीस सरकारने मागच्या दाराने शासन नियुक्त संचालक घुसवून बहुमतावर कब्जा केला आहे. यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत मतचोरांनो शेतकरी विसरत नाही म्हणत भाजपवर सडकून प्रहार केला आहे. 

हेसुद्धा वाचा -  'भाजपाने हे लक्षात ठेवावे की शेतकरी...', ‘गोकुळ’संदर्भातील फडणवीस सरकारच्या निर्णयावरून राहुल गांधीचा संताप! काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

05 Nov 2026 11:14 IST (IST)

शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं - पडळकर

शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं,त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचं असतो,अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला.तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वेढा पडतो,पण घाबरायचा नसतं,मग तो राजकीय असेल किंवा आर्थिक असेल,वेढा किती जर पडला तर बाहेर कसं पडायचं,हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकायचं,असं विधान देखील पडळकरांनी,चक्क जयंत पाटलांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणा दरम्यान केले आहे.
 

बातमी सविस्तर वाचा - 'आपण सुसंस्कृतपणानं....', जयंत पाटील आणि पडळकर आमने-सामने येताच गोंधळ, तुफान घोषणाबाजी, अखेर व्यासपीठावरुन उठले अन्...

05 Nov 2026 11:11 IST (IST)

पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या - जयंत पाटील

अफजलखानाचा कोथळा,शिवाजी महाराजांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी काढला,असे विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकरंकडून जाहीर भाषणात करण्यात आले आहे, पडळकर यांच्या विधानावरून जयंत पाटलांनी, पडळकरांच्या इतिहासावरून खोचक टोला लगावला आहे. अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडच्या नव्हे,तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, असं सांगत,पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या,पाठ केलेले भाषण केलें, की असं होतं,असा खोचक टोला,जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. 

बातमी सविस्तर वाचा  - 'भाषणं पाठ करुन...', जयंत पाटलांनी मंचावरुनच पडळकरांना सुनावलं, महाराजांचा उल्लेख करत म्हणाले 'पुढच्या वेळी जरा...'

05 Nov 2026 10:30 IST (IST)

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट
---
विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल केला सादर
---
महायुती अभेद्य ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा
---
अमित शाह यांच्या रविंद्र चव्हाण यांना सूचना
---
महा विकास आघाडीच्या नरेटीव्हला खोडून काढा
--
विरोधकांना जशास तसे उत्तर द्या
---
महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या

05 Nov 2026 10:30 IST (IST)

सांगलीत जयंत पाटील-पडळकर एकाच व्यासपीठावर

सांगलीत कट्टर राजकीय विरोधक जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपाठीवर आले.. या कार्यक्रमात पडळकरांची एंट्री होताच दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. यावेळी जयंत पाटलांनी समर्थकांना शांततेचं आवाहन केलं.. यावेळी भाषणात पडळकरांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला हाणला... शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं,त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचं असतो,अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला. तर जयंत पाटील यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.

05 Nov 2026 10:30 IST (IST)

(एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बैठक बोलावली आहे... दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे... एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून संपाची हाक दिलीय... एसटी कर्मचारी संपावर गेल्यास ऐन दिवाळी सणात नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे... यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल...

05 Nov 2026 10:28 IST (IST)

ऐन दिवाळीत लालपरीची चाकं थांबणार?

ऐन दिवाळीत लालपरीची चाकं थांबणार?
-----
एसटीच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेकडून संपाचा इशारा
----
विविध 11 मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाचा इशारा
----
उद्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार

अधिक सविस्तर वाचा - ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?

05 Nov 2026 10:27 IST (IST)

आंदोलनस्थळी राजू शेट्टींनी केलं गोपूजन

आज वसुबारस... दिवाळीचा पहिला दिवस... मात्र ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला तरीही ऊसदराबाबत तोडगा निघालेला नाहीये.. दरम्यान आज आंदोलनाच्या ठिकाणी राजू शेट्टींनी गाय आणि वासराची पूजा करत रस्त्यावरच दिवाळी साजरी केली... आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय.. आजच्या दिवशी वाट पाहू आणि उद्यापासून सरकारला दिवाळीसाजरी करु देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय..

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Mumbai
Breaking News
Pune News

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

2

'तेव्हाच 24 तासांची वेळ सुरु होते, अन्यथा...,' पोलिसांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कायद्यातील हा नियम लक्षात ठेवा

3

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

4

मेटाला ₹200000000000 चा दंड, फेसबुकच्या चुकीचा कंपनीला दणका; तुमच्या पर्सनल डेटाचं काय?

5

IPL 2027: ऑक्शनपूर्वी CSK-SRH चा मोठा डाव, 4 खेळाडूंची अदलाबदल; कोण कोणत्या संघात एकदा पाहाच

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 November 2026 : कोल्हापुरात ऊस दरासाठी सुरू असलेलं आंदोलन पेटलंय. 46 तासांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन सुरुच आहे. उद्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सांगलीत जयंत पाटील-पडळकर एकाच व्यासपीठावर असणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आज मुंबईत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत.या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.