सतेज पाटील यांची पत्रकार परिषद
९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा, सतेज पाटील यांची मोठी घोषणा
सकाळी १० वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 5 November 2026 : कोल्हापुरात ऊस दरासाठी सुरू असलेलं आंदोलन पेटलंय. 46 तासांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन सुरुच आहे. उद्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सांगलीत जयंत पाटील-पडळकर एकाच व्यासपीठावर असणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आज मुंबईत महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहेत.या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.
९ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा, सतेज पाटील यांची मोठी घोषणा
सकाळी १० वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा
लोकांना आता रस्त्यावर उतरावे लागेल - सतेज पाटील
पहिले वोटचोरी आता सत्ताचोरी - सतेज पाटील
गोकुळ अमूलच्या ताब्यात देण्याचा डाव - सतेज पाटील
आमची रणनिती तयार आहे, ती मी काय आत सांगू शकत नाही- सतेज पाटील
तत्परतेनं सरकारचा निर्णय, मग अध्यादेश का नाही? - सतेज पाटील
आमची कायदेशीर लढाई सुरू होणार आहे - सतेज पाटील
१३ चं बहुमत आम्हाला, तुम्ही विरोधात का बसत नाही? सतेज पाटील यांचा हसन मुश्रीफांना प्रश्न
ज्यांना जनतेनं नाकारालं ते तज्ज्ञ कसे - सतेज पाटील
डेडलॉक नसून लोकशाही डेड करायचा प्रयत्न - सतेज पाटील
सतेज पाटील यांचा सोशल मीडिया खूप स्ट्राँग आहे. त्यांनी माझ्या मुलाच्या विरोधात जातीवादाचा प्रचार केला. हे योग्य नाही. काँग्रेस एकीकडे धर्मनिरपेक्षता विचार सांगते तर दुसरीकडे बंटी पाटील यांनी मात्र जातीयवादी प्रचार केला. दोस्त दोस्त ना रहा
दिल्लीच्या चावडी बाजार परिसरात बांधकाम सुरू असलेली एक तीन मजली इमारत अचानक कोसळली. ही घटना सकाळी १०:१५ च्या सुमारास चावडी बाजार मेट्रो स्टेशनसमोरील सत्तरा येथील शीश महल गल्लीत घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.
गोकुळमध्ये महायुतीचा दारुण पराभव होऊनही फडणवीस सरकारने मागच्या दाराने शासन नियुक्त संचालक घुसवून बहुमतावर कब्जा केला आहे. यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत मतचोरांनो शेतकरी विसरत नाही म्हणत भाजपवर सडकून प्रहार केला आहे.
हेसुद्धा वाचा - 'भाजपाने हे लक्षात ठेवावे की शेतकरी...', ‘गोकुळ’संदर्भातील फडणवीस सरकारच्या निर्णयावरून राहुल गांधीचा संताप! काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं,त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचं असतो,अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला.तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वेढा पडतो,पण घाबरायचा नसतं,मग तो राजकीय असेल किंवा आर्थिक असेल,वेढा किती जर पडला तर बाहेर कसं पडायचं,हे छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकायचं,असं विधान देखील पडळकरांनी,चक्क जयंत पाटलांच्या उपस्थितीत केलेल्या भाषणा दरम्यान केले आहे.
बातमी सविस्तर वाचा - 'आपण सुसंस्कृतपणानं....', जयंत पाटील आणि पडळकर आमने-सामने येताच गोंधळ, तुफान घोषणाबाजी, अखेर व्यासपीठावरुन उठले अन्...
अफजलखानाचा कोथळा,शिवाजी महाराजांनी पन्हाळागडाच्या पायथ्याशी काढला,असे विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकरंकडून जाहीर भाषणात करण्यात आले आहे, पडळकर यांच्या विधानावरून जयंत पाटलांनी, पडळकरांच्या इतिहासावरून खोचक टोला लगावला आहे. अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडच्या नव्हे,तर प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला, असं सांगत,पुढच्या वेळी जरा चांगला अभ्यास करून या,पाठ केलेले भाषण केलें, की असं होतं,असा खोचक टोला,जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
बातमी सविस्तर वाचा - 'भाषणं पाठ करुन...', जयंत पाटलांनी मंचावरुनच पडळकरांना सुनावलं, महाराजांचा उल्लेख करत म्हणाले 'पुढच्या वेळी जरा...'
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट
---
विधानपरिषद निवडणुकीतील कामाचा अहवाल केला सादर
---
महायुती अभेद्य ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा
---
अमित शाह यांच्या रविंद्र चव्हाण यांना सूचना
---
महा विकास आघाडीच्या नरेटीव्हला खोडून काढा
--
विरोधकांना जशास तसे उत्तर द्या
---
महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या
सांगलीत कट्टर राजकीय विरोधक जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर एकाच व्यासपाठीवर आले.. या कार्यक्रमात पडळकरांची एंट्री होताच दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. यावेळी जयंत पाटलांनी समर्थकांना शांततेचं आवाहन केलं.. यावेळी भाषणात पडळकरांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला हाणला... शत्रू कितीही मोठा असला,तरी घाबरायचे नसतं,त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचं असतो,अश्या शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटलांना टोला लगावला. तर जयंत पाटील यांनीही पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बैठक बोलावली आहे... दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे... एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून संपाची हाक दिलीय... एसटी कर्मचारी संपावर गेल्यास ऐन दिवाळी सणात नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे... यामुळे आजच्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल...
ऐन दिवाळीत लालपरीची चाकं थांबणार?
-----
एसटीच्या सेवा शक्ती संघर्ष संघटनेकडून संपाचा इशारा
----
विविध 11 मागण्यांसाठी राज्यव्यापी संपाचा इशारा
----
उद्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार
आज वसुबारस... दिवाळीचा पहिला दिवस... मात्र ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेल्या आंदोलनाचा तिसरा दिवस उजाडला तरीही ऊसदराबाबत तोडगा निघालेला नाहीये.. दरम्यान आज आंदोलनाच्या ठिकाणी राजू शेट्टींनी गाय आणि वासराची पूजा करत रस्त्यावरच दिवाळी साजरी केली... आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय.. आजच्या दिवशी वाट पाहू आणि उद्यापासून सरकारला दिवाळीसाजरी करु देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय..