)
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
----
राजेंद्र शिंदे यांची आज पुन्हा चौकशी
----
मंगळवारी 9 तास तर बुधवारी 8 तास चौकशी
----
राजेंद्र शिंदेंवर एसआयटी पथकाला संशय?
सौरभ दास, आशुतोष रांकाच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने पुकारलेल्या लहरा दो तिरंगा आंदोलनामुळे दिल्लीत वातावरण चांगलेच तापलं होतं...शुक्रवारी सकाळपासूनच दिल्लीत नाट्यमय घडामोडी घडत होता...सीजेपीच्या मोर्चाआधीच दिल्ली पोलिसांनी धरपकड सत्र सुरु केलं होतं...अभिजीत दिपके,नेहा बोरासह 150 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं...पोलीस कारवाईनंतर कार्यकर्ते आक्रमक झाले...महत्त्वाच्या लोकांच्या धरपकडीनंतरही तरुणांनी कनॉट प्लेस परिसरात तिरंगा फडकावला....दरम्यान रात्री उशिरा पोलिसांनी नेहा बोराला सोडलं असून दिपकेला अटक करण्यात आलीय...दिपकेला
BNSS कलम 126 आणि 170 अंतर्गत अटक केली असून थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल
युनूस शेख यांची केबल सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सहर शेख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. शिवसेना पक्ष एमआयएमसारखाच सेक्युलर आहे. आम्हाला कधीही असे वाटले नाही की शिवसेना हा केवळ हिंदुत्वाचा पक्ष आहे. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत.. अशी प्रतिक्रिया सहर शेख यांनी दिलीय
मराठवाड्यात पदवीधर निवडणुकीवरनं महायुतीत सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. दोन दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी पदवीधरचे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली होती. अमरावती शिक्षक निवडणुकीतील उमेदवारापासन हा वाद सुरू झाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या शिष्टाईला यश आलेले आहे आणि अखेर संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यात ते यशस्वी झालेत.
प्रदीप पूर्णेकरांच्या मुलानं मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, 'वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठिशी', फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द...
MPSCच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे…पेपरफुटीच्या तपासासाठी माजी न्यायमूर्ती सतीश भोसलेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित…दोन महिन्यांत समितीचा अहवाल अपेक्षित…
इंडिया आघाडी आणि सीजेपीच्या आंदोलनावर फडणवीस, शिंदेंची टीका, हा भारत असून पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका देश नाही, फडणवीसांनी ठणकावलं.... तर सीजेपी आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात, शिंदेंचा आरोप
--'शिवसेना सर्वांना सोबत घेऊन चालते'
--MIM नगरसेविका सहर शेख यांची प्रतिक्रिया
--भाजपचा उच्च शिक्षितांसोबत संवाद मेळावा
--फडणवीस डॉक्टर, वकील, प्राध्यापकांशी संवाद साधणार
दिल्लीतील कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क आज बंद असून सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा घेऊन आंदोलन करण्याचे CJP चे आवाहन,आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पार्क आज बंद,नवी दिल्ली महानगरपालिकेचा निर्णय. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यवतमाळ दौरा, शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी जाहीर सभा घेणार. एमपीएससी मधील तक्रारीची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत. सतीश वाघोलेंची MPSCच्या अतिरिक्त कार्यभार अध्यक्षपदी. वर्धा येथे दत्ता मेघे विद्यापीठ यांचा 17 वा दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार. या आणि अशा सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर...