)
संविधानाच्या कलम ३३ नुसार SC आणि ST च्या जागा वाढल्या पाहिजेत
मात्र विधेयकात अशी तरतूद नाही
2027 ची जनगणना होणार आहे
याविषयी सरकारने काही सांगितलं नाही
SC आणि ST चा शेअर मिळू नये असे सरकारला वाटते
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच डिलिमिटेशन ची जबाबदारी देण्यात येणार आहे
हे आम्हाला स्वीकार नाही
सर्व काही गोलमाल होईल
डिलिमिटेशन मध्ये हे काहीही करू शकतात
10 कोटी लोकांना मतदार सूचीतून हटवण्यात आले आहे
अशा व्यक्तीच्या हातात जबाबदारी देणार आहेत
आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये कसे डिलिमीटेशन केले हे आम्ही बघितले
हे जनरल जागेला आरक्षित करतील आणि आरक्षित जागेला जनरल करतील
सत्ता काबीज करण्यासाठी मजबूत काम हे करत आहेत
एप्रिल महिन्यात हे विधेयक आणले गेले
यांनी TMC, NCP, शिवसेना तोडून आकडे जमवले
कोण कोण साथ देणार हे आणखी पक्के नाही
देशाचे मोठे नुकसान होणार आहे
काही लोकांना समजत नाहीये
लोकशाही संपुष्टात येईल
एकदा सत्ता यांच्या हातात गेली तर हे संविधान बदलतील
मनात जे आहे ते करण्यासाठी हत्यार म्हणून वापरतील
मोदी कायमस्वरूपी चीनमध्ये जसे आहे तसे करत आहेत
RSS BJP च्या हातात सरकार राहील
मनुस्मृतीची अंमलबजावणी केली जाईल
सर्वांनी मिळून या विधेयकाच्या विरोध केला पाहिजे
पाच वाजता राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच ट्विट
माझ्या शांततेचा अर्थ सहमती समजू नका
जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पक्ष पाठिंबा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर नताशा आव्हाड यांचं ट्वीट चर्चेत
माझ्या शांततेला सहमती समझू नका असं म्हणत बिलाच्या विरोधात भूमिका कायम असल्याचे केले ट्वीट
please don’t mistake my silence for complicity. everyone who has been tagging me- I hear you, i see you. and my sincerest apologies.
— Natasha Awhad (@NatashaASpeaks) November 28, 2026
आज इंडिया आघाडीचे सर्व नेते मिळून आम्ही निर्णय घेतला आहे की, मोदी सरकारकडून संविधान दुरुस्ती विधेयक आणले जात आहे..ते लोकशाहीसाठी मोठा धोका आहे. पूर्ण सत्ता काबीज करण्यासाठी यांनी 800 पार जागा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार नेहमी सत्तेत राहण्यासाठी हे करत आहे. SC, ST सोबत यामध्ये भेदभाव होणार आहे.
अनुसूचित जाती - जमातीला मोठा धोका - खर्गे
सत्ता कायमस्वरुपी ठेवण्यासाठी भाजपचा डाव - खर्गे
डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक - खर्गे
मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्ती होण्याच्या चर्चा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे चुलतभाऊ अजित पवार यांची आठवण काढली. त्यांनी नाताळच्या दिवशी एक कौटुंबिक फोटो शेअर केला आणि एक भावनिक पोस्ट लिहिली.
प्रिय दादा, तुझी उणीव संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक क्षणी जाणवते. तुझ्यासोबत घालवलेले निखळ आनंदाचे क्षण कायम आमच्या सोबत आहेत. या आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील. https://t.co/R3UsCc0chK
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2026
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ शेअर केला त्या ते म्हणाले की, आम्ही आमच्या 'महिला शक्ती'ला एक वचन दिले होते आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
We had made a promise to our Nari Shakti and we remain committed to fulfilling it... https://t.co/ZT3TK71Psh
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2026
रोहित पवार राष्ट्रवादी SPची साथ सोडणार?
---
'दादांनी वेगळा निर्णय घेतला तेव्हा विचारांच्या बाजूने लढलो'
----
'आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल'
-----
डिलिमिटेशन घडामोडींवरून रोहित पवारांचं सूचक ट्विट
आदरणीय अजितदादांना जाऊन आज १० महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना FIR झाला ना कुठला तपास झाला.... आभाळाएवढा माणूस गेला पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही. २०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल...! #AjitdadaPawar
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 28, 2026
डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनंतर काही आमदार, खासदार नाराज
डिलिमिटेशन बिलावरून पक्षाची असलेल्या संस्पेन्स भूमिकेनं नेत्यांची खदखद
आधीच विलनीकरणाच्या चर्चेनं पक्षात संभ्रमाचं वातावरण
पक्षांच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची नेत्यांची नाराजी
काही आमदार आणि खासदारांनी एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली नाराजी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदार एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली खदखद
शिवसेनेनंर शरद पवार गटाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा
'शरद पवार भाजपच्या कुटील डावात अडकणार नाहीत'
---
'राष्ट्रवादी SP खासदार डिलिमिटेशनविरोधात मतदान करतील'
---
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आशा
डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून सुशीलकुमार शिंदे-प्रणिती शिंदेमध्ये मतभेद?
- डिलिमिटेशन व्हायला हवं, सुशीलकुमार शिंदेंची भूमिका
- डिलिमिटेशनवरून प्रणिती शिंदेंची राष्ट्रवादी SPवर टीका
- राष्ट्रवादी SPकडून देश आणि संविधानाशी गद्दारी- प्रणिती शिंदे
बैठकीसाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, गौरव गोगोई , कपिल सिब्बल, राजदचे मनोज झा, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी पोहोचले.
बैठकीसाठी हे नेते पोहोचले
मोहम्मद रमजान (NC)

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष सध्या आठव्या वेतन आयोगाकडे लागलं आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण हा आयोग लागू करणं केंद्र सरकारसाठी आर्थिकदृष्ठ्या सोपं असणार नाही. कारण आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी सरकारला ३ लाख कोटी रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. डॉएश बँक रिसर्चच्या अहवालातून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ गीतकार, लेखक आणि विचारवंत जावेद अख्तर यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 2026 चा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील समता भूमी, महात्मा फुले स्मारक येथे पुरस्कार देण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे.
--बसपाच्या मायावतींचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा
--33% महिला आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती
डिलिमिटेशन बिल संसदेत आल्यानंतर नंतर NDA मध्ये होणाऱ्या बदलाबाबत चर्चा… एनसीपी शरद पवार गटाच्या आगामी घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती
राष्ट्रवादीला अपेक्षित असलेले अर्थमंत्री पद याबाबत तुर्तास निर्णय होणार नसल्याची माहिती तसेच यावर पक्षीय पातळीवर चर्चा नको अशाही सूचना
एनडीएचा घटकपक्ष म्हणून पक्ष बळकटकरण्याच्या आणि अंतर्गत वाद संपुष्टात आणण्याच्या अमित शाह यांच्या सूचना
मागील आठवड्यात बुधवारी बैठक झाल्याची सूत्रांची माहिती
विदर्भात एकीकडे पाणीटंचाई असताना अकोला महापालिकेकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप आहे... सांस्कृतिक भवन परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या जलतरण तलावात पाणी भरण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा वापर झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे... या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे... मात्र सत्ताधाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून तलावाच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत केवळ दहा टक्के पाणीच भरल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय... केवळ प्रसिद्धीसाठी विरोधकांकडून आरोप केले जात असल्याची टीका केलीय...
यवतमाळमधील सिमेंटेशन प्रकल्पासाठी 50 हजार नाही लाखो झाडं तोडण्याचा डाव असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय...तसेच विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय...सोबतच रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा निर्धारही वडेट्टीवारांनी बोलून दाखवलाय...
डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जहरी टीका केलीय...शरद पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसण्याचाच आहे...त्यांना कुठलाही विचार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...सोबतच सत्तेशिवाय त्यांच्या डोक्यात कुठलाही विचार नसतो...सत्तेशिवाय ते राहू शकत नाही असा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय...
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 November 2026 : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने तातडीची बैठक बोलावली आहे. डिलिमिटेशन अर्थात परिसीमन विधेयकावरून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत सामनाच्या अग्रलेखात मोठा दावा करण्यात आलाय. महाराष्ट्र काँग्रेसकडून राहुल गांधी आणि शरद पवारांचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. राज ठाकरे आज बदलापूर आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.