• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE: शरद पवारांचा दुष्काळ दौरा रद्द
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: शरद पवारांचा दुष्काळ दौरा रद्द

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 November 2026 : राज्यासह देश विदेशातील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 02, 2026, 10:13 AM IST|Updated: Nov 02, 2026, 10:24 AM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE: शरद पवारांचा दुष्काळ दौरा रद्द
Image Credit: राज्यासह देश विदेशातील सर्व घडामोडी एका क्लिकवर
02 Nov 2026 10:24 IST (IST)
share

दिवाळीनंतर इंडिया आघाडीचे पुन्हा आंदोलन, राजधानी दिल्लीतच होणार आंदोलन

दिवाळीनंतर इंडिया आघाडीचे पुन्हा आंदोलन, राजधानी दिल्लीतच होणार आंदोलन

जर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नाही झाला तर पुन्हा आंदोलन केलं जाणार सूत्रांची माहिती

देशात इतर शहरांपेक्षा दिल्लीतच आंदोलन घेण्यावर नेत्यांमध्ये एकमत

केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी दिल्लीतच आंदोलनाची गरज, नेत्यांची भूमिका

सूत्रांची माहिती

02 Nov 2026 10:21 IST (IST)

शरद पवारांचा दुष्काळ दौरा रद्द

 

बारामती तसेच पुणे जिल्ह्यात वाढत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता, आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नियोजित दुष्काळ पाहणी दौरा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  महेबुब शेख यांनी दिली आहे. 

02 Nov 2026 10:17 IST (IST)

मुंबई महापालिकेला मिळणार नवं सभागृह; ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर - लोकसभेपूर्वी काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट

 

मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहाची क्षमता अपुरी पडत असल्याने आणि भविष्यात नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने आझाद मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ सहा मजली अत्याधुनिक नवं सभागृह उभारण्यात येणार आहे…

या नव्या सभागृहात ३३० ते ३५० सदस्यांच्या आसनव्यवस्थेचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी ३६ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

या वर्षअखेरीस बांधकाम सुरू करून दोन वर्षांत, म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृह पूर्ण करण्याचं प्रशासनाचे उद्दिष्ट

नव्या इमारतीत काय असणार?
- ९०० चौरस मीटर जागेवर ही सहा मजली इमारत असेल. 
- ⁠तळमजल्यावर ६० वाहनांसाठी पार्किंग
- ⁠पहिला-दुसरा मजला पोडियमसाठी राखीव
- ⁠तिसऱ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांसाठी जिमखाना
- ⁠चौथ्या मजल्यावर महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये 
- ⁠पाचवा आणि सहावा मजला एकत्रित करून थियेटर स्टाईलमध्ये विधानमंडळाच्या धर्तीवर सभागृहाची निर्मिती केली जाणार तर पत्रकारांसाठी स्वतंत्र गॅलरी असणार…

सध्या सभागृहात २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित अशा २३७ सदस्यांची व्यवस्था आहे…

मात्र भविष्यात प्रभागरचना आणि लोकसंख्यावाढीमुळे सदस्यसंख्या वाढणार असल्याने अधिकच्या आसनांचं नियोजन…

02 Nov 2026 10:16 IST (IST)

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंचा पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज

 

मारहाण करणारा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंचा कल्याण न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे, सुप्रीम कोर्टाने आधीचा जामीन रद्द केला होता. यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांना शरण आलेल्या म्हात्रेंची आधारवाडी कारागृहात  रवानगी झाली होती. फास्टट्रॅक कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू असून आपर्यंत या खटल्यात पंच, तक्रारदार, महत्त्वाचे साक्षीदार आणि तपास अधिकारी API प्रशांत मोरे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांच्या मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंगची फॉरेन्सिक तपासणी पाठवली असून मोबाईल जप्त न केल्याबाबत बचाव पक्षाची विचारणा देखील केली होती. आता नव्या जामीन अर्जावर ३ नोव्हेंबरला सुनावणी असून रमेश म्हात्रे याला पुन्हा जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

02 Nov 2026 10:15 IST (IST)

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई

पुणे विभागात एफडीएची धडक कारवाई

सात दिवसांत साडेतेरा कोटींचा मसाल्यांचा माल जप्त

तर सहा महिन्यांत राज्यात पुणे विभागात सर्वाधिक तपासण्या आणि नोटिसाही

23 ते 29 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 13 कोटी 60 लाखांचा मसाला जप्त

एक एप्रिल ते 29 ऑक्टोबर 2017 कालावधीत पुणे विभागात 359 आस्थापनांची तपासणी  

यामध्ये 142 आस्थापनांना सुधारणा करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्यात
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'दिवाळी कशी साजरी करायची, हे दीया मिर्झाने शिकवू नये?', BMC वर अमित साटम संतापले; पालिकेने व्हिडिओ केला डिलीट

'दिवाळी कशी साजरी करायची, हे दीया मिर्झाने शिकवू नये?', BMC वर अमित साटम संतापले; पालिकेने व्हिडिओ केला डिलीट

2

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांशिवाय राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला

3

फेअरफॅक्सकडून आयडीबीआयला आयडीबीआयच्याच पैशातून विकत घेतले जात आहे का?

4

दिवाळीआधीच ग्राहकांना धक्का, सोनं-चांदीच्या दरात मोठे उलटफेर, वाचा 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव

5

मोठी बातमी! मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तुकाराम मुंढेंना दणका, FDA च्या 'त्या' कारवाईला स्थगिती

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 2 November 2026 :  कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर प्रकरणी अद्यापही न्यायाची मागणी केली जात आहे. तसंच दिल्लीत काँग्रेसच्या रॅलीनंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आहेत. अशा राज्यासह देश विदेशातील सर्व घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या