)
दिवाळीनंतर राज ठाकरे महाराष्ट्रातील दुष्काळ दौ-यावर
दुष्काळात मनसेचा शेतक-यांना मदतीचा हात
राज्यात दुष्काळ परिस्थिती- बाहेर पडा आणि शेतक-यांच्या बाजुनं उभे रहा- राज ठाकरेंचे मनसे पदाधिका-यांना आदेश
जनावारांना चारा मिळण्यास मदत करा
राज ठाकरेंच्या मनसे बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा
दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलवरून धमकी
दिल्लीतील रोहिणी येथील वेंकटेश्वर पब्लिक स्कूल आणि मयूर विहार येथील सालवान पब्लिक स्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
सकाळी 9.37 आणि 9.57 वाजता धमकीची माहिती मिळाली
दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
प्रकरणाचा तपास सुरू
एकीकडे मुंबईला प्रदुषणाचा विळखा असताना गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १,५२४ झाडांवर कु-हाड चालवली जाणार आहे...गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी १,५२४ झाडांबाबत वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे....या प्रस्तावानुसार ६९५ झाडे तोडणार, तर ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे... वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखीनच खालावण्याची भीती व्यक्त केली जातेय..त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे...
राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत... पुणे शिक्षक मतदार संघात पैशांचं आमिष दिल्याचा आरोप उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी केलाय.... शिक्षकांना मतदानासाठी 15 हजार दिल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पुणे शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन सानप यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. काही वेळापूर्वी सानप यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं औक्षण केलंय..तसंच सानप यांनी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलंय..
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी साता-यात मतदानाला सुरुवात झाली आहे. साताऱ्यात शिक्षक मतदारसंघासाठी ४४ आणि पदवीधरसाठी ९३ अशी एकूण १३७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षक मतदारसंघाचे ९,४५४ तर पदवीधर मतदारसंघाचे ४७,४६३ मतदार आपले मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील ३५ हजार ८१० शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण २६ उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे. मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. सर्व पाचही जिल्ह्यात ८१ मतदान केंद्र आहेत सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान होणार आहे
--बुलढाण्यात पाणी उपसा बंदीच्या सूचना
--येळगाव धरणातील पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना
--17 ग्रामपंचायतींना पाणी उपसा बंद करण्याचं पत्र
जगातील सर्वात प्रदूषित शहरांत मुंबई तिसरी…बाष्पीभवनामुळे धरणामधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट…१७ दिवसांत जलसाठा ६ टक्क्यांनी घटला.
दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईची झळ...डाळींसह कडधान्याच्या दरात प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांची वाढ... कमी पावसामुळे उत्पादन घटल्याचा फटका...
ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव... खासगी बिल्डरच्या मागणीला वनविभागाची मान्यता...143 एकर फ्लेमिंगोअभयारण्याची जागा संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा प्रस्ताव...
शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी महायुतीकडून पैसे वाटप…ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप…प्रत्येक मतदार शिक्षकाला १५ हजार दिल्याचा दावा…
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026:
नितेश कराळेंना बंडखोरी भोवली... पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी.... पक्षाच्या कारवाईनंतर नितेश कराळेंना अश्रू अनावर... याचे परिणाम भोगावे लागतील... मविआला इशारा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 22 october 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत. खासगी आस्थापनांतील पात्र कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 23 october 2026: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या 5 मतदारसंघात आज मतदान होत आहे. 5 जागांसाठी एकूण 182 उमेदवार रिंगणात आहेत. तर 10 लाख 68 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. महायुती आणि मविआत मुख्य लढत असली तरी दोन्ही बाजूंची बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. त्याचबरोबर, राज्यातील व देशातील इतर ठळक घडामोडींचा आढावा घेऊयात लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून