Today LIVE Updates : कुशावर्त आणि रामकुंडावर ध्वजारोहण सोहळा संपन्न
Maharashtra Nashik Simhastha Kumbh Mela LIVE Updates 31 October 2026 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ आणि ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. यासोबतच राज्यासह देशभरातील प्रत्येक घडामोडींच्या अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळवा. सर्व महत्त्वाचे अपडेट्स या Live Blog मध्ये एका क्लिकवर मिळवा.
Maharashtra Nashik Simhastha Kumbh Mela LIVE Updates 31 October 2026 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ आणि ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. तसंच ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणावरून वातावरण तापलं आहे. तर दुपारी राजीनाम्या दिल्यानंतर मीनाक्षी शिंदेंची पत्रकार परिषद असणार आहे. तर धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. या आणि अशा अनेक राज्यातील घडामोडीसह देशविदेशातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीवर एका क्लिकवर तुम्हाला माहिती मिळणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची ध्वजारोहण सोहळ्याने सुरुवात झाली आहे. रामकुंड आणि कुशावर्तावर भव्य धर्मध्वजारोहणाने सोहळ्याचा अधिकृत शुभारंभ झाला आहे. हा ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र सोहळा साधारण 21 ते 22 महिने चालणार असून, त्याची सांगता 24 जुलै 2028 रोजी होईल. नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मंच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त इथं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महापूजा आणि ध्वजारोहण झालं. साधु-संत, महंत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुढील वर्षभरात कुंभनगरीत विविध धार्मिक कार्यक्रम, नगर प्रदक्षिणा आणि पवित्र अमृत, शाही स्नान होणार आहे.
31 Oct 2026, 11:03 AM
2027 मधील प्रमुख अमृतस्नानाच्या तारखा
पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी आषाढ सोमवती अमावस्येला होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसरे अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी श्रावण अमावस्येला प्रस्तावित आहे.
नाशिक येथे तिसरे अमृतस्नान 11 सप्टेंबर 2027 रोजी भाद्रपद शुद्ध एकादशीला,
तर त्र्यंबकेश्वर येथे 12 सप्टेंबर 2027 रोजी वामन द्वादशीला होणार असल्याची माहिती दिली जात आहे.
31 Oct 2026, 10:59 AM
रामकुंड, त्र्यंबकेश्वरमध्ये एकाच वेळी ध्वाजारोहण
नाशिकमधील रामकुंड परिसरात आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर हा धार्मिक सोहळा होणार आहे. या ध्वजारोहणाने 2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक पर्वाला सुरुवात होणार आहे.
31 Oct 2026, 10:48 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ओझरमध्ये दाखल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन झालं आहे. राज्यपाल आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं.
31 Oct 2026, 10:47 AM
नाशिकला गेले नगरसेवक संतापले
- सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी नगरसेवकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने नगरसेवक संतापले
- नगरसेवकांना बसण्यासाठी नियोजन नसल्याने झाले आक्रमक
- नगरसेवकांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत व्यक्त केली नाराजी
- ज्या ठिकाणी नगरसेवकांना बसण्याचे पास देण्यात आले होते त्या ठिकाणी प्रवेश नाकारल्याने नगरसेवक झाले नाराज
जमीन हादरली, घराच्या भिंतींना तडे, पालघरमध्ये काय घडलं?
पालघर जिल्ह्यात मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी होती. हे धक्के धानीवरी, धुंदलवाडी, तलासरी यांसह परिसरातील गावांमध्ये जाणवले. अचानक घरं हादरू लागल्याने नागरिकांची झोप उडाली आणि अनेकजण भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली.
31 Oct 2026, 10:30 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कार्यक्रम
सकाळी 11 वाजता : ध्वजस्तंभ पूजन, ध्वजपूजन, कुशावर्त, त्र्यंबकेश्वर दुपारी 12.02 वाजता : सिंहस्थ महाकुंभ ध्वजारोहण, त्र्यंबकेश्वर दुपारी 12.25 वाजता : श्रीचंद्र घाट येथे ध्वजस्तंभ पूजन, त्र्यंबकेश्वर दुपारी 3 वाजता : मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर दुपारी 3.10 वाजता : ध्वजस्तंभ पूजन व ध्वजपूजन दुपारी 3.35 वाजता : त्र्यंबकेश्वर मंदिर येथे पूजा, दर्शन सायं. 5.15 वाजता : सिंहस्थ महाकुंभमेळा मुख्य कार्यक्रम, रामतीर्थ, नाशिक सायं. 6 वाजता : गोदावरी महाआरती सायं. 7.25 वाजता : मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रस्थानप्रसंगी उपस्थिती, ओझर विमानतळ, नाशिक
31 Oct 2026, 10:23 AM
दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी ध्वजारोहण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याची तसेच ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. सुरक्षा, वाहतूक, निवास, स्वागत व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांच्या तयारीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.
31 Oct 2026, 10:22 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमधील रामतीर्थ येथे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वय राखून जबाबदाऱ्या दक्षतेने पार पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले.
31 Oct 2026, 10:21 AM
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, शृंगेरी मठाचे शंकराचार्य जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती स्वामी उपस्थित राहणार आहेत. तसंच राज्यभरातून 1317 व्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यात आखाड्यांचे प्रमुख, पुरोहित संघाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.
31 Oct 2026, 10:19 AM
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल
--वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल --महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी --पोक्सो, विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल --सुशील कराडसह तिघांवर सोलापुरात गुन्हा दाखल --पीडितांची जागा, सोनंही ताब्यात घेतल्याचा आरोप
31 Oct 2026, 10:18 AM
मुंबईच्या अंधेरीत पाईपलाईन फुटली
मुंबई मुंबईकरांना सध्या १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत असतानाच अंधेरी पूर्वेत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील गोखले पुलाखाली महापालिकेच्या टँकर पॉइंटजवळ ही घटना घडली. पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून वाया गेले.
31 Oct 2026, 10:18 AM
राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी बैठक
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील पराभव आणि महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येत्या सोमवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावलीये.. या बैठकीत पदवीधर मतदारसंघातील पराभव तसंच महायुतीमधील मतभेदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे..
31 Oct 2026, 10:18 AM
मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे... मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान ब्लॉक घेतला जाईल... तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत लोकल बंद असतील....
31 Oct 2026, 10:17 AM
मुंबईत मेट्रो 4 चा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार
मुंबई ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेसाठीची पहिली मेट्रो ट्रेन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात अल्स्टॉम कंपनीने या ट्रेनची उभारणी पूर्ण केली असून सध्या तिची चाचणी आणि तांत्रिक पडताळणी सुरू आहे,...
31 Oct 2026, 10:17 AM
संजय राऊतांच्या 'बोध कीर्तन'चं आज प्रकाशन
शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांच्या 'बोध कीर्तन' या नव्या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे...दादरमधील ब्राह्मण सहायक संघात संध्याकाळी पुस्तक प्रकाशन होईल.. या सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख व्यक्तींची उपस्थिती असणार आहे.
31 Oct 2026, 10:17 AM
दिवाळीआधी सोनेचांदीच्या दरात घसरण
सणासुदीच्या काळात सोनेचांदीच्या दरात घसरण झालीय... चांदीच्या दरात 8 हजार 300 रुपयांची ऐतिहासिक घसरण झालीय... चांदीच्या दरानं 11 महिन्यांतली नीचांकी पातळी गाठलीय... त्यामुळे आता चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 90 हजार रुपयांवर पोहोचलाय. चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही 1 हजार 300 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1 लाख 45 हजारांवर पोहोचलाय....
--आमदार दिलीप लांडेंच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसाला मारहाण --मद्यधुंद तरुणाकडून पोलिसाला मारहाण --मुंबईतील साकीनाका येथील घटना --आरोपी आसिफ शाह विरोधात गुन्हा दाखल
31 Oct 2026, 10:16 AM
इस्रोच्या नेव्हिगेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
ISRO ने आपला नेव्हिगेशन उपग्रह NVS-03 यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून GSLV-F18 रॉकेटद्वारे शुक्रवारी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर अवघ्या 18 मिनिटांतच रॉकेटचे तिन्ही टप्पे यशस्वी झाले. त्यानंतर 2,232 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा होऊन आपल्या निर्धारित कक्षेत पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण भारतात तसेच देशाच्या सीमारेषेपासून 1,500 किलोमीटरपर्यंत अचूक स्थान आणि नेव्हिगेशनची सुविधा मिळणार आहे.
31 Oct 2026, 10:14 AM
त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी बंद
त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी बंद --- राष्ट्रपतींच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर निर्णय -- काल संध्याकाळी 6पासून मंदिर भाविकांसाठी बंद --- राष्ट्रपतींच्या त्र्यंबकेश्वर दौराच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद केल्याने भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहेत --- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्र्यंबक राजाचं दर्शन घेणार असल्याने मंदिर ट्रस्टच्या वतीने देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.