)
शितल म्हात्रेंनी उद्धव ठाकरे यांचा पुस्तक स्वीकारताना फोटो फाडलाय. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मरतानाचा फोटो आहे. त्यातील मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. आम्ही असे अनेक फोटो फाडू, असे शितल म्हात्रे म्हणाल्या. सावरकर आमचे प्रेम आहे त्यांच्यावर आरोप करू नका.उद्धव ठाकरे नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा, असे शितल म्हात्रे म्हणाल्या.
सोनिया गांधींकडून सावरकरांचा अपमान केल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषज घेतली. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात सावरकरांचा अपमान झाल्याचे ते म्हणाले.सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पाने शिवसेनेचे उपनेत्यांनी फाडली. या पानांवर सावरकर यांच्याबाबत लिहिले असून सावरकरन बदनाम करण्याचे प्रयत्न केल्याचा शिवसेना उपनेत्यांचा आरोप आहे.
सोनिया गांधींकडून सावरकरांचा अपमान केल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषज घेतली. सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात सावरकरांचा अपमान झाल्याचे ते म्हणाले.
वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, आता त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशालाही बसू लागली आहे. पाण्याचे स्रोत आटत असताना पिण्याच्या पाण्याचे दरही वाढले आहेत.घरगुती वापरासह कार्यालयांमध्ये मागणी असलेल्या २० लिटरच्या फिल्टर वॉटर कॅनचे दर २०रुपयांवरून थेट ३० रुपयांवर पोहोचले आहेत.म्हणजेच प्रत्येक कॅनमागे १० रुपयांची वाढ झाली आहे.एकीकडे पाण्याची टंचाई, तर दुसरीकडे वाढलेले दर,अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत. दुष्काळाच्या झळा आता शेतशिवारापुरत्या मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. पाणी फिल्टर कॅन करिता पाणी विकत आणावा लागत असल्याने टँकरचे दर वाढल्यामुळे पाण्याचे दर वाढवण्याचे पाणी विक्रेत्या यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेला जप्त करण्यात आली आहे. कर्नाटकातील मलपी बंदरातील 'हनुमा ध्याना'या हायस्पीड नौकेवर देवगड समुद्रात मध्यरात्री थरारक पाठलाग करून ताब्यात घेण्यात आली. ९-१० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. या नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी होते. ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणण्यात आली असून तिच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाने १५ दिवसांत सलग दुसरी कठोर कारवाई केली आहे त्यामुळे स्थानिक मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाशिम बाजार समितीत यंदा सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारातील आवक मर्यादित आहे. परिणामी मागणी वाढल्याने सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा अधिक मिळत आहेत.सध्या सर्वसाधारण सोयाबीनला ७ हजार ३३० ते ७ हजार ६४० रुपये,तर ९३०५ या बीजवाई वाणाला ८ हजार १७५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. सौंदर्यीकरणं केलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागच्या भागात केवळ शीर आढळले. पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. श्वानपथकाने माग काढल्यानंतर उर्वरित धड काही अंतरावर रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जाहिरातींच्या फलकाच्या खांबाखाली आढळले. पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली आहे. या इसमाची अन्यत्र हत्या करून हे दोन्ही भाग इथे फेकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहराच्या अतिव्यस्त मध्यवर्ती भागातील घटनेने शहर हादरले आहे. मयताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
मुंबईतील बोरिवली पूर्व इथल्या संजय गांधी उद्यानाच्या पुनर्वसनाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलंय. आदिवासी आणि वनवासी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेनं जनआक्रोश मोर्चा काढला.. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांच्यावर दडपशाही आणि दमदाटीचे आरोप करत आमदार प्रकाश सुर्वे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील संजय गांधी उद्यान भागात अतिक्रमण केलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन तीन किलोमीटरच्या परिसरातच करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र, त्यांना कल्याण-शिरढोण, खोणी परिसरात घरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी नाकारल्याने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला आहे. स्वतःच्या उमेदवाऱ्या वाचवण्यासाठी माझा राजकीय घात केल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला आहे. तर हे आरोप फेटाळताना गुलाबराव देवकर यांनी सतीश पाटील यांच्यावरच पलटवार केला आहे. रात्रीच्या बैठकीला उपस्थित राहूनही आता आरोप का करता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील दोन माजी मंत्र्यांमधील संघर्ष समोर आला असून, पक्षांतर्गत नाराजी आता जाहीर आरोप-प्रत्यारोपांतून व्यक्त होऊ लागली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिकमधील १२ शाळा रडारवर आहेत. १६० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास झालाय. जळगाव, धुळेनंतर एसआयटीचा नाशिककडे मोर्चा वळलाय. एजंट प्रशांत वाडीलेकडून १२ शाळांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. राज्यभरात एक हजारांहून अधिक बनावट आयडी बनवण्यात आले. मालेगावातील महात्मा फुले संस्थाध्यक्ष सुनील वडगे अटकेत. बेकायदा नियुक्ती आणि बोगस आयडी प्रकरणी कारवाई करण्यात आली. वडगे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
राज्यात एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धरणाच्या भिंतीमधून तब्बल ३० क्युसेक्स पाणी गेल्या महिनाभरापासून वाया जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, आधीच उन्हाच्या तीव्रतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यातच आता धरणातून होणाऱ्या या पाणीगळतीमुळे उपलब्ध जलसाठ्यावर आणखी ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.
जमीन मोबदला प्रकरणात आयुक्तांच्या खुर्ची, वाहन आणि फर्निचर जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. २४ वर्षांपासून प्रलंबित जमीन मोबदला प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. जमीन मालक दिलीप शिंदोरे यांना व्याजासह ३ कोटींची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. रक्कम अदा न केल्यास आयुक्तांची खुर्ची, वाहन आणि फर्निचर जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले. १५ टक्के व्याजासह ३ कोटी ३१ लाखांहून अधिक रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. मोबदला देण्यासाठी मनपाकडून तातडीने स्थायी प्रस्ताव ठेवण्याची तयारी केली.
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत आरोप केल्यानंतर भाजपचा सर्व स्तरातून जोरदार टीकेला सुरुवात
आमदार देवेंद्र कोठे यांनी रोहित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. अजितदादांच्या मृत्यूचे राजकारण करत दुर्दैवी मृत्यूचा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याचा आरोप केला. रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी असल्याचे सांगत नेतृत्व क्षमतेवर केली टीका.महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे मंत्री झाले मात्र रोहित पवारांना मंत्रिपद न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. दोन-चार पीपीटी सादर करून पत्रकार परिषदांची स्टंटबाजी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सबळ पुरावे असतील तर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले.
नाशिक महानगरपालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्या नंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत ही आता स्वीकृत नगरसेवक पद निवड होणार अस स्पष्ट झाले आहे...! महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी म्हणजेच २० तारखेला होत आहे. त्यात स्वीकृत नगरसेवक पद निवडीच्या विषयाचा समावेश आहे. गेली नऊ महिन्यांहून अधिक काळ हा विषय विविध कारणांनी पुढे ढकलला जात होता. पण आता २० तारखेला विषय मंजूर होऊन स्वीकृत नगरसेवकांची निवड होईल अस भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले आहे.
चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वालोपे येथे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या भुयारी मार्गालगत झोलाई माऊली पार्क समोरील एका टपरीच्या मागे मंगळवारी पहाटे ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला.नवनाथ बबन कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून,त्याच्या डोक्यात जांभा दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.मयत नवनाथला दारूचे व्यसन होते आणि चार वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. ज्या ठिकाणी ही हत्या झाली,तिथे बंद टपऱ्यांमागे व्यसनी आणि गर्दुल्ल्यांचा कायम वावर असतो,त्यामुळे आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 18 Nov 2026:सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 जागांपैकी 10 जागांवर भाजपा पुरस्कृत सहकारी विकास पॅनलचे उमेदवार बिनविरोध आहेत.ठाणे भिवंडी आणि कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका ५ मधील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. एमएमआरडीएच्या कशेळी येथील डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले.दुबईत बसून भारतातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केलाय.