SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा | 12 नोव्हेंबर 2026

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 12 Nov 2026: दिवसभरातील ताज्या घडामोडींचा धावता आढावा तुम्ही या ठिकाणी एकाच क्लिकवर घेऊ शकता. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 12, 2026, 09:57 IST | Updated: Nov 12, 2026, 17:58 IST
Image Credit: घडामोडींचे वेगवान अपडेट्स
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 12 Nov 2026: मुंबई, महाराष्ट्रासहीत देश तसेच विदेशातील आज दिवसभराच्या ताज्या घडामोडींचा संक्षिप्त स्वरुपातील आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

12 Nov 2026 12:27 IST

केजरीवाल यांना लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी! 7 कोटी रुपये नाही दिले तर...

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जावे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगत धमकी देणाऱ्याने 7 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल तिलक नगरचे आप आमदार जरनैल सिंह यांना धमकीचा फोन आणि व्हॉट्सअप मेसेज आला. आमदार जरनैल सिंह यांनी मोहालीच्या एसएपी यांच्याकडे तक्रार दाखल केली. पैसे न दिल्यास अरविंद केजरीवाल आणि त्यांची मुलगी हर्षिता यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. तक्रारीच्या आधारे मोहाली पोलिसांकडून बीएनएस आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यांच्याकडे तपासाची जबाबदारी आहे. आरोपीच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स, आयपी लॉग्स आणि लोकेशनची पोलीसांकडून तपासणी सुरू आहे.  केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्याची आमदार जरनैल सिंह यांची मागणी केली आहे. 

12 Nov 2026 12:13 IST

मनसेच्या इशाऱ्यानंतर सीएसमटीवरील भोजपुरी गाणी बंद

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छटपूजेनिमित्त सुरू असलेली भोजपुरी गाणी बंद करण्यात आली आहेत. तरीदेखील, या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज दुपारी अडीच वाजता महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे. यावेळी संबंधित विषयावर अधिकृत निषेध नोंदवून रेल्वे प्रशासनाकडे संघटनेची भूमिका ठामपणे मांडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना जितेंद्र पाटील अध्यक्ष यांनी दिली आहे. 

12 Nov 2026 10:54 IST

रेल्वेने भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा...; महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा

मुंबई रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात भानावर या, आम्ही निषेध करतो, असं मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री महोदय कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार? मुंबई महाराष्ट्र विकायला काढला आहे का? राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे? आता चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे आम्हाला... महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका. रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावी अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही देशमुख यांनी दिलाय.

12 Nov 2026 10:44 IST

शिरूरमध्ये संतापजनक घटना! पोटच्या 11 वर्षीय मुलीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 11 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये जतन केल्याचेही समोर आले आहे. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

12 Nov 2026 10:31 IST

मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा साठा 8 वर्षांतील नीचांकी पातळीवर

बाष्पीभवनामुळे होणारी घट दुप्पट, असे लेखापरीक्षणात दिसून आले आहे

उन्हाळा अजून काही महिने दूर असताना, मुंबईतील पिण्याच्या पाण्याचे साठे नेहमीपेक्षा अधिक वेगाने कमी होत आहेत

नोव्हेंबर महिन्यापर्यंत, शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकत्रित साठा त्यांच्या क्षमतेच्या 84.35% पर्यंत खाली आला आहे, जो 2018 मधील याच तारखेपर्यंतचा सर्वात कमी साठा आहे

बीएमसीने सातपैकी तीन तलावांची केलेल्या स्वतंत्र तपासणीत असे आढळून आले आहे की, ऑक्टोबरमधील बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान हे गेल्या ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास दुप्पट किंवा त्याहून अधिक होते

12 Nov 2026 10:29 IST

सरकारी पैशात लॅपटॉप घ्या, चार वर्षांनी स्वतःकडे ठेवा; कोणाला मिळणार लाभ?

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना आता सरकारी कामासाठी 1.8 लाख रुपयांपर्यंतचा लॅपटॉप किंवा टॅबलेट खरेदी इन्फो करता येणार आहे. विशेष म्हणजे, सलग चार वर्षे वापरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला हे उपकरण स्वतःकडे ठेवता येईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने 10 नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

12 Nov 2026 10:29 IST

'सिंहगड इन्स्टिट्यूट'वर बडगा

44 तब्बल शाळा, महाविद्यालयांमधील जवळपास सहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांचे वेतन व आर्थिक लाभ थकवल्याने चर्चेत असलेल्या 'सिंहगड इन्स्टिट्यूट ने अनेकदा संधी देऊनही पुन्हा आदेशाचा भंग केला. त्यामुळे अखेर या संस्थेवर मुंबई उच्च न्यायालयाने बडगा उगारला आहे. 'शिक्षण संस्थांमधील पैशांचा अपहार करून तो अन्य व्यवसायांकडे वळवून मनी लॉड्रिंग झाल्याची शक्यता आहे', असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सर्व विश्वस्तांसह सर्व 44 शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याचा अत्यंत कठोर आदेश सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि प्राप्तिकर विभागाला दिला.

12 Nov 2026 10:25 IST

शेअर बाजार आठ महिन्यांच्या उच्चांकावर

पाडव्याच्या सुट्टीनंतर बुधवारी शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांची मोठी दिवाळी साजरी झाली. अवघ्या काही मिनिटांत परदेशी गुंतवणूकदारांचे बाजारात पुनरागमन झाले. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली. या तेजीमुळे बाजाराने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. संपूर्ण बाजार भांडवलात 4 लाख कोटींहून अधिकची वाढ होऊन ते 512.2 लाख कोटी रुपयांवर पोहचले. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1351.64 अंशांनी (1.67 टक्के) उसळून 82,458.29 वर पोहोचला, तर एनएसईचा निर्देशांक निफ्टी 365.55 अंशांनी (1.46 टक्के) वधारून 25410.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. फार्मा क्षेत्र वगळता निफ्टीचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत होते.

12 Nov 2026 10:25 IST

देशात एमबीबीएसकडे विद्यार्थ्यांची पाठ? 411 जागा रिक्त

वैद्यकीय शिक्षणाचा वाढत खर्च आणि अवाढव्य फीमुळे विद्यार्थ्यांनी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी पाठ फिरवली आहे. वैद्यकीय शिक्षण महागल्यामुळे देशभरात तब्बल 411 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीकडून विशेष फेरीसाठी एकूण 948 रिक्त जागांचा समावेश करण्यात आल्या होत्या. मात्र एवढ्या जागा वाढवून त्यात फक्त 537 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

12 Nov 2026 10:20 IST

सरकारी बाबूंसाठी 'ईव्ही' बंधनकारक; 20 लाखांपर्यंतची मर्यादा निश्चित

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वापरासाठीच्या वाहनांच्या रेदीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना (ईव्ही) प्राधान्य दिले जावे, आणि त्यालाच 'मुख्य आणि पसंतीचा पर्याय' बनवण्याचे निर्देश अर्थमंत्रालयाने सर्व मंत्रालये आणि विभागांना बुधवारी दिले. तसेच अशा वाहनांच्या खरेदीसाठी 20 लाख रुपयांची किंमत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

12 Nov 2026 10:15 IST

बंगळुरू-गोवादरम्यान उद्यापासून 'वंदे भारत'

बंगळुरू आणि गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. येसचंतपूर-मडगाव-येसवंतपूर मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. उ‌द्घाटनानिमित्त १३ नोव्हेंबर रोजी दोन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. पहिली विशेष गाडी (06512) सर एम. विश्वेश्वरख्या टर्मिनल, बंगळुरू येथून 13 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता सुटून दुसन्या दिवशी पहाटे २.५५ वाजता मडगावला पोहोचेल, दुसरी विशेष गाडी (06213) मंगळुरू जंक्शनहून 13 नोव्हेंबरला दुपारी 1.30 वाजता सुटून रात्री 9 वाजता सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलला पोहोचेल. दोन्ही गाड्या 16 डब्यांच्या वंदे भारत रेकद्वारे धावतील. या सेवेमुळे उडुपी, कुंदापूर, मुरुडेश्वर, गोकर्ण आणि कारवारसह कर्नाटकच्या किनारपट्टीवरील प्रवाशांना गोव्याशी जलद रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

12 Nov 2026 10:15 IST

त्र्यंबकेश्वर परिसराचा भूकंप अभ्यास! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सिंहस्थ कुंभमेळयाच्च्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर परिसरातील भूकंपविषयक हालचालींचा विशेष अभ्यास करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विनंतीवरून भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) यासाठी पथक पाठवले आहे. परिसरातील सुमारे ७५० किलोमीटरच्या परिघात चार यंत्रांच्या साहाय्याने सलग तीन महिने 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येत आहेत, रस्ते, पुल, घाट, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या काव्ळवत लाखो भाविक आणि साधू- महंतांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य भूकंपविषयक धोके आणि भूगर्भातील हालचालींचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे एका विशेष संगणकीय प्रण्डलीद्वारे भूकंपविषयक हालचालींची नोंद आणि विश्लेषण करून तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती 'जीएसआय'चे महासंचालक दिनेश गणवीर यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. यासाठी 'जीएसआय'चे पथक सध्या त्या भागात दाखल झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
|

12 Nov 2026 10:11 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या

विद्यार्थी आत्महत्येमध्ये दहा वर्षांत 62 टक्क्यांनी वाढ; 'एनसीआरबी' च्या अहवालातून धक्कादायक बाब उघड

देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी चितेत भर घातली आहे. या प्रकरणांत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातून समोर आले आहे. देशात वर्षभरात 14 हजार 488 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 909 घटना महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या आहेत. देशातील एकूण घटनांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.2 टक्के आहे.

12 Nov 2026 10:07 IST

अनुसूचित यादीत अन्य जातींचा शिरकाव

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फायद अनुसूचित जातीच्या बाहेरच्या जातींनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही जातींच्या लोकसंख्येमध्ये अनैसर्गिक वाढ नोंदली असून अशा जातींचा स्वतंत्रपणे अभ्यास आणि लोकसंख्यावाढीची कारणमीमांसा केली पाहिजे, अशी शिफारस अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने केल्याने उपवर्गीकरणाचा प्रश्न चिघळणार आहे. उपवर्गीकरण अभ्यास समितीने 245 पानांचा अहवाल शासनाला दिला आहे. या अहवालात अनुसूचित जातीमध्ये अनेक जातींची घुसखोरी झाल्याची माहिती आहे.

12 Nov 2026 10:00 IST

संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट

कुलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट

शोधमोहीम आणि तपासणी सुरू

काल दुपारी कुलगाम येथे CRPF चौकीवर दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता

यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत

12 Nov 2026 09:57 IST

उत्तर प्रदेशमध्ये आझाद समाज पक्ष आणि AIMIM आघाडी होणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी आज आझाद समाज पक्ष आणि AIMIM च्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता

दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता

आझाद समाज पक्ष 100 आणि AIMIM 50 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती

12 Nov 2026 09:53 IST

रिलसाठी फटाके उडवल्याने शेतकऱ्याचा तीन एकरवरील ऊस जळाला

नांदेडममध्ये रिलसाठी फटाके उडवल्याने शेतकऱ्याचा तीन एकरवरील ऊस जळाल्याची घटना समोर आली असून यामध्ये शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES