• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये हाणामारी; प्रवाशी चालत्या ट्रेनमधून पडला
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये हाणामारी; प्रवाशी चालत्या ट्रेनमधून पडला

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 7 November 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 07, 2026, 04:50 PM IST|Updated: Nov 07, 2026, 05:17 PM IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE:  चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये हाणामारी; प्रवाशी चालत्या ट्रेनमधून पडला
07 Nov 2026 17:11 IST (IST)
share

वैजापूरच्या रोहित पठारे खून प्रकरण; 10 आरोपींना अटक

वैजापूरच्या रोहित पठारे खून प्रकरणात पोलिसांनी एकूण 10 आरोपींना अटक केलीय. किरकोळ वादातून 2 गटात वाद झाला. त्यातून रोहित पठारे याला बेदम मारहाण झाली होती. याबाबत वैजापुरात आंदोलन सुद्धा झाले होते. पोलिसांची 5 पथक आरोपीचा शोध घेत होती. त्यातून 10 आरोपींना पोलिसांनी अटक केलीय.

07 Nov 2026 17:07 IST (IST)

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांचा विरोध कायम; झाडे तोडून सरकारला काय मिळणार?उपस्थित केला सवाल

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीला अभिनेते सयाजी शिंदे यांचा विरोध कायम आहे. झाडं तोडून कोणताही प्रोजेक्ट करू नका, झाडे तोडून सरकारला काय मिळणार आहे, असा सवाल सयाजी शिंदे यांनी केलाय. तसंच प्रकल्प आल्याने कुणाला काही नोक-या लागत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
 

07 Nov 2026 17:01 IST (IST)

नाशिकच्या येवल्यात भीषण अग्नितांडव; गोडाऊनसह 4 ते 5 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी

येवला शहरातील अंबिया शहा कॉलनीत आग लागली आहे.  गोडाऊनसह 4 ते 5 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत.  अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. 
 

07 Nov 2026 16:57 IST (IST)

एका दिवसाकरिता पोलीस सुरक्षा द्या; मुंब्रातील MIM नगरसेविका सहार युनिस शेख यांची मागणी

MIM मुंब्रातील नगरसेविका सहार युनिस शेख यांनी एका स्थानिक कार्यक्रमासाठी एक दिवसाची सुरक्षा मागितलीय. कौसा परिसरात आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्यासाठी सुरक्षा द्या, असं पत्र सहर शेख यांनी पोलिसांना लिहिलंय. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना धमकी आली होती. सुरक्षेचा कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा द्या, अशी मागमी या पत्रातून करण्यात आलीय.

07 Nov 2026 16:55 IST (IST)

बनावट नोटा देऊन फसवणूक

मालेगावच्या सटाणामध्ये बनावट नोटा देऊन एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. संभाजीनगरच्या एका व्यक्तीला ३० हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ३ लाख रुपयांच्या नोटा देण्यात आल्या. मात्र या नोटा बनावट असल्याचं त्याचा लक्षात आल्यानं त्यानं आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीनं कोयत्या धाक दाखवून पसार होण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपीचं वाहन दुभाजकावर धडकून अपघात झाला. त्यामुळे स्थानिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

07 Nov 2026 16:50 IST (IST)

चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये हाणामारी; प्रवाशी चालत्या ट्रेनमधून पडला

चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये हाणामारी झाली आहे.  हाणामारीदरम्यान प्रवाशी चालत्या ट्रेनमधून पडला आहे.  ग्रँट रोड-मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान ही घटना घडली.  लोकलचा वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.  घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.  रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  शुक्रवारी रात्री दरवाजाजवळ उभे राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला होता.  वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. 

07 Nov 2026 16:49 IST (IST)

दापोलीत महायुतीतील वाद पुन्हा पेटला; शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांच्यात व्यासपीठावरच जोरदार शाब्दिक वाद

दापोलीत महायुतीतील वाद पुन्हा पेटलाय. दापोलीतील एका कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे अजय बिरवटकर यांच्यात व्यासपीठावरच जोरदार शाब्दिक वाद झाला. या प्रकारानंतर बिरवटकरांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय. खुर्ची तुमची असली तरी हे गाव आमचं आहे, अशा शब्दांत बिरवटकरांनी प्रत्युत्तर दिलंय

07 Nov 2026 16:46 IST (IST)

'यायला लागतंय, कोल्हापुरात समविचारी आघाडीचा मोर्चा

कोल्हापुरात सोमवारी समविचारी आघाडीनं मोर्चाचं आयोनज केलंय. या पार्श्वभूमीवर, शहरात बॅनरबाजी करण्यात आलीय. 'यायला लागतंय, कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा', अशी टागलाईन घेऊन शहरातील विविध भागात सतेज पाटलांचे बॅनर्स लावले आहेत. सध्या या बॅनर्सची शहरात चर्चा सुरू आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Religion News
Marathi News
Marathi Batmya

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

2

कचऱ्याच्या पोत्यात आढळले दोन पाय;सिमकार्ड कव्हरने उघडलं हत्येचं गूढ; 12 तासांत पोलिसांनी कशी केली आरोपीला अटक?

3

₹18000 पगारात सिक्योरीटी गार्ड कसं चालवतो घर? खर्च आणि सेव्हिंग ऐकून म्हणाल, 'हे आम्हालापण शक्य'

4

तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

5

'गेल्या 12 वर्षांच्या नुकसानीची भरपाई...', 2004 साली पंतप्रधानपद..'; सोनिया गांधींचा गौप्यस्फोट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 7 November 2026 : महाराष्ट्रासह देशभरात दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे. लक्ष्मीपूजनच्या मुर्हतावर शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रकाकजे सर्वांचे लक्ष आहे. तर, दुसरीकडे सराफा बाजारात देखील सोनं खरेदीसाठी लगबग पहायला मिळत आहे. यासह महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी देखील घडत आहेत. गोकुळवर शासन नियुक्त 4 संचालक नेमण्याचा अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी आहे. यावरुन आता आरोप प्रत्यारोप होत आहेत.