SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra News Live Updates : ठाणे ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रासह देश, विदेशातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा झी २४ तासच्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घ्या एका क्लिकवर

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 26, 2026, 10:00 AM IST | Updated: Oct 26, 2026, 02:02 PM IST
Image Credit: दिवसभरातील प्रत्येक घडामोडीचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवर
Join

Maharashtra News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज नवी मुंबई दौरा असून येथे भव्य व्यावसायिक प्रदर्शन आणि वाहतूकदारांचा मेळावा असणार आहे. आमदार आदित्य ठाकरे आज कर्जतमधील टोरंटो प्रकल्प आणि झाडे तोडण्यात आले त्या भागाची पाहणी करणार आहेत. टायगर श्रॉफ प्रकरणातील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाशिक दौरा, विविध कार्यक्रमांना शिंदे उपस्थित राहणार आहेत. बिहारमधील एका कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध केलेल्या विधानामुळे भाजप आक्रमक झाली असून आज देशातील काही ठिकाणी त्या संदर्भात निषेध आंदोलन करण्यात येणार आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील, देश, विदेशातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आढावा झी २४ तासच्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घ्या एका क्लिकवर 

26 Oct 2026, 1:14 PM

येवला तालुक्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद.

नाशिकच्या येवल्यात पाणीटंचाईचे सावट आणखी गडद झाले असून मागच्या वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर अद्याप देखील सुरू आहे या आधी 12 गाव व 23 वाड्यांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून आणखी 17 गाव व 33 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा असे प्रस्ताव पंचायत समिती विभागाला प्राप्त झाले आहे भविष्यात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी व्यक्त केली आहे 

26 Oct 2026, 1:03 PM

भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून प्रकाश आंबेडकर आक्रमक

भीमाशंकर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा क्षेत्रासंदर्भातील आपले ज्ञान वाढवावे, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे. कोळशाची आयात केल्याने त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू वाढू शकते, मात्र, अस्तित्वात असलेल्या ऊर्जा प्रकल्पांचा योग्य वापर करून, पर्यावरणाची हानी न करता आणि झाडे न तोडता विजेची कमतरता भरून काढता येऊ शकते, असा दावा त्यांनी केला. 

26 Oct 2026, 12:17 PM

ठाणे ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जवळपास दिड तासांपासून सेंट्रल रेल्वे ठप्प झालेली आहे. विक्रोळी कांजूमरपासून सर्व ट्रेन जागेवरती उभे आहेत, त्यामुळे प्रवासी ट्रॅकवर उतरून प्रवास करतायत. 
 

26 Oct 2026, 11:29 AM

स्वारगेट चौकात बसने घेतला पेट, ऐन गर्दीच्यावेळी नागरिकांची घाबरगुंडी

स्वारगेट चौकात बसने घेतला पेट घेतला. मात्र वेळीच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली. गाडीत मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. मात्र अद्याप कोणाला इजा झाल्याची माहिती नाही. घटनास्थळी पोलिस अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. भर रस्त्यावर लागलेल्या या आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. 
 

26 Oct 2026, 10:39 AM

टोमॅटोला किलोला एक ते दोन रुपये कवडीमोल बाजारभाव

 

एकिकडे पाण्याचे दुर्भिक्ष आणि दुष्काळाचे भीषण संकट, तर दुसरीकडे शेतीमालाचे कोसळलेले भाव! जुन्नरमधील टोमॅटोचे मुख्य हब मानल्या जाणाऱ्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे दर अक्षरशः तळात गेले आहेत. टोमॅटोला अवघा एक ते दोन रुपये किलोचा दर मिळत असल्याने तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे अशक्य बनले आहे. उत्पादन खर्च २०० रुपयांपर्यंत पोहोचलेला असताना, २० किलोच्या कॅरेटला अवघे ३० ते ७० रुपये पदरात पडत आहेत. त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी शेतीमाल फेकून देण्याच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे.

26 Oct 2026, 10:32 AM

मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत, ओवर हेड वायर कपडा अडकल्याने वाहतूक उशिराने

मुलुंड मध्ये ओवर हेड वायर कपडा अडकल्यामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरु आहे. मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे उशिराने धावत असून ऐन आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वे ची वाहतूक 10/15 मिनिट उशिराने सुरु असून अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. 

26 Oct 2026, 10:27 AM

पुण्यात प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ..रक्तपेढ्यांवर ताण

डेंगीसह कर्करोग, अवयव प्रत्यारोपण आणि गंभीर आजारांच्या रुग्णांमुळे प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. मोठ्या रुग्णालयांमध्ये दररोज ३० ते ४० प्लेटलेट्सची मागणी होत आहे. प्लेटलेट्सचा साठा केवळ पाच दिवस करता येत असल्याने नियमित रक्तसंकलन आवश्यक आहे. दरम्यान, शहरात २० ऑक्टोबरपर्यंत डेंगीचे २ हजार ४१३ रुग्ण आढळले असून, महापालिकेने १४ लाख घरांची तपासणी केली आहे.

26 Oct 2026, 10:24 AM

फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध, नियम मोडल्यास कारवाई

दिवाळीसह सण-उत्सवांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके फोडण्यास मनाई केली आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या 100 मीटर परिसरातही फटाके फोडता येणार नाहीत. लेसर लाइट्स आणि तीव्र प्रकाशझोतांवरही निर्बंध असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

26 Oct 2026, 10:22 AM

पुण्याच्या पाणीहक्कावर महापालिकेचा आक्षेप, 21.34 टीएमसीची मागणी

पुणे शहरासाठी महापालिकेने 21.34  टीएमसी पाण्याची मागणी केली असताना जलसंपदा विभागाने केवळ 11.33 टीएमसी वार्षिक पाणीहक्क निश्चित केला आहे. या मंजुरीवर महापालिकेने आक्षेप घेतला आहे. समाविष्ट 34 गावांचा पाणीकोटा, पाणीगळतीचे गणित आणि पर्यायी स्रोतांमधील उपलब्धता विचारात घेताना त्रुटी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणीहक्काचा फेरविचार करून नव्याने मंजुरी देण्याची मागणी महापालिकेने केली आहे.

26 Oct 2026, 10:20 AM

ECINET सॉफ्टवेअरबाबत निवडणूक आयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ, काँग्रेसचा निवडणूक आयोगावर आरोप

ECINET सॉफ्टवेअर आणि SIR प्रक्रियेतील पारदर्शकतेवर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. RTI अर्जाला उत्तर देताना निवडणूक आयोगाने SIR प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा आहे. सॉफ्टवेअरचे नाव, AI चा वापर आणि सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत आयोगाने माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. TCS ने ECINET सॉफ्टवेअर विकसित केल्याची माहिती आधीच सार्वजनिक का केली नाही, असा जयराम रमेश यांचा सवाल आहे. SIR आणि मतदार यादी पुनरावलोकनात AI चा वापर होत असल्याचा दावा करत आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा आणि SIR प्रक्रिया तातडीने स्थगित करा, अशी जयराम रमेश यांची मागणी

26 Oct 2026, 10:18 AM

इम्रान खानला भारत सोडावं लागणार? याचिकेवर आज सुनावणी

आज अभिनेता इम्रान खान याने देश सोडून जायचे का या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. अभिनेता इमरान खान सीजेपी च्या समर्थनार्थ मुंबईत पुकारलेल्या आंदोलनासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी काही वेळ त्याला ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मात्र त्यानंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ते अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे त्याने 28 ऑक्टोबर पर्यंत देश सोडून जावे अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती. त्यानंतर इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. अभिनेता इम्रान खानला भारत सोडावा लागणार की दिलासा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या नोटिशीला आव्हान देणाऱ्या इम्रान खानच्या याचिकेवर आज, २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 
 

26 Oct 2026, 10:16 AM

कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही: दिलीप वळसे पाटील

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीचा भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याशी थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. वृक्षतोडीच्या घटनेचा संदर्भ देताना भौगोलिक परिस्थितीची अचूक माहिती घेणे आवश्यक आहे. चुकीच्या माहितीमुळे भीमाशंकर अभयारण्याची प्रतिमा मलिन होऊ नये याची खबरदारी घ्यावी. कर्जत तालुक्यातील सायदोंगर परिसरातील वृक्षतोडीचे प्रकरण आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याची हद्द यांची गल्लत करू नये वनक्षेत्राशी संबंधित कोणतीही माहिती देताना संबंधित ठिकाण, भौगोलिक सीमा आणि अधिकृत यंत्रणेकडून मिळणारे स्पष्टीकरण तपासणे गरजेचे आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे एखाद्या अभयारण्याचा वृक्षतोडीशी संबंध जोडल्यास नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. 

26 Oct 2026, 10:15 AM

महापौरांच्या घाटकोपरमध्ये 58 कोटींची तरतूद, खंडोबा टेकडी विकासासाठी 15 कोटी

घाटकोपरच्या खंडोबा टेकडीच्या सुशोभीकरणासाठी पावणे सहा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. घाटकोपर पश्चिमेतील पुरातन खंडोबा टेकडीच्या विकासासाठी ५ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. जय मल्हार सहाय्यक कमिटी आणि खंडोबा मंदिर देवस्थान समितीच्या मागणीनंतर पालिकेकडून विकासकामांचे नियोजन आहे. महापौर निधीतून घाटकोपर पूर्व आणि पश्चिमसाठी मिळून ५८ कोटींची तरतूद करण्यात आलेली असून खंडोबा टेकडीच्या सुशोभीकरणासाठी १५ कोटींचा निधी दिल्याची माहिती आहे. 

26 Oct 2026, 10:01 AM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभरात विशेष मोहीम

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात राज्यभरात विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून एफडीएने तब्बल 16.92 कोटी रुपयांचा भेसळयुक्त आणि संशयास्पद साठा जप्त करत 68 आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच नियमभंग करणाऱ्या सात उत्पादन युनिट्सना टाळे टोकले आहे.

दिवाळी विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एफडीएने मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहा विभागांमध्ये तपासणी मोहीम राबवली होती. कारवाईदरम्यान पथकाला राज्यभरातून कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात यश मिळाले आहे. कारवाईमध्ये एफडीएने मिठाई, खवा, गोडेतेल, सुकामेवा आणि फराळाचे पदार्थ असा 8,392 किलो मुदत संपलेला आणि खराब झालेला अन्नसाठा जप्त करून नष्ट केला आहे. दरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यभरात 22 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 20 जणांना अटक करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात पार पडलेल्या मोहिमेत एफडीएने तब्बल 9.11 कोटी रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त केला होता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES