SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जमीन मंजूर; जंतर मंतरवर झेंडा फडकवल्याप्रकरणी झाली होती अटक

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 June 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 21, 2026, 05:51 PM IST | Updated: Oct 21, 2026, 08:58 PM IST
Join

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 3 June 2026 :  शिवसनेचा दसरा मेळावा पार पडल्यांनतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या नावानं भाजपकडून 500 कोटी रूपये घेतले का?  असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. यावर शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या मतदान होत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात देखील अनेक अपडेट समोर येत आहेत. 

21 Oct 2026, 8:51 PM

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांना 10 वर्षांच्या निकषाचा फटका; अनेक बड्या नेत्यांची माघार, तर काहींची बिनविरोध निवड

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १० वर्षांच्या निकषामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निकषाचा फटका बसल्याने अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही अर्ज माघारी घेतला होता. सुरुवातीला बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गृहनिर्माण संस्थेमधून आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या जागी त्यांचे निष्ठावंत सहकारी काका धुमाळ यांना आता संधी मिळणार आहे.
एकीकडे दिग्गज नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असताना, दुसरीकडे काही नेत्यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. मंत्री मकरंद पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार अतुल भोसले यांची आज जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली.त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 10 वर्षांच्या निकषाने अनेक दिग्गजांना माघार घेण्यास भाग पाडले असले, तरी काही नेत्यांनी बिनविरोध निवडीतून संचालकपदावर आपले स्थान निश्चित केले आहे. या घडामोडींमुळे सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

21 Oct 2026, 8:02 PM

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या उमेश चौहान यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या उमेश चौहान यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली. मुंबईतील केईएम रुग्णालयात उमेश चौहान यांच्यावर उपचार सुरू आहेत. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शस्त्रक्रिया करण्यात आली. कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरेसिक सर्जरी (CVTS) विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जनरल अ‍ॅनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. CVTS विभागप्रमुख डॉ. उदय एकनाथ जाधव आणि सर्जरी विभागाचे युनिटप्रमुख डॉ. राम प्रजापती यांच्या टीमने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर उमेश चौहान यांना पुढील उपचार आणि देखरेखीसाठी ICU मध्ये हलवण्यात आले. उमेश चौहान यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे.

21 Oct 2026, 7:04 PM

KDMCप्रभाग समित्यांवर शिवसेनेचं वर्चस्व; 5 प्रभाग समित्या शिवसेनेकडे भाजपकडे 4 तर मनसेला 1 प्रभाग समिती

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एकूण १० प्रभाग समित्यांची निवडणूक आज पार पडली.  या प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाल. शिवसेनेकडे एकूण १० प्रभाग समितींपैकी ५ प्रभाग समित्या आपल्याकडे राखण्यात यशस्वी झाली आहे. भाजपाकडे ४ तर मनसेला १ प्रभाग समिती मिळाली आहे.

21 Oct 2026, 6:27 PM

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जमीन मंजूर; जंतर मंतरवर झेंडा फडकवल्याप्रकरणी झाली होती अटक

सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जमीन मंजूर झाला आहे. SEM न्यायालयाने जामीन मंजूर  केला केला आहे.  जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. 

21 Oct 2026, 6:18 PM

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढणार आणि जिंकणार; सचिन सानप यांचा विश्वास

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास सचिन सानप यांनी व्यक्त केलाय...एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिल्यानं विजयावर शिक्कामोर्तब झाला...शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी नेमके कसे सोडवून घ्यायचे ,शिक्षकच आमदार करतील असा विश्वास सानप यांनी व्यक्त केलाय....प्रा.सचिन सानप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी ..

21 Oct 2026, 5:57 PM

ट्रेकिंगदरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; येवल्यातील अंकाई किल्ल्यावरील घटना

नाशिकच्या येवला तालुक्यात अंकाई किल्लावर राज्यभरातून ट्रेकिंगसाठी ट्रेकर्स येत असतात. दरम्यान आज सकाळी सात वाजेच्या सुमारास संगमनेर येथून अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेले एडवोकेट अमित धुळगंड यांना चढाई दरम्यान त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध झाले. अंकाई येथील स्थानिक सुरक्षारक्षक आणि ग्रामस्थांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने किल्ला गाठत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या ट्रेकरला खाली आणलं मात्र रस्त्यातच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

21 Oct 2026, 5:52 PM

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठ्या हालचाली; आमदार इद्रिस नायकवडी आंची माघार

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक  बिनविरोध करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांनी माघार घेतली.  उमेदवारी अर्ज  मागे घेतला आहे. अर्ज मागे घेण्याच्या आधी जयंत पाटील-विश्वजीत कदमांमध्ये बैठक झाली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES