Maharashtra Vidhan Parishad Election Results LIVE: संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात जोरदार टक्कर
Maharashtra Vidhan Parishad Election Results: महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या पाच जागांपैकी तीन जागा पदवीधर मतदारसंघाच्या असून दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहू शकता...
Maharashtra Vidhan Parishad Election Results: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा असून आज पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तीन जागा पदवीधर मतदारसंघाच्या तर दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहू शकता. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा...
27 Oct 2026, 10:02 PM
छत्रपती संभाजीनगर मतमोजणी अपडेट
एकूण मतांची मोजणी:- 44494 एकूण वैद्य मतदान:- 40900 प्रताप पाटील:- 17704 सतीश चव्हाण: 12738 रविराज साबळे: 4669 दिलीप घुगे: 10926
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 4966 आघाडी
एकूण मतांपैकी प्रताप पाटील यांना किती 43 टक्के मतदान
सतीश चव्हाण यांना 31 टक्के
रविराज साबळे यांना 8 टक्के
27 Oct 2026, 10:02 PM
अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी, दोन फेरीत 28 हजार मतांची मोजणी पूर्ण
पहिल्या आणि दुसऱ्या फेरी मिळून शिंदे सेनेचे किरण सरनाईक 3042 मतांनी आघाडीवर
शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या अदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील एकूण अवैद्य मते - 627
तिसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात
पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली एकूण मते...
किरण सरनाईक शिंदे सेना - 7237 श्रीकांत देशपांडे शिंदे बंडखोर - 4195 अदिती पोहरे काँग्रेस - 3584 सुरेश देवकर, अपक्ष - 3069
27 Oct 2026, 9:57 PM
मविआच्या हर्षदा जाधव-देशमुख आघाडीवर, महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव - पाटील पिछाडीव
पुणे पदवीधर मतमोजणीत प्राथमिक अंदाजानुसार मविआच्या हर्षदा जाधव-देशमुख आघाडीवर, महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव - पाटील पिछाडीवर....
पदवीधरचा विजयी मतांचा कोटा निश्चित झाल्यावर खरं चिञ स्पष्ट होणार.
पुणे शिक्षक मध्ये पहिल्या फेरीत कौस्तुभ गावडे , सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत यांच्यात टक्कर
संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात जोरदार टक्कर
संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील यांच्यात जोरदार टक्कर सुरू आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. 70 टेबल वर प्रत्येकी हजार प्रमाणे 70 हजार मतांची मोजणी सुरू आहे , सुरुवातीला मोजणी सुरू असताना प्रतापसिंह पाटील हे 4 हजार मतांनी पुढं होते. मात्र आता ही लीड बऱ्यापैकी कमी झाली आहे. दोन्ही उमेदवारांच्या मतांचे अंतर अत्यंत कमी आहे, 70 हजार मतमोजणी झाल्यानंतर अधिकृत कुणाला किती मत पडले हे स्पष्ट होईल.
27 Oct 2026, 6:38 PM
पुणे शिक्षक मतमोजणीत 1675 मतं बाद ठरलीत, तर 51 हजार 511 मतं वैध ठरलीत...
पुणे शिक्षक मतमोजणीत 1675 मतं बाद ठरलीत, तर 51 हजार 511 मतं वैध ठरलीत...
त्यामुळे जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित केला गेलाय
परिणामी निवडूण येण्यासाठी दुसऱ्या क्रमांकांचीही मतं ग्राह्य मोजावी लागणार आहे...
प्राथमिक अंदाजानुसार भाजपचे कौस्तुभ गावडे हे पहिल्या क्रमांकावर तर सेनेचे प्रा. सचिन सानप हे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेत. तर दत्ता सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर घसरलेत. विद्यमान आमदार जयंत आसगावर हे माञ थेट 4 थ्या क्रमांकावर पिछाडीवर पडलेत.
27 Oct 2026, 6:15 PM
अमरावती शिक्षक मतदार संघाची पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण
अमरावती शिक्षक मतदार संघाची पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण
पहिल्या फेरीत 14 हजार मतांची झाली मोजणी..
किरण सरनाईक 1694 मतांनी आघाडीवर
शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर
अपक्ष उमेदवार सुरेश देवकर तिसऱ्या क्रमांकावर
काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे मात्र चौथ्या क्रमांकावर
दुसऱ्या फेरीतील 14 हजार मतमोजणीला सुरुवात
पहिल्या फेरीत प्रमुखाचार उमेदवारांना मिळालेली मते..
किरण सरनाईक महायुती शिंदे गट - 3903 श्रीकांत देशपांडे शिंदे बंडखोर - 2209 सुरेश देवकर अपक्ष - 1582 आदिती पोहरे काँग्रेस - 1319
27 Oct 2026, 6:14 PM
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी निकाल
४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर
सुरुवातीच्या 450 मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना 174 तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 147 मते
शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना 37 मते तर रविराज साबळे यांना 25 पोस्टल मते
टपाली मतदानात 27 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर
27 Oct 2026, 6:12 PM
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी निकाल
४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर
सुरुवातीच्या २७५ मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना ११६ तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ९३ मते
शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना २८ मते तर रविराज साबळे यांना १८ पोस्टल मते
टपाली मतदानात २३ मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर
27 Oct 2026, 2:55 PM
नागपूर: प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
नागपूर: प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात
-- वैध- अवैध मतानंतर विजयासाठीचा मतं कोटा होणार निश्चित
-- मात्र मतपत्रिकेतील पसंती क्रमांक एक मध्ये नितेश कराळे यांनी चांगला जोर मारल्याचे सुरुवातीच्या चित्रांवरून दिसून येत आहे.
27 Oct 2026, 11:24 AM
नागपूर पदवीधर मतमोजणी: टपाली मतपत्रिका अपडेट
एकूण सर्व 238 टपाली मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे. एकूण टपाली मतपत्रिकांपैकी 34 टपाली मतपत्रिका अवैध ठरली आहेत. उर्वरित 204 मतपत्रिका वैध ठरल्या असून नियमित मतमोजणीत या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.
27 Oct 2026, 11:05 AM
पुण्यात मतपेटीमध्ये सापडली दुसरी चिठ्ठी
पदवीधर मतदारसंघाच्या मतपेटीमध्ये आणखीन एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीमध्ये, "पदवीधराचे काम करा नाहीतर पाप लागेल," असं लिहिलेलं आहे. टेबल क्रमांक 45 वरील मोजणीदरम्यान चिट्टी समोर आली आहे.
27 Oct 2026, 10:08 AM
'आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही, 2004 पूर्वीची...'; शिक्षक मतदारसंघाच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतपेटीत एक चिठ्ठी सापडली आहे. "आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. 2004 पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा नाहीतर बघा..." असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी शिक्षक मतपेटीमध्ये सापडली. दोन नंबर टेबलवर ही चिठ्ठी सापडली आहे. निवडणूक अधिकाऱ्याला चिठ्ठी देण्यात आली आहे. किरण गोफणे यांनी याबाबतची माहिती निवडणूक अधिकाऱ्याला दिली आहे.
27 Oct 2026, 9:33 AM
4 राज्यांमधील 28 विधान परिषद निवडणुकांचा आज निकाल
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विधानपरिषद निवडणुकांसाठी मतमोजणी
उत्तर प्रदेशातील 11, बिहारमधील 8, महाराष्ट्रातील 5 आणि कर्नाटकातील 4 जागांसाठी होणार मतमोजणी
सर्व 28 जागांचे निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता
27 Oct 2026, 9:17 AM
काही पेट्यांना सील नसल्यावरून राडा
पुण्यामधील मतमोजणीदरम्यान काही पेट्यांना सील नसल्यावरून महाविकास आघाडीच्या मतमोजणी प्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. आठ मतपेट्यांना सील नसल्यामुळे प्रतिनिधींकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी यावरुन शाब्दिक चकमक झाली.
27 Oct 2026, 9:11 AM
आज विरोधक रडणार कशावर?
ईव्हीएम नाही, मतचोरीचा आरोप नाही… मग आज विरोधक रडणार कशावर? असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. "आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे निकाल जाहीर होतील. या जागांवर सध्या विरोधकांचे आमदार आहेत, तर तीन जागांवर भाजपाने उमेदवार दिले आहेत. मतदान मतपत्रिकेवर झालंय!" असं उपाध्ये यांनी म्हटलंय. "मग पराभव झाला तर खापर फोडणार कशावर, मतपत्रिकेवर, निवडणूक आयोगावर की स्वतःच्या अपयशावर? निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय आणि विरोधात गेला तर आरोपांची राळ हा दुटप्पीपणा आता बंद झाला पाहिजे! जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत ठेवा; प्रत्येक पराभवासाठी नवं निमित्त शोधू नका!" असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे.
27 Oct 2026, 8:48 AM
बालेवाडी स्टेडियममध्ये सकाळी आठपासून मतमोजणी सुरु
पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये ही मतमोजणी सुरू आहे.
27 Oct 2026, 8:08 AM
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत
पुण्याबरोबरच अमरावतीमध्येही शिक्षक मतदारसंघाचसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार विरुद्ध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येच तिरंगी तसेच चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमधील अमरावतीतील 25 उमेदवारांपैकी चार महत्त्वाचे उमेदवार कोणते ते पाहूयात... * किरण रामराव सरनाईक – शिवसेना - एकनाथ शिंदे गट (महायुतीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार) * अदिती पोहरे – काँग्रेस (महाविकास आघाडीचे उमेदवार) * दत्तात्रय लहाने – शिवसेना - (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार) * दिलीप कडू – (अपक्ष/बंडखोर उमेदवार)
27 Oct 2026, 8:07 AM
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कोणाविरुद्ध कोण?
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच अंतर्गत चुरस पाहायला मिळणार असून एकूण 30 उमेदवार पुण्यातून नशीब आजमावत आहेत. महायुतीमध्ये असलेल्या मतभेदांमुळे गाजलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाजी मारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणत्या पक्षातून कोण ही निवडणूक लढलं आहे ते पाहूयात...
* कौस्तुभ मुरलीधर गावडे – भारतीय जनता पार्टी (महायुतीचे अधिकृत उमेदवार) * जयंत आसगावकर – काँग्रेस (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार) * सचिन सानप – शिवसेना - (एकनाथ शिंदे गट पुरस्कृत उमेदवार) * दत्तात्रय सावंत – अपक्ष (माजी आमदार / बंडखोर उमेदवार)
27 Oct 2026, 8:01 AM
विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांमधील मतमोजणी सुरु! कोण मारणार बाजी? महायुती की महाविकास आघाडी?
सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांपैकी पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर जागांवर कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे आणि अमरावती येथे चुरस पाहायला मिळणार आहे.
27 Oct 2026, 7:20 AM
छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये पवारांविरुद्ध ठाकरे
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून एकूण 41 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे. मात्र इथेही पुण्याप्रमाणे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजित पवार गट, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यात सामना पाहायला मिळणार असून कोण बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
* सतीश भानुदास चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार पक्ष (महायुती - विद्यमान आमदार)
* प्रतापसिंह पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
* दिलीप घुगे – शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.