SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Vidhan Parishad Election Results LIVE : पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीत मविआ-महायुतीत काँटे की टक्कर

Maharashtra Vidhan Parishad Election Results : महाराष्ट्रातील पाच जागांसाठीच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 तासांपासून सुरु आहे. या निकालांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस दिसून येत असून निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर...

Reported By Neha Chaudhari Written By Neha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 07:52 AM IST | Updated: Oct 28, 2026, 09:26 AM IST
Image Credit: Maharashtra Vidhan Parishad
Join

Maharashtra Vidhan Parishad Election Results : महाराष्ट्रातील राजकारणात विधान परिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणी 22 तासांपासून सुरु आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर)सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली मतमोजणी अजून सुरु असून आज निकाल अपेक्षित आहे. आतापर्यंतची मतमोजणीची आकडेवारी बघता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार टक्कर पाहिला मिळतेय. या निकालाचे लाइव्ह अपडेट्ससह महारष्ट्रातील इतरही घडामोडी एका क्लिकवर तुम्हाला पाहिला मिळणार आहे. 

28 Oct 2026, 9:26 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अपडेट

 

अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची आघाडी 
---
किरण सरनाईकांना 3,560मतांची आघाडी
---
किरण सरनाईकांना 8 हजार 575, आदिती पोहरेंना 4,925 मतं
--- 
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते 
---
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा निश्चित 
---
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहे...

28 Oct 2026, 9:26 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अपडेट

 

राष्ट्रवादी SPचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर 
---
पहिल्या पसंतीची 78 हजार 540 मते घेऊन प्रतापसिंह पाटील आघाडीवर

---
राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना 55 हजार 180 मतं
---
विजयासाठी 89 हजार मतांचा कोटा निश्चित 
---
आता दुस-या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून 
--
निकाल येण्यासाठी दुपार होण्याची शक्यता

28 Oct 2026, 9:25 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अपडेट

 

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडेंची  आघाडी कायम 
---
कौस्तुभ गावडे 17 हजार 948 मतांसह पहिल्या क्रमांकावर 
---
अपक्ष सचिन सानप यांना 11 हजार 658 मतं 
---
दत्तात्रय सावंत यांना 10 हजार 574 मतं 
--
विद्यमान आमदार जयंत आसगावकर 8 हजार 620 मतांसह चौथ्या क्रमांकावर 
----
विजयासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित

---
तर एकूण 26 उमेदवार बाद  झाल्याने त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण निर्णायक ठरणार...
---
कौस्तुभ गावडेंकडे आघाडी असूनही विजय खडतर
---
दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालाचे गणित बदलण्याची शक्यता....
 

28 Oct 2026, 9:24 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अपडेट

 

पुणे पदवीधरमध्ये मविआ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर
---
हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 400 मतं 
---
भाजप उमेदवार स्मिता जाधव पिछाडीवर 
---
पुणे पदवीधरचा विजयी मतांचा कोटा जाहीर 1 लाख 13 हजार 113
--
हर्षदा देशमुख कोटा पूर्ण करण्यासाठी हवीत आणखी 713 मतं 
---
आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात 

28 Oct 2026, 9:24 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results :नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणी अपडेट

 

नागपूर पदवीधर मतदारसंघ मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांक पसंतीची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे...   कोहळे आणि वंजारी यांच्यामध्ये  कुणाच्या पारड्यात यामधील जास्त मत पडतात यावरच विजयाचे गणित निर्भर राहणार आहे... सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे... आता नितेश कराळे यांनी पहिल्या पसंती क्रमांक मध्ये घेतलेली 24 हजार 249 मतं दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत कुणाला बळ देतात यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल...

28 Oct 2026, 9:23 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : नागपूर पदधीवधर निवडणूक मतमोजणी अपडेट

 

भाजपच्या सुधाकर कोहळेंना 60 हजार 924 मतं 
---
काँग्रेसचा अभिजीत वंजारींना 56 हजार 630 मतं 
---
दुस-या पसंतीची मतमोजणी सुरु
---
विजयी मतांचा कोटा 75 हजार 438 इतका जाहीर 
---
कुठल्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीत विजयासाठी आवश्यक मतं न मिळाल्याने दुस-या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात...

28 Oct 2026, 8:31 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

- ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील वाहतूक मार्गात मोठे बदल
- नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद
- ३० ऑक्टोबर सकाळी ८ ते ३१ ऑक्टोबर रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहेत धार्मिक कार्यक्रम
- कुशावर्त कुंड आणि नवीन घाट परिसरात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन
-  त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार
- नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ३० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास
- नियमित ३० किलोमीटरचा मार्ग बंद; पर्यायी मार्गाचे अंतर ५५ किलोमीटर
- पर्यायी मार्ग : अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर
- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नियोजन
- वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांचे आवाहन

28 Oct 2026, 8:06 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी महासुनावणी

 

सुप्रीम कोर्टात आज दुपारी सुनावणी होणार
---
शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार 
----
सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष 
---
काल इतर प्रकरणांमुळे सुनावणी होवू शकली नव्हती

28 Oct 2026, 8:06 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : 6 शिवसेना खासदारांच्या विलीनीकरणावर सुनावणी

 

उद्धव ठाकरेंच्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणावर सुप्रीम कोर्टात 8 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीली सहा शिवसेना UBTच्या खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली होती. या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. शिवसेना UBTचे खासदार अरविंद सावंत यांनी ही याचिका दाखल केलीय. मागच्या सुनावणीत अरविंद सावंत यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुप्रीमी कोर्टाने जुलैमध्ये नोटीस बजावूनही लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कुणीही हजर झालेले नाही, असं सिब्बलांनी म्हटलंय.

28 Oct 2026, 8:04 AM

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात

 

कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरलेत.. राज ठाकरे कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी करणार आहेत.. त्यानंतर राज ठाकरे टोरंट प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहे.. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे यांची कर्जतमध्ये सभा पार पडेल.. कर्जतमधील भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाची दिशा या सभेनंतर जाहीर केली जाणार आहे...भीमाशंकर येथील वृक्षतोडीबाबत कर्जतच्या ग्रामस्थांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती... हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी स्थानिकांचा विरोध डावलून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याची तक्रार ग्रामस्थांनी राज ठाकरेंकडे केली... 

28 Oct 2026, 8:02 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : अमरावती निवडणूक मतमोजणी अपडेट

 

अमरावती शिक्षकमध्ये शिवसेनेची आघाडी 
---
किरण सरनाईकांना 3,650 मतांची आघाडी
---
किरण सरनाईकांना 8,575, आदिती पोहरेंना 4,786 मतं 
--- 
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते 
---
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा निश्चित 

28 Oct 2026, 8:01 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : नागपूर पदधीवधर निवडणूक मतमोजणी अपडेट

 

भाजपच्या सुधाकर कोहळेंना 60 हजार 924 मतं 
---
काँग्रेसचा अभिजीत वंजारींना 56 हजार 630 मतं 
---
दुस-या पसंतीची मतमोजणी सुरु
---
विजयी मतांचा कोटा 75 हजार 438 इतका जाहीर 
---
कुठल्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीत विजयासाठी आवश्यक मतं न मिळाल्याने दुस-या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात...

28 Oct 2026, 7:58 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : पुणे पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट

 

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर 
---
कौस्तुभ गावडेंना 6 हजार 278 मतांची आघाडी 
---
अपक्ष सचिन सानप यांना 11 हजार 265 मतं 
---
दत्तात्रय सावंत यांना 10 हजार 281 मतं 

28 Oct 2026, 7:57 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : पुणे पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट

 

पुणे पदवीधरमध्ये मविआ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर
---
हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 400 मतं 
---
भाजप उमेदवार स्मिता जाधव पिछाडीवर 
---
पुणे पदवीधरचा विजयी मतांचा कोटा जाहीर 1 लाख 13 हजार 113
--
हर्षदा देशमुख कोटा पूर्ण करण्यासाठी हवीत आणखी 713 मतं 
---
आता दुस-या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात 

28 Oct 2026, 7:54 AM

Maharashtra Vidhan Parishad Election Results : मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट

 

राष्ट्रवादी SPचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर 
---
पहिल्या पसंतीची 78 हजार 540 मते घेऊन प्रतापसिंह पाटील आघाडीवर

---
राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांना 55 हजार 180 मतं
---
विजयासाठी 89 हजार मतांचा कोटा निश्चित 
---
आता दुस-या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून 
--
निकाल येण्यासाठी दुपार होण्याची शक्यता

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES