• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News Today LIVE : प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेची तोडकाम कारवाई स्थगित
Live Now

Maharashtra Breaking News Today LIVE : प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेची तोडकाम कारवाई स्थगित

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 20 November 2026 : तुमच्या शहरातील, महाराष्ट्रातील, भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घ्या एका क्लिकवर

Reported Bypooja pawar
Published: Nov 20, 2026, 11:04 IST|Updated: Nov 20, 2026, 15:05 IST
joinshare
Maharashtra Breaking News Today LIVE : प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेची तोडकाम कारवाई स्थगित
Image Credit: Maharashtra Breaking News Today LIVE
20 Nov 2026 12:59 IST
share

मुंबई बँक जागा वाटप तिढा आजच सुटण्याची शक्यता

मुंबई बँक जागा वाटप तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे. भाजप नेते प्रविण दरेकरांच्या नेतृत्वात महायुतीचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार असून आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

20 Nov 2026 12:59 IST

प्रभादेवी येथील रेल्वे स्थानक परिसरातील कारवाई स्थगित

मुंबईतील प्रभादेवी येथील रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण विरोधी कारवाई रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्यासोबत फोन वरून चर्चा केली. आणि अतिक्रमण तात्काळ रोखण्यासाठी सांगितले. त्यानुसार रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. स्थानिक रहिवाश्यांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई करण्याची सूचना करण्यात येईल.

20 Nov 2026 12:48 IST

प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेची तोडकाम कारवाई स्थगित

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवर असलेल्या 101 अनधिकृत बांधकामांवर रेल्वेकडून शुक्रवारी सकाळी  तोडक कारवाई करण्यास सुरुवात झालेली होती. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नागरिकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेची तोडकाम कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे. 

20 Nov 2026 12:10 IST

चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर-चंद्रपूर महामार्गावर डिझेल टॅन्करला भीषण आग

चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर-चंद्रपूर महामार्गावर डिझेल टॅन्कर ला भीषण आग लागली. वरोरा शहरातील मालू पेट्रोल पंप जवळ आज पहाटे पहाटे टॅन्कर ने अचानक ब्रेक मारल्यानंतर टॅन्कर उलटला. अपघातानंतर टॅन्कर ला अचानक आग लागली. या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठमोठे लोळ आणि धुराचे लोट वातावरणात पसरले होते. घटनेच्या ठिकाणापासून जवळच पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली. दरम्यान अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. महामार्गावर अचानक लागलेल्या या आगीमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

20 Nov 2026 11:30 IST

शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आजारपणातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार बारामती दाखल झालेत, बारामती मध्ये विद्या प्रतिष्ठान मधील सेंट्रल बिल्डिंग मध्ये संस्थेच्या कामानिमित्त विश्वस्तांची बैठक घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार देखील या बैठकीला उपस्थित आहेत. 

20 Nov 2026 11:29 IST

इचलकरंजी महानगरपालिकेच्या कचरा डेपोला लागली आग

इचलकरंजी महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग लागली असून कचरा डेपोतून धुरीचे साम्राज्य त्यामुळे तेथील रहिवासांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे याकडे मात्र दुर्लक्ष झाले असून शहरातील सांगली नाका परिसरात कचरा डेपो आहे. कचरा डेपोला आग लागल्यामुळे आग विझवण्यास मात्र महापालिकेला अपयश येत असल्याचं दिसतंय. 

20 Nov 2026 11:19 IST

जिल्हा बँकेत जयंत पाटलांच्या वर्चस्वाला हादरा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या आहेत.वरवर पाहता सगळं आलबेल दिसले तरी पडद्यामागे मात्र राजकारणाचा मोठा डाव रंगला.महाविकास आघाडीने भाजपाला कात्रजचा घाट दाखवत, पडळकरांना देखील शह देण्याचा प्रयत्न केला,तर भाजपाने काँग्रेसच्या जोरावर जयंत पाटलांच्या जिल्हा बँकेतल्या वर्चस्वाला हादरा दिलाय. 

20 Nov 2026 11:16 IST

पनवेल मधील रस्ते होणार खड्डेमुक्त, 60 कोटींच्या कामांना मंजुरी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत आणि पनवेलकरांचा प्रवास सुसाट व्हावा यादृष्टीने आता पनवेल मनपाने कंबर कसलेय. पनवेल मनपातर्फे शहरातील विविध रस्ते काँक्रिट आणि गटार काँक्रिटची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या महासभेत साधारण 60 कोटी रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरण आणि गटर काँक्रिटी करणाच्या कामाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. 

20 Nov 2026 11:16 IST

ट्रम्प, पुतिन आणि जिनपिंग यांचा शांतता जाहीरनामा

चीनमधील शेन्झेन येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची त्रिपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त शांतता जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘अणुयुद्ध जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये,’ अशी भूमिका तिन्ही देशांनी मांडली आहे.

20 Nov 2026 11:13 IST

दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मिळणार बळ

मुंबईतील जुन्या जलवाहिन्यांवरील ताण कमी करून पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. माहीम रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम रेल्वेच्या रुळांखालून दोन जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, त्यासाठी १६ कोटी ६६ लाख रुपये खर्च होणार आहेत.  तर माझगाव येथील हँकॉक पुलावरून तीन जलवाहिन्या नेण्यासाठी १८ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांमुळे मध्य व दक्षिण मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  मुंबईतील रेल्वेमार्ग, रस्ते आणि दाट लोकवस्तीमुळे जलवाहिन्या टाकताना महापालिकेसमोर अनेक तांत्रिक अडचणी येतात. माहीम येथील कामासाठी या अडचणींवर मात करण्यासाठी सूक्ष्म बोगदा तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम स्थानकाजवळ सुमारे १५० मीटर लांबीच्या दोन जलवाहिन्या रेल्वे रुळांखालून टाकण्यात येतील. विशेष म्हणजे, यासाठी रेल्वे रुळांवर खोदकाम न करता भूमिगत पद्धतीने काम केले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरू ठेवून जलवाहिन्या टाकणे शक्य होणार आहे. 

20 Nov 2026 11:12 IST

गोरेवाडा सफारीला पर्यटकांची पसंती, १५ दिवसांत ५५ लाखांचे उत्पन्न

दिवाळीच्या सुट्यांमध्ये नागपूरकरांनी जंगल सफारीला पसंती दिली आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात अवघ्या १५ दिवसांत १३ हजार ७८ पर्यटकांनी भेट दिली. यातून प्राणिसंग्रहालयाला ५५ लाख ४१ हजार ५६० रुपयांचा महसूल मिळाला आहे. गोरेवाडा येथील इंडियन सफारी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. मुक्त जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल आणि हरणांचे कळप पाहण्याचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. विशेषत लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांचा प्रतिसाद मोठा आहे. बॅटरीवर चालणारी वाहने, गाईडची माहिती, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेमुळे पर्यटकांना चांगला अनुभव मिळत आहे.

20 Nov 2026 11:11 IST

२०३५ पर्यंत जगात इस्लाम सर्वात मोठा धर्म!

जगात २०३५पर्यंत सर्वाधिक लोकसंख्या इस्लाम धर्मियांची होणार असल्याचा अंदाज 'प्यू रिसर्च सेंटर' ने बुधवारी व्यक्त केला आहे. २०२० मधील भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंचे प्रमाण ७९.४० टक्के एवढे नोंदवण्यात आले असून २०७० पर्यंत तोच आकडा ७५.८ टक्क्यांवर पोहोचेल, अशी शक्यताही 'प्यू रिसर्च सेंटर' या संस्थेने व्यक्त केली आहे.

20 Nov 2026 11:10 IST

मुंबईच्या पाणी प्रकल्पांसाठी झाडांवर संकट येण्याची शक्यता

मुंबईच्या पाणी प्रकल्पांसाठी झाडांवर संकट येण्याची शक्यता

गारगाई धरण प्रकल्पामुळे ३.१० लाख झाडे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. गावांच्या पुनर्वसनामुळे आणखी दीड लाख झाडे बाधित होण्याची शक्यता आहे. पुनर्वसनासाठी जागा अद्याप निश्चित नसल्याची BMC वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती आहे. मनोरी जलप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ९७१ झाडे बाधित होणार आहे. २८ झाडांची कत्तल, तर ९४३ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. मनोरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे ४ हजार झाडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 

20 Nov 2026 11:06 IST

प्रभादेवी रेल्वे स्थानकापरिसरात असणाऱ्या 101 अनधिकृत बांधकामांवर रेल्वेकडून तोडक कारवाई

 

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवर असलेल्या 101 अनधिकृत बांधकामांवर रेल्वेकडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे. 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून आज पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वेच्या सर्वेक्षणात प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडील दक्षिण भागात रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर दिलीप सुखदेव यांच्यासह अन्य 100 जणांविरोधात सार्वजनिक परिसर (अनधिकृत कब्जा हटवणे) कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आज कारवाईला सुरुवात करण्यात आली असून आमचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे अशी स्थानिकांची मागणी आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Maharashtra News

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 20 November 2026 : मुंबई बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केलीय. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईत शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर बिघडल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती. 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा,महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. गोकुळ दूध संघात महायुतीची सत्ता येताच घेतला इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतला असून दुधाच्या विक्रीदरात 6 रुपयांची तर खरेदी दरात 3 रुपयांची वाढ केलेली आहे. यासह महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊ शकता.