SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News Today LIVE : नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील युनियन बँकेच्या एटीएमला आग

Maharashtra Breaking News Today LIVE 23 November 2026 : महाराष्ट्रासह देश, विदेश आणि तुमच्या शहरातील प्रत्येक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 23, 2026, 16:32 IST | Updated: Nov 23, 2026, 19:27 IST
Image Credit: दिवसभरातील वेगवान घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर
Join

Maharashtra Breaking News Today LIVE 23 November 2026 : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित झाले असून 25 नोव्हेंबरपासून न्यायालयात खटला सुरू होणार न्यायालयाकडून सर्व 14 आरोपींविरोधात औपचारिक आरोप निश्चित मात्र सर्व आरोपींची आरोप मान्य करण्यास नकार देत खटल्याला सामोरे जाण्याची भूमिका आरोप निश्चित करण्यात आलेल्या कलमांमध्ये फसवणूक, विश्वासघात, भ्रष्टाचार आणि परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे. यासह देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर 

23 Nov 2026 18:06 IST

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील युनियन बँकेच्या एटीएमला आग

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाबाहेरील युनियन बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली आहे. पहाडगंजच्या बाजूने रेल्वे स्थानक परिसरातील ही घटना असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल होत आग विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. 
 

23 Nov 2026 18:06 IST

शेतीच्या व्यवहारातून डॉक्टरचा खून; शेतकरी आणि नोकर अटकेत

शेतीच्या व्यवहारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात गेलेल्या डॉक्टरांच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. शेतीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून डॉक्टरांचा खून करून मृतदेह गोणपाटात बांधून धरणात फेकल्याची कबुली दोघा आरोपींनी दिली आहे. शेतकरी आणि त्याच्या नोकराला पोलिसांनी अटक केली असून, मृतदेहाचा शोध धरणात सुरू आहे. डॉ. संजय मनोहर तेली हे १८ नोव्हेंबर रोजी शेतीच्या व्यवहारासाठी गोराडखेडे येथे गेले होते. त्यांच्याकडे व्यवहारासाठी १ लाख ९० हजार रुपये रोख होते. दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्यांचा मोबाईल बंद झाल्यानंतर ते बेपत्ता झाले. 

23 Nov 2026 18:02 IST

पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये ट्रकच्या वजनामुळे नदीवरचा पूल कोसळला

पश्चिम बंगालच्या कूचबिहार या ठिकाणी झालेल्या अपघाताचा थरारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या कूचबिहार या ठिकाणी बोकालिर भागातल्या घरघरिया नदीवर एक पूल होता. त्यावरून ट्रक जाताच हा पूल मधोमध कोसळला एक मालवाहू ट्रक या पुलावरून चालला होता. त्यावेळी हा पूल या ट्रकचा भार सहन न झाल्याने मधोमध कोसळला. ज्यानंतर ट्रकचाही अपघात झाला. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. तसंच हा पूल कोसळल्याने नदीपलिकडे जाण्याचा मार्ग तुटला आहे.
 

23 Nov 2026 18:01 IST

इंदापूर पोलीस ठाण्याची आयजींकडून वार्षिक तपासणी

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पासून पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी ला सुरुवात केलेली आहे. तपासणीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी शर्मा यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत इंदापूरकरांना मार्गदर्शन हे केलं.

23 Nov 2026 16:44 IST

धंगेकरांच्या पोस्टवरून पुण्यात महायुतीत वादाची ठिणगी

पुण्यात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कॅप्टन खरातसोबतचा फोटो शेअर करत महायुतीत नवा वाद निर्माण केला आहे. रूपाली चाकणकर यांना छत्री धरल्यामुळे पदावरून हटवलं, मग चंद्रकांत पाटलांना वेगळा न्याय का? असा सवाल त्यांनी केला. यावर भाजप नेत्यांनी धंगेकरांवर टीका करत त्यांना 'अल्झायमर' झाल्याचा टोला लगावला. धंगेकर हे मिठाचा खडा नव्हे, तर मिठाचं पोतं टाकत असल्याची टीकाही केली. महायुतीच्या बैठकीत तक्रार करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.तर रवींद्र धंगेकर हे हमजा आली असल्याचा संशय ही व्यक्त केला आहे. 

23 Nov 2026 16:43 IST

वडगाव चौकात एसटी बस आणि आयशर टेम्पोची जोरदार धडक

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव चौकात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा जोरदार अपघात झाला आहे. महामार्गावर अचानक थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने धडक दिली. या बसमध्ये चालकासह ४० प्रवासी होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

23 Nov 2026 16:40 IST

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर संयुक्त मराठी मुंबई संघ आक्रमक

मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी 'संयुक्त मराठी मुंबई संघा' च्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन निवेदन दिले. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन होणार असून,त्या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाकडून खुलासा मागवावा, अशी विनंती करण्यात आली आहे. कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे मिळावीत, ऑक्टोबर १९८१ च्या संपातील कामगारांना सामावून घ्यावे आणि वंचित राहिलेल्या कामगारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी द्यावी,अशा प्रमुख मागण्या संघाचे कार्याध्यक्ष रमाकांत बने व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

23 Nov 2026 16:38 IST

खा. अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या हुंडाई शो रुममध्ये चोरी

माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या जया हुंडाई या कार शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केली. काल रात्री दोन चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे या चोरट्यांनी शोरूममधील थेट तिजोरीच उचलून नेली. चोरीची ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याआधारे फरार चोरट्यांचा कसून शोध सुरू केला आहे. या तिजोरीत नेमकी किती रक्कम होती, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES