)
Fadanvis on Rahul Gandhi : विरोधकांचा 'रेजीम चेंज'चा नारा असून रेजीम चेंजचा अर्थ राजकीय व्यवस्था बदलणं आहे... संविधान बदलण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय... उद्धवजींना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे का?, असा सवालही फडणवीसांनी यावेळी उपस्थित केलाय... संविधान वाचवण्यासाठी आमचा लढा सुरू असून राहुल गांधी, तुम किस खेत की मूली हो?, असा सवाल करत फडणीवसांनी हल्लाबोल केलाय... दादरच्या शिवाजी पार्क परिसरातून भाजप आणि शिवसेनेची 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदायात्रा काढण्यात आली... यावेळी फडणवीस बोलत होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
BJP's Foot March in Mumbai : मुंबईत भाजपच्या पदयात्रेला सुरुवात.. 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' पदयात्रा.. शिवाजी पार्कातून पदयात्रा सुरू
प्रभादेवीच्या कामगार कल्याण मंडळ मैदानात होणार समारोप.. शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी.. पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित.
RATNAGIRI : रत्नागिरीत पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय.. दुष्काळातून वाचलेली भातशेती शेतकऱ्यांनी कापली.. मात्र कापलेली भात शेती अवकाळी पावसामुळे भिजून गेलीयं.. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय... तर कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं....
RAIGAD : दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या रायगडमधील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलायं.... रात्रीच्या सुमारास बरसलेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान झालं आहे.... शेतात कापून ठेवलेले भाताचे पीक भिजले आहे ..... भाताचे भारे शेतात साचलेल्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत.... तर काही ठिकाणी पावसाच्या माऱ्याने उभे पिक आडवे झाले आहे.... सकाळपासूनच हे पिक वाचवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात येतोयं.... हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे...
MANCHAR : दुष्काळाच्या झळा, शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे..... पुण्यातील मंचरमध्ये टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.... एकीकडे कमी पाण्यात टोमॅटोच्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे,.... तर दुसरीकडे बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा पडत आहे.... तोडणी, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत....
SHIRUR : पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव शिरूर परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.... दुष्काळी स्थिती आणि ऐन सणासुदीच्या काळात पाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अक्षरशः वरदान ठरला आहे.... रब्बी हंगामातील महत्त्वाच्या कांदा पिकाला या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे... या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यासही मदत होणार असून शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्याची शक्यतायं...
THANE : ठाण्यातील येऊरच्या जंगलातील आश्रम रोडवरील खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बेकायदा हॅलोविन पार्टीवर वर्तकनगर पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत ७० हून अधिक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यामधये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचा संशय आहे. पार्टीत मद्य आणि बेकायदा ई-सिगारेटचा वापर झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मद्याच्या काही बाटल्या आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त केलंय. बंगला मालक आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर बंगला मालकाने वन अधिकाऱ्यांना पैसे देऊन वाहने आज सोडल्याचेही समजले जाते...
बातमीचा व्हिडीओ पाहा
MURASU CYCLONE : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रविवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे... हे चक्रीवादळ वेगाने भारताच्या दिशेन सरकत असून उद्या हे वादळ आंध्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे...भारताने या वादळाला 'मुरासू' असे नाव दिले आहे... या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर आणि झंझावाताचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे... वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून NDRFच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत...या वादळाचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवण्याची शक्यता आहे..
PF INFORMATION ON WHATS APP : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFOने आपल्या लाखो पीएफ खातेधारकांसाठी नियम आणि सेवा लक्षणीयरीत्या सोप्या केल्या आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 74 व्या स्थापना दिवशी, दोन प्रमुख वैशिष्ट्ये सुरू केली. पहिले वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सॲप सेवा आणि दुसरे म्हणजे बंद किंवा निष्क्रिय ईपीएफ खात्यांचे स्वयंचलित सेटलमेंट.
AMERICA PLANE ACCIDENT : अमेरिकेतून एका भीषण विमान अपघाताची बातमी समोर आली आहे... फ्लोरिडामध्ये एक खासगी विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळले... विमान आदळताच एक मोठा स्फोट झाला आणि रस्त्यावर आगीचे लोळ पसरले... या स्फोटामुळे रस्त्यावर एक खोल खड्डा पडला असून, विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले गेले आहेत... अपघाताच्या वेळी विमानात 9 लोक होते, ज्यांचा सर्वांचा मृत्यू झाला आहे... या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत...काळजाचा थरकाप उडवणारा अपघाताचा व्हिडीओ समोर आलाय..
CSMT-MADGAON VANDE BHARAT : सीएसएमटी-मडगाव वंदे भारत १६ डब्यांची होणार आहे... दिवाळी सुट्टीत सीएसएमटी ते मडगाव या स्थानकांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची धावणार आहे....दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर, १० नोव्हेंबरपासून ही गाडी वाढीव डब्यांसह प्रवासी सेवेत दाखल होणार आहे....त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळणारेय...
FDA ALERT : दिवाळीच्या काळात फराळ, मिठाई बनवण्यासाठी भेसळयुक्त खवा, मावा आणि अन्य पदार्थांचा वापर केला जातो.....त्यामुळे दिवाळीत अन्न , औषध प्रशासन अधिक अलर्ट झाले आहे.... दिवाळीच्या तोंडावर तेल, मसाले, ड्रायफ्रूट्स, दुधाचे पदार्थ आणि रंगांची कसून तपासणी केली जात आहे.... यावेळी फराळात भेसळ आढळली तर भेसळखोरांची दिवाळीच अंधारात जाईल, असा इशाराच एफडीएने दिला आहे.... तसंच गोदामे, पदार्थ दुकानांमध्ये पोहोचण्यापूर्वी जिथून जातो त्या ठिकाणांची तपासणी एफडीएकडून करण्यात येत आहे...त्याचबरोबर लाडू आणि फराळाच्या विक्रीच्या वेळाही तपासणार आहे....
NOVEMBER HEAT : ऑक्टोबरमधील उन्हाच्या तीव्र झळा सहन केल्यानंतर नोव्हेंबर महिनाही तापदायक राहणार आहे... प्रशांत महासागरात 'एल निनो' स्थितीची तीव्रता वाढल्याने हिवाळ्यातही तापमान वाढ नागरिकांना हैराण करणार आहे.... नोव्हेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांना उष्णतेचा तडाखा बसणार आहे..... सध्या प्रशांत महासागरात अत्यंत तीव्र 'एल निनो' स्थिती निर्माण झाली आहे.... त्याचा परिणाम भारताच्या वातावरणावर जाणवणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे....
MAHALAXMI EXPRESS : मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा महिला प्रवाशांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. सातारा जिल्ह्यातील सालपे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर आरक्षित डब्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी चोरट्यांनी एस-२, एस-३ आणि एस-४ डब्यांवर दगडफेकही केली. घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 02 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.