)
Satara Andolan : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला चालता ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवून दिला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काल पासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील किणी टोलनाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. तब्बल 32 तासांपासून महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
Pune Zambre Family Protest : पायल झांबरे आत्महत्या प्रकरण.. पुण्यात झांबरे कुटुंबीयांचं आंदोलन.. झांबरे कुटुंबासह गावकऱ्यांचा ठिय्या.. पुणे कोर्टाबाहेर झांबरे कुटुंबासह गावकऱ्यांचा ठिय्या.. आरोपीला फाशी देण्याची मागणी.
शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणी संपली...पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार
DEVENDRA FADANVIS ON SUGARCANE PROTEST : ऊसदरावरुन सुरु असलेलं आंदोलन लवकारत लवकर मिटावं अशी सरकारची भूमिका आहे असं मुखमंत्री म्हणालेत.. ऊस दराबाबत साखर कारखानदार आणि शेतक-यांमध्ये चर्चा सुरु आहे.. सरकार यात मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.. हे आंदोलन शांततेत आणि लवकर संपावं अशी सरकारची भूमिका असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय..
NASHIK : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय... जुन्या सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला. यामध्ये संदीप निकम, त्यांची पत्नी मानसी निकम आणि १७ वर्षीय मुलगा अर्णव निकम हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, घरासमोरच हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित श्रवण रबाडे याने किरकोळ वादातून हा हल्ला केल्याचा आरोप आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अंबड पोलिसांनी मानसी निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत संशयिताला अटक केलीये..
PUNE METRO : पुण्यातील हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो तीन आजपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झालीये.. पहिल्याच दिवशी हिंजवडीकरांचा या मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. तिकीद दर जास्त असले तरी वेळेची बचत होत असल्यानं नागरिकांनी मेट्रो-3चं कौतुक केलंय.
RAMESH MHATRE : शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीतील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. म्हात्रेच्या तब्येतीचा मुद्दा उपस्थित करत जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली. यावर सरकारी वकील अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी हरकत घेताना आणखी काही महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवायची आहे.या प्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे.
MNS DEEPOTSAV : दादरच्या शिवाजी पार्क येथे दरवर्षी दिवाळीत साजरा होणारा दिपोत्सव यंदा साजरा न करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेनी घेतलाय.. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली असून राज्यात दुष्काळाचं सावट असताना, शेतकरी चिंतातूर झालेला असताना फटाक्यांची आतिषबाजी आणि दिव्यांची रोषणाई करणं मनाला पटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय...
NASHIK : नाशिककरांनो पाणी जपून वापरा.. कारण दिवाळीनंतर नाशिककरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.. जिल्हाधिका-यांच्या पाणी आरक्षण बैठकीत नाशिक मनपासाठी 6 हजार 300 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर करण्यात आलंय. 31 ऑगस्ट 2027पर्यंत शहराला पाणीपुरवठा करायचा असल्यास 25 टक्के पाणीकपात करावी लागणार आहे.. दरम्यान महापालिकेकडून वाढीव पाणी कोट्यासाठी फेरप्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरु केलीये. मात्र हा प्रस्ताव मान्य न झाल्यास दिवाळीनंतर नाशिककरांवर पाणीकपातीचं संकट ओढावणार आहे..
MURASU CYCLONE : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मुरासू चक्रीवादळानं आंध्र प्रदेशात थैमान घातलंय.. या वादळामुळे प्रतितास 120 किलोमीटर वेगानं वादळी वारे सुरु असून मुसळधार पाऊसही सुरु आहे. नेल्लोर आणि नरसापूरमध्ये या वादळानं थैमान घातलंय. चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आलाय.. तामिळनाडू, ओडिसा, छत्तीसगढच्या काही भागातही या वादळामुले मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर विजयवाडा, तिरूपती, विशाखापट्टनम येथून अनेक विमाने रद्द करण्यात आलीत.. हे वादळ वायव्य दिशेने पुढे सरकत असून आज दुपारपर्यंत या वादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान या वादाळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज वादळी पावसाची, तर बहुतांश भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये..
RAIGAD : मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. माणगावच्या वाहतूक कोंडीचा वर्षानुवर्षांचा मनस्ताप आता संपण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडलं आहे. माणगाव बायपासवरील कोकण रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन लेनचे गर्डर टाकण्याचं काम अखेर पूर्ण झालं आहे. अनेक अडथळे आणि तांत्रिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण केलंय. त्यामुळे माणगाव बायपास सुरू होण्याच्या आशा आता अधिक बळावल्या आहेत. पुढील दोन महिन्यात एक लेन सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे
SURPEME COURT ON BMC : अतिक्रमण हटवलं नसल्यानं सर्वोच्च न्यायालयानं मुंबई पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांचे वेतन रोखले...बोरिवलीमधील बेस्ट बसस्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अतिक्रमण होतं, हे हटवण्याची जबाबदारी बीएमसी आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर होती मात्र अतिक्रमण न हटवलं गेल्यानं पालिका आयुक्त अश्विनी भिडेंसह अधिकाऱ्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन रोखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत..तसेच अतिक्रमणधारकांना मदत करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी त्यांच्याशी संगनमत करीत आहेत का, असा सवाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केला...तसेच पालिकेला 5 लाखांचा दंडही ठोठावत कारणे दाखवा नोटीस बजावलीये...
DRAUGHT NEWS : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फीमाफीचा दिलासा मिळणार असला, तरी या सवलतीसंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून काही अटी आणि शर्ती जाहीर केल्यात.. त्यानुसार बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच परीक्षेला दुस-यांदा बसणा-या विद्यार्थ्यांना ही फीमाफी मिळणार नाही. तसेच शहरात नोकरी वा व्यवसाय करणा-या आणि गावी शेतजमीन असणा-यांच्या पाल्यांनाही हा लाभ मिळणार नाही. दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे २०२६-२७ मधील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय... या सवलतीसाठी सुमारे 20 लाख 38 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे...
SATARA : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे. साताऱ्यात अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेला चालता ट्रॅक्टर आंदोलकांनी पेटवून दिला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली काल पासून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील किणी टोलनाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. तब्बल २० तासांपासून महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला आंदोलकांनी आग लावली. या घटनेमुळे ऊसदर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने मुंबई-पुण्याहून कोल्हापूर, बेळगाव आणि बंगळूरकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत
KOLHAPUR : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये.. पुणे बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी पुणे बेंगळुरू महामार्गावर झोपले...दरम्यान ऊस दराचा तोडगा न निघाल्यास मुंबई-पुण्याला पुरवठा होणारा दूध आणि भाजीपाला रोखण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर मंत्र्यांची आणि सरकारचीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टींनी घेतलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 04 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.