SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : 31 ऑक्टोबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 31 OCTOBER महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported By Prashant Jadhav Written By Prashant Jadhav
Published: Oct 31, 2026, 06:38 AM IST | Updated: Oct 31, 2026, 08:24 AM IST
Image Credit: LIVE BLOG TICKER
Join

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 31 OCTOBER  महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

31 Oct 2026, 8:24 AM

दिवाळीपूर्वी सोनं आणि चांदीच्या दरात घसरण

GOLD & SILVER RATE : सणासुदीच्या काळात सोनेचांदीच्या दरात घसरण झालीय... चांदीच्या दरात 8 हजार 300 रुपयांची ऐतिहासिक घसरण झालीय... चांदीच्या दरानं 11 महिन्यांतली नीचांकी पातळी गाठलीय... त्यामुळे आता चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 90 हजार रुपयांवर पोहोचलाय.  चांदीपाठोपाठ सोन्याच्या दरातही 1 हजार 300 रुपयांची घसरण झालीय. त्यामुळे सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 1 लाख 45 हजारांवर पोहोचलाय.... 

31 Oct 2026, 8:20 AM

'अल निनो'नंतर आता 'ला निना'चा तडाखा?

LA NINA : जगावर सध्या एल निनोचं संकट ओढावलंय.. त्यात आता जागतिक हवामान संघटनेनं आणखी एका धोक्याचा इशारा दिलाय.. फेब्रुवारी 2027नंतर प्रशांत महासागरात ला निना सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.. अल निनोचा सर्वात तीव्र टप्पा आणखी येणे बाकी आहे. याचा प्रभाव फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहू शकतो. पण, याचा प्रभाव कमी झाल्यानंतर, प्रशांत महासागरात मोठे बदल होऊन 'ला निना'ची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. यामुळे भारतात मुसळधार पाऊस, चक्रीवादळं तसंच आफ्रिकेत दुष्काळ आणि इतर खंडांमध्ये तीव्र चक्रीवादळे बघायला मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

31 Oct 2026, 8:12 AM

मध्य, ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

RAILWAY MEGABLOCK : देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे... मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान ब्लॉक घेतला जाईल... तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत लोकल बंद असतील.... 

31 Oct 2026, 8:12 AM

राष्ट्रवादी काँग्रेसची सोमवारी बैठक

NCP MEETING : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातील पराभव आणि महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येत्या सोमवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावलीये.. या बैठकीत पदवीधर मतदारसंघातील पराभव तसंच महायुतीमधील मतभेदाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे..

31 Oct 2026, 8:10 AM

मुंबईत मेट्रो 4 चा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार

MUMBAI : मुंबई ठाणेकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या वडाळा-कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेसाठीची पहिली मेट्रो ट्रेन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होणार आहे. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात अल्स्टॉम कंपनीने या ट्रेनची उभारणी पूर्ण केली असून सध्या तिची चाचणी आणि तांत्रिक पडताळणी सुरू आहे... 

31 Oct 2026, 8:08 AM

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचं आज ध्वजारोहण

NASHIK : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक शुभारंभ आणि ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे...दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मंच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल...या सोहळ्यासाठी नाशिकध्ये व्हीआयपींची मांदियाळी पाहायला मिळेल... मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख, साधू-महंत उपस्थित राहणार आहेत...यानंतर संध्याकाळी रामकुंड परिसरात भव्य गोदाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.

ZEENEWS TRENDING STORIES