• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Breaking LIVE Update: बाळासाहेब ठाकरे अपमान प्रकरणावरुन महापौरांना विरोधकांचा घेराव
Live Now

Breaking LIVE Update: बाळासाहेब ठाकरे अपमान प्रकरणावरुन महापौरांना विरोधकांचा घेराव

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, एकनाथ शिंदेंच्या वतीने सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करणार आहेत.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 18, 2026, 14:14 IST|Updated: Nov 18, 2026, 17:59 IST
joinshare
Breaking LIVE Update: बाळासाहेब ठाकरे अपमान प्रकरणावरुन महापौरांना विरोधकांचा घेराव
18 Nov 2026 17:57 IST
share

सभा होणार चर्चा होणार बाळासाहेब यांचा अपमान सहन करणार नाही - महापौर रितू तावडे

सभा होणार चर्चा होणार बाळासाहेब यांचा अपमान सहन करणार नाही 
त्यांनी घोषणाबाजी करत वॉल्क आऊट केलं 
महापौर ही सर्व पक्षांची आहे 
सर्व पक्षाचे नगरसेवक माझ्याकडे येऊ शकतात तहकूब करणे हा काही उपाय नाही 
तहकुबी केली आणि इतरांना कळलं की ताईंनी तहकुबीचा प्रस्ताव मांडला 
घोषणाबाजी करण्यात आली 
सभागृहात त्यांचं समाधान झालं नसेल म्हणून ते आले 
कोणत्याच गोष्टींची चर्चा केली जात नाही वॉल्क आऊट केलं जात 
सभागृह लाईव्ह चालू आहे वॉर्ड चे विषय मांडले जात आहे 
मुंबईकर साडेचार वर्ष प्रशासकीय काळात होतें मुंबईचे कोणतेही विषय घेतो तेव्हा हे गोंधळ घालतात. लोक त्यांच्या विभागातली काय म्हणत असतील

18 Nov 2026 17:05 IST

ऊस दरवाढीच्या बैठकीनंतर शेतकरी आक्रमक

ऊस दरवाढीच्या बैठकीनंतर शेतकरी आक्रमक 
जळीत ऊसबाबत मदत देण्याबाबत शेतकरी आक्रमक 
बैठकीत साखर कारखादारांकडून जळीत ऊसबाबत चर्चा झाली नसल्याने आक्रमक 
भाजप आमदारांनी शेतकरी आणि प्रशासनात चर्चा करून मार्ग काढला
जिखाधिकारी कार्यालयात सुरू होती बैठक

18 Nov 2026 15:55 IST

मेहता यांचा युक्तिवाद संपला

मेहता यांचा युक्तिवाद संपला

आजची सुनावणी संपली

18 Nov 2026 15:44 IST

कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आढावा घेत आहे - ध्रुव मेहता

दहाव्या अनुसूचीनुसार विधानसभा अध्यक्षांना आमदारा पात्रता प्रकरणांमध्ये अधिकार असतात - ध्रुव मेहता

कोर्ट विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आढावा घेत आहे - ध्रुव मेहता

18 Nov 2026 15:34 IST

शिवसेना प्रकरणांमध्ये kihoto निकालाचे उल्लंघन झाले आहे - ध्रुव मेहता

Kihoto प्रकरणांमध्ये म्हटले आहे की, व्हिप हा केवळ अविश्वास प्रस्तावावर आणि अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्या वेळी बजावला जातो.... आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये नाही - ध्रुव मेहता

शिवसेना प्रकरणांमध्ये kihoto निकालाचे उल्लंघन झाले आहे - ध्रुव मेहता

18 Nov 2026 15:26 IST

उद्धव ठाकरे यांच्या सरकार नंतर कोणाचे सरकार स्थापन झाले ?

उद्धव ठाकरे यांच्या सरकार नंतर कोणाचे सरकार स्थापन झाले ? कोर्टाचा सवाल

भाजपासोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ध्रुव मेहता यांचे उत्तर

18 Nov 2026 15:22 IST

मला युक्तिवाद संपवायचा आहे - ध्रुव मेहता

मला युक्तिवाद संपवायचा आहे.. आणखी वीस ते पंचवीस नऊ मिनिटांमध्ये माझा युक्तिवाद संपवण्याचा प्रयत्न असेल - ध्रुव मेहता

18 Nov 2026 15:13 IST

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे आमदार अपात्रता प्रकरणी प्रतिवाद करत आहेत...

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आमदार अपात्रता प्रकरणी केलेल्या युक्तीवादावर ध्रुव मेहता एक एक मुद्दा घेऊन प्रतिवाद करत आहेत...

18 Nov 2026 15:08 IST

आमदारांनी भाजप सोबत मिळून कृती केली

कोणत्याही पुराव्याशिवाय निराधार विधान करून आमदारांनी भाजप सोबत मिळून कृती केली आहे, असा युक्तिवाद कलम २(१)(अ) अंतर्गत अपात्रता करण्यासाठी आधार ठरू शकत नाही; तसेच परिच्छेद ४३ मध्येही हे स्पीकरच्या आदेशावरून स्पष्ट केले असल्याचे नमूद केले आहे.

18 Nov 2026 15:06 IST

भाजप शासित राज्यात जाणे म्हणजे अपात्र ठरण्याचे कारण ठरू शकत नाही - ध्रुव मेहता

भाजप शासित राज्यात जाणे म्हणजे अपात्र ठरण्याचे कारण ठरू शकत नाही - ध्रुव मेहता

ध्रुव मेहतांच्या या वाक्तव्यावर कपिल सिब्बल हसले

18 Nov 2026 14:58 IST

उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावले होते - ध्रुव मेहता

उद्धव ठाकरे यांनी बहुमत गमावले होते

सभागृहाचा विश्वासही गमावला होता

34 आमदार सरकारसोबत नव्हते

यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले

हे स्वतः ठाकरे गटाचे म्हणणे आहे

सुभाष देसाई प्रकरणात ठाकरे गटांने हे स्वतः नमूद केले आहे - ध्रुव मेहता यांचा दाखला

18 Nov 2026 14:53 IST

भाजप आणि शिवसेनेमध्ये 2019 मध्ये निवडणूक पूर्व युती झाली होती - ध्रुव मेहता

भाजप आणि शिवसेनेमध्ये 2019 मध्ये निवडणूक पूर्व युती झाली होती - ध्रुव मेहता

मात्र, यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन शिवसेनेने सत्ता स्थापन केली

यामुळे पक्षामध्ये प्रचंड नाराजी होती, पक्षाने विचारधारा सोडून युती केली म्हणून नेते आणि कार्यकर्ते नाराज होते - ध्रुव मेहता

18 Nov 2026 14:50 IST

21 जून रोजी झालेल्या शिवसेना पक्षाच्या बैठकीत दिलीप लांडे यांची स्वाक्षरी बनावट - ध्रुव मेहता यांचा कोर्टासमोर युक्तिवाद

21 जून रोजी झालेल्या शिवसेना पक्षाच्या बैठकीत दिलीप लांडे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे... या अगोदरच्या जानेवारी महिन्यातील बैठकांमध्ये त्यांनी केलेली स्वाक्षरी आणि 21 जून रोजी ची स्वाक्षरी मॅच होत नाही... यासाठी कुठल्या तज्ञाची गरज नाही स्पष्टपणे हे दिसत आहे. दिलीप लांडे यांच्या स्वाक्षरी चा कागद दाखवत ध्रुव मेहता यांचा कोर्टासमोर युक्तिवाद, स्वाक्षरी केली नसल्याचे विवेक लांडे आणि स्पष्ट केले आहे. 

18 Nov 2026 14:43 IST

नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला

ध्रुव मेहता या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे की, जर तुम्ही उपस्थित राहण्यास अपयशी ठरलात तर तुम्ही स्वेच्छेने आपले सदस्यत्व सोडले आहे असे मानले जाते. बाळासाहेब पाटील यांनी १८ जुलै, १९ जुलै, २२ जुलै आणि २३ जुलै रोजी झालेल्या विधानसभा सत्रांना हजेरी लावली नव्हती. त्यामुळे बहुमताच्या चाचणीचा प्रस्ताव सभागृहात येणार याची याचिकाकर्त्याला जाणीव होती.

18 Nov 2026 14:39 IST

युक्तिवादाचा आधार सर्वोच्च न्यायालयाच्या बाळासाहेब पाटील प्रकरणातील निकालावर

विधानसभा अध्यक्षांनी नोंदवलेल्या निष्कर्षानुसार, नोटीस बजावल्याचा किंवा उपस्थिती नोंदवहीचा पुरावा सादर करण्यात ते अपयशी ठरले आहेत.
त्यांच्या युक्तिवादाचा आधार सर्वोच्च न्यायालयाच्या बाळासाहेब पाटील प्रकरणातील निकालावर आहे.
मात्र, या निकालाचा ते चुकीचा अर्थ लावत आहेत.
बाळासाहेब पाटील प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा चुकीच्या पद्धतीने दाखला दिला जात आहे.
 

18 Nov 2026 14:33 IST

कर्नाटकमधील भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन, ध्रुव मेहता यांनी कोर्टाला दिला दाखला

कर्नाटक मधील जनता दल धर्मनिरपेक्ष आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते... कुमार स्वामी यांच्या नेतृत्वात हे सरकार स्थापन करण्यात आले होते या प्रकरणाचा दाखला ध्रुव मेहता कोर्टाला देत आहेत. भाजप ऐवजी काँग्रेस घ्यावे हे सरकार केवळ 14 महिने चालले होते... यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला - ध्रुव मेहता

18 Nov 2026 14:30 IST

सुभाष देसाई प्रकरण आणि बाळासाहेब पाटील प्रकरणाचा ध्रुव मेहतांनी दिला दाखला

सुभाष देसाई प्रकरण आणि बाळासाहेब पाटील प्रकरणाचा ध्रुव मेहतांनी दिला दाखला

18 Nov 2026 14:28 IST

ध्रुव मेहता यांनी आजच युक्तिवाद संपवण्याचा प्रयत्न करावा - सुप्रीम कोर्ट

ध्रुव मेहता यांनी आजच युक्तिवाद संपवण्याचा प्रयत्न करावा, असे कोर्टाने सुरुवातीलाच म्हटले

माझा पण तसाच प्रयत्न असेल - ध्रुव मेहता

18 Nov 2026 14:27 IST

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात

शिवसेना पक्ष -चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीला सुरुवात

सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु

एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद केला सुरू

आमदार अपात्रता संबंधी युक्तिवाद केला सुरू

18 Nov 2026 14:17 IST

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात महासुनावणी

आज सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी
दुपारी दोन वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी 
एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता करणार युक्तिवाद
आमदार अपात्रता प्रकरणी करणार युक्तिवाद
ध्रुव मेहता यांना आणखी दोन तास युक्तिवादासाठी लागणार

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Shiv Sena UBT
Marathi News

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

आज सुप्रीम कोर्टात शिवसेना प्रकरणाची महासुनावणी होणार आहे, दुपारी दोन वाजता सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. एकनाथ शिंदेंचे वकील ध्रुव मेहता करणार युक्तिवाद करणार आहेत, आमदार अपात्रता प्रकरणी करणार युक्तिवाद. ध्रुव मेहता यांना आणखी दोन तास युक्तिवादासाठी लागणार.