SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार

Mega Block : विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागात रविवार 1 नोव्हेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होऊ शकतो.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 31, 2026, 03:16 PM IST | Updated: Oct 31, 2026, 03:22 PM IST
Image Credit: रविवारी मेगा ब्लॉकचं वेळापत्रक
Join

Mega Block : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. दररोज कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर आणि उपनगरातील व्यक्ती हे दररोज याच लोकल ट्रेनने प्रवास करतात. रेल्वेकडून अधिकतर रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक घेतला जातो. या दरम्यान एका विशिष्ट कालावधीसाठी लोकल ट्रेन या बंद असतात. रविवारी बहुतेक नोकरदार वर्गाला सुट्टी असल्याने इतर दिवशी होतो तसा खोळंबा प्रवाशांचा होत नाही. मात्र एखादा सण किंवा विशेष गोष्ट ही रविवारी आली तर लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेगा ब्लॉकमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.  पुढील आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी सणानिमित्ताने अनेकजण दादर येथील भागात शॉपिंग करण्यासाठी येत असतात. दिवाळीपूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने नागरिक सुट्टीच्या दिवशी शॉपिंग करण्याकरता मुंबईच्या मार्केटमध्ये येण्याचा प्लॅन करत असतील, मात्र मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेणार असल्याने दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होणार आहे.

विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक :

मध्य रेल्वे :

सीएसटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी १०: ५५ ते दुपारी ३: ५५ दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

रविवारी मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी पासून ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. या लोकल ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार स्टेशन येथून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

ट्रान्सहार्बर मार्ग :

ठाणे - वाशी / नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. हा ब्लॉग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत असेल.

ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी, नेरूळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या, तसेच वाशी, नेरूळ आणि पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील. तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नोंद घ्यावी.

पश्चिम रेल्वे :

बोरिवली ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर  मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. शनिवार - रविवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉग असणार आहे.

ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व जलद लोकल विरार वसई रोड ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक नसेल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES