• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /भयंकर! दहा वर्षांच्या मुलीने 18 महिन्याच्या बाळाला इमारतीतून खाली फेकले, गोरेगावाील घटना

भयंकर! दहा वर्षांच्या मुलीने 18 महिन्याच्या बाळाला इमारतीतून खाली फेकले, गोरेगावाील घटना

10 वर्षीय मुलीने शेजारी राहणाऱ्या 18 महिन्यांच्या बाळाला इमारतीतून खाली धक्का दिल्याची माहिती समोर आली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 17, 2026, 02:27 PM IST|Updated: Oct 17, 2026, 02:30 PM IST
joinshare
भयंकर! दहा वर्षांच्या मुलीने 18 महिन्याच्या बाळाला इमारतीतून खाली फेकले, गोरेगावाील घटना
Image Credit: 10 Year Old Girl Throws Neighbour Toddler Off 6th Floor Of Mumbai Building

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबईतील गोरेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवशाही सोसायटीत सहाव्या मजल्यावरुन पडून अवघ्या 18 महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तसंच, शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर संशय आहे.

14 ऑक्टोबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर चिमुकली घराबाहेर सहाव्या मजल्यावरील पॅसेजमध्ये खेळायला गेली होती. त्यावेळी 10 वर्षांची मुलगीही उपस्थित होती. यादरम्यान चिमुकली अचानक खाली कोसळली. धक्कादायक म्हणजे, 18 महिन्याची मुलगी खाली पडल्यानंतर अल्पवयीन मुलगी निघून गेली त्यानंतर थोड्याच वेळात पॅसेजमध्ये सायकल चालवत असल्याचे सीसीटीव्हीत दिसते.

बुधवारी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जाते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 10 वर्षांची अल्पवयीन मुलगी 18 महिन्यांच्या मुलीला खाली फेकताना दिसत आहे. नंतर कॉरिडॉरच्या बाजूला पळून जाताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे कुटुंब 1 ऑक्टोबर त्या इमारतीत राहायला आले होते. दोन्ही कुटुंबामध्ये यापूर्वी एका मांजरावरुन वाद झाला होता. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगी सहाव्या मजल्यावरुन खाली पडताना दिसतेय. काही क्षणानंतर अल्पवयीन मुलगी घटनास्थळावरुन पळून जाताना दिसतेय. त्यानंतर त्याच मजल्यावरील पॅसेजमध्ये सायकल चालवताना दिसत आहे.

सूत्रांनुसार, अल्पवयीन मुलीच्या पालकांनी त्यांची मुलगी मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याचे म्हटलं आहे. मात्र पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News