• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेत्याने 18 आमदारांना घेऊन फोडला होता शिवसेना पक्ष; नेत्याचे नाव जाणून शॉक व्हाल

34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेत्याने 18 आमदारांना घेऊन फोडला होता शिवसेना पक्ष; नेत्याचे नाव जाणून शॉक व्हाल

34 वर्षांपूर्वी फुटली होती शिवसेना. बाळासाहेबांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेत्याने 18 आमदारांना घेऊन शिवसेना पक्ष फोडला होता. 'शिवसेना-बी' गटाची स्थापन केली होती.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 17, 2026, 18:22 IST|Updated: Nov 17, 2026, 18:39 IST
joinshare
34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेत्याने 18 आमदारांना घेऊन फोडला होता शिवसेना पक्ष; नेत्याचे नाव जाणून शॉक व्हाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Balasaheb Thackeray : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष फोडला. यामुळे उद्धव ठाकरे यांना रातोरात मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेत सहभागी झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला आहे. शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. शिवसेना कुणाची याचा वाद आता सुप्रिम कोर्टात पोहचला आहे.  34 वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटला होता. 34 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेत्याने 18 आमदारांना घेऊन शिवसेना पक्ष फोडला होता. या नेत्याने 'शिवसेना-बी' या नावाने नवा गट स्थापन केला होता. हा नेता आता सत्तेत असलेल्या पक्षात असून  मंत्रीपदावर आहे. 

बाळासाहेबांची शिवसेना फोडणारा हा नेता दुसरा तिसरा कुणी नसून छगन भुजबळ आहे. 5 डिसेंबर 1991 रोजी भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंडाची घोषणा केली. भुजबळ यांनी  शिवसेनेच्या 18 आमदारांनी सोबत घेऊन मोठ बंड केले.  विधानसभा अध्यक्षांना एक पत्र सादर करून 'शिवसेना-बी' नावाचा एक वेगळा गट स्थापन करण्याचा दावा त्यांनी केला.  आमचा गट मूळ शिवसेनेपासून वेगळे होत आहे. त्यानंतर अध्यक्षांनी भुजबळ यांच्या गटाला मान्यता दिली. भुजबळांच्या नेतृत्वातील हा 18 आमदारांचा गट काँग्रेसमध्ये सामील झाला. 

शिवसेनेला माघार घ्यावी लागली

छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षात पहिली मोठी फूट पाडली. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच कोणीतरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड करण्याचे धाडस केले होते. भुजबळ यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला होता.  विधानसभेतील शिवसेना आमदारांची संख्या कमी झाली. शिवसेना आमदारांची संख्या 52 वरून थेट 34 वर आली. भाजपने या संधीचा फायदा घेत विरोधी पक्षनेतेपदावर आपला दावा ठोकला. भाजपचे आमदार शिवसेनेपेक्षा 41 ने जास्त होते. यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडावे लागले,  भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 

छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या विरोधात जाऊन वेगळा गट का स्थापन केला?

छगन भुजबळ हे बाळासाहेबांच्या टीममधील सर्वात पावरफुल नेते होते. ओबीसी समाजात छगन भुजबळ यांचा मोठ दबदबा होता. शिवसेनेचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बाळासाहेब आणि छगन भुजबळ यांच्यातील संबध बिघडले. 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळवता आली नाही. पण, शिवसेना महाराष्ट्रातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आली. बाळासाहेब आपल्यावरच विरोधी पक्षनेतेची जबाबदारी सोपवतील असा छगन भुजबळ यांना विश्वास होता. पण, तसे झाले नाही बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते बनवले. यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी थेट बाळासांहेबाविरोधात बंड पुकारले. 18 आमदारांना सोबत घेऊन छगन भुजबळ शिवसेना पक्षातून बाहेर पडले. अशा प्रकारे 34 वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष पहिल्यांदा फुटला होता.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Shiv Sena UBT
Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray
Maharashtra Politics