• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /झेप्टोच्या स्टोअरमध्ये 5 तरुणींचा लैंगिक छळ; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोपले

झेप्टोच्या स्टोअरमध्ये 5 तरुणींचा लैंगिक छळ; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोपले

मीरा रोड मध्ये झेप्टोच्या स्टोअर मॅनेजरकडून पाच तरुणींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 12, 2026, 08:57 PM IST|Updated: Oct 12, 2026, 09:03 PM IST
joinshare
झेप्टोच्या स्टोअरमध्ये 5 तरुणींचा लैंगिक छळ; मनसे कार्यकर्त्यांनी मॅनेजरला चोपले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मिरा रोड क्राईम : मिरा रोड येथील शिवार गार्डन परिसरातील झेप्टो स्टोअरमध्ये काम करणाऱ्या पाच तरुणींना स्टोअर मॅनेजरकडून लैंगिक छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जय पाठक असे या स्टोअर मॅनेजरचे नाव असून, तो तरुणींना अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचा छळ करत असल्याचा आरोप आहे. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळलेल्या तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतल्यानंतर  मनसे कार्यकर्त्यांनी स्टोअरमध्ये जाऊन पाठक याला चोप दिला. त्यानंतर त्याला मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणींना जय पाठक याच्याकडून सातत्याने त्रास दिला जात होता. कामाच्या ठिकाणी तो त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या पाच तरुणींनी मनसेकडे तक्रार केली होती. त्यापैकी एका तरुणीने महिनाभरापूर्वीच या स्टोअरमध्ये कामाला सुरुवात केली होती.

तरुणींच्या तक्रारीची दखल घेत मनसे कार्यकर्ते 10 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झेप्टो स्टोअरमध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्टोअर मॅनेजर जय पाठक याला चोप दिला. त्यानंतर त्याला मीरा रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मनसेचा वाहतूक कोंडी विरोधात प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टीमेटम

कल्याण डोंबिवली भागातील वाहतूक कोंडी विरोधात मनसेनं आज जन आंदोलन केलं. या जनआंदोलनात मनसे नेते राजू पाटील यांनी धंदा व्हावा म्हणून टोलनाके २४ तास चालू ठेवतात,त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते असा आरोप केला. त्यामुळे प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. एक आठवड्यानंतर टोल नाके फोडणार ते कुणाला सांगून फोडणार नाही असा खळखट्याकचा इशारा मनसेने दिलाय. कल्याणच्या कल्याण फाटा परिसरात आज मनसे च्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला समाजवादी पार्टी,राष्ट्रवादी Sp, युबीटी, काँग्रेस पक्षांने देखील पाठिंबा दिला. या आंदोलनात वाहतूक कोंडीने त्रासलेले नागरिकांनी देखील उस्फुर्त सहभाग घेतला होता.काहींनी तर या वाहतूक कोंडीमुळे नोकऱ्या सोडल्याचं सांगितलं. त्यामुळे आता वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते ते पाहावं लागेल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai
Mumbai News
crime